वनप्लसनं भारतात आपला टॅबलेट पोर्टफोलियो वाढवत OnePlus Pad Go लाँच केला आहे. डिवाइसमध्ये 8GB रॅम, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, वाय-फाय आणि मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटी, 8000एमएएच बॅटरी, 33वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, पाहूया ह्याचे सर्व स्पेसिफिकेशन्स, प्री-बुकिंग आणि सेल डेट सारखी माहिती.
OnePlus Pad Go ची किंमत आणि उपलब्धता
- वनप्लस पॅड गो टॅबलेट ब्रँडनं दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज मिळते.
- डिवाइसच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज LTE आणि वायफाय मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. हा टॅबलेट फक्त वाय-फायसह 19,999 रुपयांना मिळेल.
- 256GB स्टोरेज पाहता LTE आणि वायफाय कनेक्टिव्हिटी असलेला मॉडेल 23,999 रुपयांचा आहे.
- वनप्लस पॅड गो फक्त ट्विन मिंट कलरमध्ये येतो.
- टॅबलेट येत्या 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजल्यापासून वनप्लस वेबसाइट आणि अॅमेझॉन इंडियावर प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो.
- प्री-ऑर्डर ऑफर अंतर्गत युजर्सना 1,399 रुपयांचा फोलियो कव्हर देखील मिळेल.
- तसेच OnePlus Pad Go ची विक्री 20 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल.
OnePlus Pad Go चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: वनप्लस पॅड गो टॅबलेटमध्ये 2408 x 1720 पिक्सल रिजॉल्यूशन असलेला 11.35 इंचाचा एलसीडी (एलटीपीएस) डिस्प्ले आहे. जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 400 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: वनप्लस पॅड गो परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हेलियो G99 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.
- मेमरी: डेटा स्टोर करण्यासाठी ह्यात 8GB LPDDR4X रॅम + 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे. स्टोरेज कार्डच्या मदतीनं 1टीबी पर्यंत वाढवता येते.
- कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता ह्यात EIS सपोर्टसह 8MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फीसह व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: नवीन टॅबलेटमध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 8,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
- ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा टॅब अँड्रॉइड 13 आधारित OxygenOS 13.2 वर चालतो.
- अन्य: ह्यात ब्लूटूथ v5.2, यूएसबी टाइप-सी, वाय-फाय 2.GHz बँड, फेस अनलॉक, जियोमॅग्नेटिक सेन्सर, लाइट सेन्सर, एक्सेलेरेशन सेन्सर सारखे अनेक ऑप्शन आहेत.