Nubia Z18 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Sep 2018 13:30:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डुअल डिस्प्ले सह समोर आला अनोखा फोन, बॅक पॅनल वर पण असेल स्क्रीन आणि रियर कॅमेऱ्याने घेता येईल सेल्फी https://www.91mobiles.com/marathi/nubia-z18s-listed-on-tenaa-with-dual-display-true-bezel-less-screen-specifications-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-z18s-listed-on-tenaa-with-dual-display-true-bezel-less-screen-specifications-feature-in-marathi/#respond Mon, 24 Sep 2018 13:30:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2239 नुबिया झेड18एस टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर हा फोन एनएक्स616जे मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे.

The post डुअल डिस्प्ले सह समोर आला अनोखा फोन, बॅक पॅनल वर पण असेल स्क्रीन आणि रियर कॅमेऱ्याने घेता येईल सेल्फी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी नुबिया ने नुकताच चीन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन झेड18 सादर केला होता. हा फोन ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह येतो जो 8जीबी च्या पावरफुल रॅमला सपोर्ट करतो. आज नुबिया च्या या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन झेड18एस ची बातमी समोर आल्यामुळे टेक विश्वात चर्चाना उधाण आले आहे. नुबिया झेड18एस चीनी सर्टिफि​केश साइट वर दिसला आहे तिथून फोनच्या लुक सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन डुअल डिस्प्लेला सपोर्ट करतो म्हणजे फोनच्या फ्रंट पॅनल सोबतच याच्या बॅक पॅनल वर पण स्क्रीन आहे.

नुबिया झेड18एस टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर हा फोन एनएक्स616जे मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे. नुबिया झेड18एस ची सर्वात मोठी खासियत फोन मधील डुअल डिस्प्ले आहे जो फोनच्या फ्रंट पॅनल सह बॅक पॅनल वर पण आहे. या फोनच्या फ्रंट पॅनल सोबतच बॅक पॅनल वरून पण ऍप्स वापरता येतील.

लिस्टिंग नुसार नुबिया झेड18एस च्या फ्रंट पॅनल वर 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करणारा 5.1-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. नुबिया झेड18एस च्या फोटो मध्ये फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे ज्यात कोणतीही नॉच पण नाही. या फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी आपल्या फोन मध्ये कोणताही सेल्फी कॅमेरा सेटअप देणार नाही. पण बॅक पॅनल वरील कॅमेऱ्याने आणि बॅक डिस्प्लेच्या मदतीने सेल्फी घेता येईल.

नुबिया झेड18एस च्या बॅक पॅनल वर हॉरिजोन्टल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे ज्या सोबत लाईट आहेत. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक डिस्प्ले मुले सेल्फी कॅमेऱ्याचे पण काम करेल. स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा असेल.

कंपनी हा फोन 6जीबी रॅम/64जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/128जीबी मेमरी च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच हा 2.6गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3800एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. कंपनी ने अजूनतरी नुबिया झेड18एस बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे जोपर्यंत कोणतीही आॅफिशियल घोषणा केली जात तोपर्यंत फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post डुअल डिस्प्ले सह समोर आला अनोखा फोन, बॅक पॅनल वर पण असेल स्क्रीन आणि रियर कॅमेऱ्याने घेता येईल सेल्फी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-z18s-listed-on-tenaa-with-dual-display-true-bezel-less-screen-specifications-feature-in-marathi/feed/ 0
5 सप्टेंबरला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 असलेला नुबिया झेड18 https://www.91mobiles.com/marathi/nubia-z18-to-launch-on-5-september-with-8gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-z18-to-launch-on-5-september-with-8gb-ram-in-marathi/#respond Wed, 29 Aug 2018 11:13:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1859 हा फोन 5 सप्टेंबरला चीनी बाजारात येईल. त्यामुळे नुबिया झेड18 ग्लोबल मंचावर कधी येईल याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

The post 5 सप्टेंबरला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 असलेला नुबिया झेड18 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी नुबिया आपल्या झेड स्मार्टफोन सीरीज मध्ये झेड18 स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे, याची चर्चा कित्येक दिवस चालूच आहे. नुबिया झेड18 चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट करण्यात आले आहे जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. पण आता कंपनी ने या पावरफुल फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. नुबिया ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून लॉन्च ईवेंट शेयर केला आहे. या इन्वाईट मधून कंपनी ने घोषणा केली आहे की नुबिया झेड18 5 सप्टेंबरला टेक मंचावर पहिल्यांदा येईल.

नुबिया ने शेयर केलेल्या या टीजर मध्ये फोन चा शेप बनवण्यात आला आहे आणि 5 सप्टेंबर ची लॉन्च डेट लिहिण्यात आली आहे. फोनच्या ईमेंज मध्ये फ्रंट पॅनल वर वॉटरड्राप डिस्प्ले दिसत आहे आणि फोन चे कोपरे बेजल लेस आहेत. टीजर वरून हे स्पष्ट झाले आहे की नुबिया झेड18 पण नवीन ट्रेंड फॉलो करत ‘वी’ शेप वाला नॉच डिस्प्ले घेऊन येणार आहे. समोर आलेल्या लीक्स नुसार फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.88-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल.

नुबिया झेड18 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार नुबियाचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 8जीबी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये क्रमश: 128जीबी मेमरी आणि 64जीबी स्टोरेज असू शकते. टेना च्या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले होते की नुबिया झेड18 एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल तसेच ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 630 मिळेल.

लीक नुसार नुबिया झेड18 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा मिळेल ज्यात प्राइमरी कॅमेरा 24-मेगापिक्सल चा तसेच 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असेल. त्याच प्रमाणे सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. नुबिया झेड18 बद्दल बोलले जात आहे की या फोन मध्ये 4जी वोएलटीई सह डुअल सिम व यूएसबी टाईप-सी सारखे फीचर्स असतील आणि यात 3,050एमएएच ची बॅटरी मिळेल.

नुबिया झेड18 येत्या 5 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च होत आहे. फोनची किंमत तसेच याच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे. हा फोन 5 सप्टेंबरला चीनी बाजारात येईल. त्यामुळे नुबिया झेड18 ग्लोबल मंचावर कधी येईल याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

The post 5 सप्टेंबरला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 असलेला नुबिया झेड18 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-z18-to-launch-on-5-september-with-8gb-ram-in-marathi/feed/ 0