Nokia C3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 02 Dec 2020 12:37:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia C3 झाला अजून स्वस्त, आता फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-price-cut-in-now-worth-rs-6999-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-price-cut-in-now-worth-rs-6999-sale/#respond Wed, 02 Dec 2020 12:37:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9135 कंपनीने Nokia C3 च्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Nokia C3 झाला अजून स्वस्त, आता फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात मोठा डाव टाकत एक साथ 4 नवीन मोबाईल फोन लॉन्च केले होते. कंपनीने भारतात Nokia 5.3 आणि Nokia C3 स्मार्टफोन सोबतच Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन बाजारात आणले होते. यातील एक Nokia C3 ने लो बजेट मध्ये एंट्री घेतली होती जो देशात 7,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. पण आता आपल्या फॅन्ससाठी कंपनीने हा स्वस्त नोकिया सी3 स्मार्टफोन अजून स्वस्त केला आहे.

कंपनीने Nokia C3 च्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. नोकिया सी3 चा 2 जीबी रॅम वेरिएंट कंपनीने 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे पण आता या फोनची किंमत कमी करून 6,999 रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 8,999 रुपयांच्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत आता कमी होऊन 7,999 रुपये झाली आहे.

Nokia C3

नोकिया सी3 एक लो बजेट फोन आहे जो नॉचलेस बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1440 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.99 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या दोन्ही बाजूंना बारीक बेजल्स आहेत तर वर आणि खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. वरच्या बाजूला स्पीकर आणि सेल्फी कॅमेरा आहे तर खालच्या भागावर Nokia ची ब्रॅंडिंग आहे.

Nokia C3 कंपनीने एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह Unisoc SC9863A चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये आईएमजी8322 जीपीयू पण आहे. भारतीय बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 2 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia C3 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक कॅमेरा लेंस आणि एक एलईडी फ्लॅश आहे. हा सेटअप पॅनलच्या मधोमध वर्टिकल स्टाईल मध्ये आहे ज्यात एफ/2.0 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia C3 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम सोबत 400जीबी पर्यंतची एक्सपांडेबल स्टोरेज असलेला माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येतो. हा फोन 4जी वोएलटीई सोबत 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी नोकिया सी3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 3,040एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 17 सप्टेंबर पासून Nordic Blue आणि Sand कलर मध्ये विकत घेता येईल जो 1 वर्षांच्या रिप्लेसमेंट गारंटी सह मिळेल.

The post Nokia C3 झाला अजून स्वस्त, आता फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-price-cut-in-now-worth-rs-6999-sale/feed/ 0
फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Nokia C3, देईल का लो बजेट मध्ये Realme-Xiaomi ला आव्हान https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-and-nokia-5-3-smartphone-nokia-125-and-150-feature-phone-launched-in-india-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-and-nokia-5-3-smartphone-nokia-125-and-150-feature-phone-launched-in-india-specs-price-sale-offer/#respond Tue, 25 Aug 2020 09:42:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7850 Nokia C3 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम सोबत 400जीबी पर्यंतची एक्सपांडेबल स्टोरेज असलेला माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येतो.

The post फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Nokia C3, देईल का लो बजेट मध्ये Realme-Xiaomi ला आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia फॅन्ससाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. या कंपनीने आपल्या भारतीय यूजर्सना आज एक दोन नाही तर 4 नवीन मोबाईल फोन दिले आहेत. कंपनीने भारतात Nokia 5.3 आणि Nokia C3 स्मार्टफोन सोबत Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन लॉन्च केले आहेत. नोकिया मोबाईल्सने यावेळी भारतात इतर ब्रँडस समोर आव्हान उभे केले आहे. यातील Nokia C3 कंपनीने फक्त 7,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे जो पुढल्या महिन्यात विक्री साठी उपलब्ध होईल.

Nokia C3 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. नोकिया सी3 चा 2 जीबी रॅम वेरिएंट कंपनीने 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. Nokia C3 येत्या 10 सप्टेंबर पासून प्री-ऑर्डर करता येईल जो 17 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia C3

नोकिया सी3 एक लो बजेट फोन आहे जो नॉचलेस बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1440 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.99 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या दोन्ही बाजूंना बारीक बेजल्स आहेत तर वर आणि खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. वरच्या बाजूला स्पीकर आणि सेल्फी कॅमेरा आहे तर खालच्या भागावर Nokia ची ब्रॅंडिंग आहे.

Nokia C3 कंपनीने एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह Unisoc SC9863A चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये आईएमजी8322 जीपीयू पण आहे. भारतीय बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 2 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia C3 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक कॅमेरा लेंस आणि एक एलईडी फ्लॅश आहे. हा सेटअप पॅनलच्या मधोमध वर्टिकल स्टाईल मध्ये आहे ज्यात एफ/2.0 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia C3 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम सोबत 400जीबी पर्यंतची एक्सपांडेबल स्टोरेज असलेला माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येतो. हा फोन 4जी वोएलटीई सोबत 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी नोकिया सी3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 3,040एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 17 सप्टेंबर पासून Nordic Blue आणि Sand कलर मध्ये विकत घेता येईल जो 1 वर्षांच्या रिप्लेसमेंट गारंटी सह मिळेल.

The post फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Nokia C3, देईल का लो बजेट मध्ये Realme-Xiaomi ला आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-and-nokia-5-3-smartphone-nokia-125-and-150-feature-phone-launched-in-india-specs-price-sale-offer/feed/ 0