डुअल डिस्प्ले सह समोर आला अनोखा फोन, बॅक पॅनल वर पण असेल स्क्रीन आणि रियर कॅमेऱ्याने घेता येईल सेल्फी

टेक कंपनी नुबिया ने नुकताच चीन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन झेड18 सादर केला होता. हा फोन ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह येतो जो 8जीबी च्या पावरफुल रॅमला सपोर्ट करतो. आज नुबिया च्या या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन झेड18एस ची बातमी समोर आल्यामुळे टेक विश्वात चर्चाना उधाण आले आहे. नुबिया झेड18एस चीनी सर्टिफि​केश साइट वर दिसला आहे तिथून फोनच्या लुक सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन डुअल डिस्प्लेला सपोर्ट करतो म्हणजे फोनच्या फ्रंट पॅनल सोबतच याच्या बॅक पॅनल वर पण स्क्रीन आहे.

नुबिया झेड18एस टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर हा फोन एनएक्स616जे मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे. नुबिया झेड18एस ची सर्वात मोठी खासियत फोन मधील डुअल डिस्प्ले आहे जो फोनच्या फ्रंट पॅनल सह बॅक पॅनल वर पण आहे. या फोनच्या फ्रंट पॅनल सोबतच बॅक पॅनल वरून पण ऍप्स वापरता येतील.

लिस्टिंग नुसार नुबिया झेड18एस च्या फ्रंट पॅनल वर 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करणारा 5.1-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. नुबिया झेड18एस च्या फोटो मध्ये फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे ज्यात कोणतीही नॉच पण नाही. या फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी आपल्या फोन मध्ये कोणताही सेल्फी कॅमेरा सेटअप देणार नाही. पण बॅक पॅनल वरील कॅमेऱ्याने आणि बॅक डिस्प्लेच्या मदतीने सेल्फी घेता येईल.

नुबिया झेड18एस च्या बॅक पॅनल वर हॉरिजोन्टल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे ज्या सोबत लाईट आहेत. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक डिस्प्ले मुले सेल्फी कॅमेऱ्याचे पण काम करेल. स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा असेल.

कंपनी हा फोन 6जीबी रॅम/64जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/128जीबी मेमरी च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच हा 2.6गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3800एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. कंपनी ने अजूनतरी नुबिया झेड18एस बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे जोपर्यंत कोणतीही आॅफिशियल घोषणा केली जात तोपर्यंत फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here