Nokia 5.2 वेबसाइट वर झाला लिस्ट, एंडरॉयड 10 सह असेल 3 जीबी रॅम, 19 मार्चला होईल लॉन्च

Nokia ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 19 मार्चला लंडन मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचे नवीन स्मार्टफोन टेक मंचावर येतील. HMD Global चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर जुहो सरविकास यांनी आपल्या ट्वीट हँडेल वरून याची घोषणा केली होती. कंपनीने अजूनतरी सांगतिले नाही कि 19 मार्चला ब्रँडचे कोणकोणते फोन लॉन्च केले जातील पण अशी चर्चा आहे कि यादिवशी Nokia 8.2 5G, Nokia 5.2, Nokia 1.3 आणि Nokia C2 बाजारात येतील. आता लॉन्चच्या आधी यातील नोकिया 5.2 स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर समोर आला आहे.

Nokia 5.2 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. हि लिस्टिंग कालची म्हणजे 4 मार्चची आहे आणि हैराणीची बाब म्हणजे गीकबेंच वर नोकिया 5.2 Captain America कोडनेम सह लिस्ट केला गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कोडनेम मागील कारण फोनच्या बॅक पॅनल वरील कॅमेरा सेटअप आहे जो एक शिल्डच्या आकारात बनलेला आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोन संबंधित महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Nokia 5.2

सर्वात आधी लिस्टिंग मध्ये समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता गीकबेंचनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर आधारित असेल जो 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. गीकबेंच वर हा फोन 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. तसेच बेंचमार्क स्कोर बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर नोकिया 5.2 ला सिंगल-कोर मध्ये 313 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 1419 स्कोर मिळाला आहे.

नोकिया 5.2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम मेमरी सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी मेमरी मिळू शकते. लीकनुसार नोकिया 5.2 6.2 इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो.

Nokia 5.2 डुअल रियर कॅमेऱ्यासह येणार असल्याचे बोलले जात आहे. लीक्सनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 16 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. Nokia 5.2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट सह येईल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

नोकिया 5.2 साठी अजूनतरी 19 मार्चची वाट बघितली जात आहे. आशा आहे कि या दिवशी चार नोकिया फोन लॉन्च केले जातील. आधी माहिती समोर आली होती कि कंपनी Nokia चा आगामी स्मार्टफोन Nokia 8.2 स्मार्टफोन फक्त 5G कनेक्टिविटी केला जाईल तसेच Nokia 8.2 मध्ये 4G सपोर्ट दिला जाणार नाही. नोकिया 8.2 व्यतिरिक्त 19 मार्चला लो बजेट डिवाईस Nokia 1.3 आणि Nokia C2 पण टेक मार्केट मध्ये येऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here