OnePlus Pad Go - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 06 Oct 2023 15:24:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-go-india-launched-price-specs-availability/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-go-india-launched-price-specs-availability/#respond Fri, 06 Oct 2023 15:24:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22652 वनप्लसनं भारतात आपला टॅबलेट पोर्टफोलियो वाढवत OnePlus Pad Go लाँच केला आहे. डिवाइसमध्ये 8GB रॅम, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, वाय-फाय आणि मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटी, 8000एमएएच बॅटरी, 33वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, पाहूया ह्याचे सर्व स्पेसिफिकेशन्स, प्री-बुकिंग आणि सेल डेट सारखी माहिती. OnePlus Pad Go ची किंमत आणि […]

The post OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • वनप्लस पॅड गो दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे.
  • हा 12 ऑक्टोबरपासून प्री-ऑर्डर करता येईल.
  • डिवाइसची विक्री 20 ऑक्टोबर 12 वाजल्यापासून सुरु होईल.

वनप्लसनं भारतात आपला टॅबलेट पोर्टफोलियो वाढवत OnePlus Pad Go लाँच केला आहे. डिवाइसमध्ये 8GB रॅम, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, वाय-फाय आणि मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटी, 8000एमएएच बॅटरी, 33वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, पाहूया ह्याचे सर्व स्पेसिफिकेशन्स, प्री-बुकिंग आणि सेल डेट सारखी माहिती.

OnePlus Pad Go ची किंमत आणि उपलब्धता

  • वनप्लस पॅड गो टॅबलेट ब्रँडनं दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज मिळते.
  • डिवाइसच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज LTE आणि वायफाय मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. हा टॅबलेट फक्त वाय-फायसह 19,999 रुपयांना मिळेल.
  • 256GB स्टोरेज पाहता LTE आणि वायफाय कनेक्टिव्हिटी असलेला मॉडेल 23,999 रुपयांचा आहे.
  • वनप्लस पॅड गो फक्त ट्विन मिंट कलरमध्ये येतो.
  • टॅबलेट येत्या 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजल्यापासून वनप्लस वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो.
  • प्री-ऑर्डर ऑफर अंतर्गत युजर्सना 1,399 रुपयांचा फोलियो कव्हर देखील मिळेल.
  • तसेच OnePlus Pad Go ची विक्री 20 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल.

OnePlus Pad Go चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: वनप्लस पॅड गो टॅबलेटमध्ये 2408 x 1720 पिक्सल रिजॉल्यूशन असलेला 11.35 इंचाचा एलसीडी (एलटीपीएस) डिस्प्ले आहे. जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 400 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: वनप्लस पॅड गो परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हेलियो G99 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.
  • मेमरी: डेटा स्टोर करण्यासाठी ह्यात 8GB LPDDR4X रॅम + 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे. स्टोरेज कार्डच्या मदतीनं 1टीबी पर्यंत वाढवता येते.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता ह्यात EIS सपोर्टसह 8MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फीसह व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: नवीन टॅबलेटमध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 8,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा टॅब अँड्रॉइड 13 आधारित OxygenOS 13.2 वर चालतो.
  • अन्य: ह्यात ब्लूटूथ v5.2, यूएसबी टाइप-सी, वाय-फाय 2.GHz बँड, फेस अनलॉक, जियोमॅग्नेटिक सेन्सर, लाइट सेन्सर, एक्सेलेरेशन सेन्सर सारखे अनेक ऑप्शन आहेत.

The post OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-go-india-launched-price-specs-availability/feed/ 0