OPPO A1 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Apr 2023 03:56:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera आणि 12GB RAM सह नवीन OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; असे आहेत स्पेक्स https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a1-5g-launched-in-china-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a1-5g-launched-in-china-check-price-and-specifications/#respond Thu, 13 Apr 2023 03:56:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20240 टेक ब्रँड ओप्पोनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO A1 5G सादर केला आहे. हा मोबाइल फोन 50MP dual Camera, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो जो गेल्यावर्षी लाँच झालेल्या OPPO A1 Pro चा डाउनग्रेड व्हर्जन आहे. पुढे तुम्ही ओप्पो ए1 प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून […]

The post 50MP Camera आणि 12GB RAM सह नवीन OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; असे आहेत स्पेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO A1 मध्ये 5G आणि 4G दोन्ही सिम वापरता येतील.
  • हा फोन 67W SuperVOOC टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
  • हा ओप्पो मोबाइल Qualcomm Snapdragon 695 वर चालतो.

टेक ब्रँड ओप्पोनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO A1 5G सादर केला आहे. हा मोबाइल फोन 50MP dual Camera, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो जो गेल्यावर्षी लाँच झालेल्या OPPO A1 Pro चा डाउनग्रेड व्हर्जन आहे. पुढे तुम्ही ओप्पो ए1 प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊ शकता.

ओप्पो ए1 5जी फोनची किंमत

  • 12GB RAM + 256GB Storage = जवळपास 23,000 रुपये

किंमत पाहता चायना मध्ये ओप्पो ए1 सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा 5जी फोन 12जीबी रॅम + 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत RMB 1999 आहे. ही प्राइस भारतीय करंसीनुसार 23,900 रुपयांच्या आसपास आहे.

ओप्पो ए1 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

  • 6.72″ FHD+ LCD display
  • 120Hz refresh rate

OPPO A1 5G फोन 2412 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंगला सपोर्ट करतो. डिस्प्लेवर 680निट्स ब्राइटनेस मिळते.

प्रोसेसर

  • Android 13
  • ColorOS 13
  • Qualcomm Snapdragon 695

ओप्पो ए1 5जी फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन 619 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 1टीबी पर्यंतच्या मेमरी कार्डला सपोर्ट करतो.

कॅमेरा

  • 50MP dual Rear Camera
  • 8MP selfie Camera

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए1 5जी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मोनो पोर्टरेट लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल सेन्सर आहे.

बॅटरी

  • 67W SuperVOOC
  • 5,000mAh battery

OPPO A1 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट सुपरवूक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटी

  • NFC
  • Wi-Fi 6
  • Bluetooth 5.2

OPPO A1 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यावर 5जी व 4जी दोन्ही वापरता येतं. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस व यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

The post 50MP Camera आणि 12GB RAM सह नवीन OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; असे आहेत स्पेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a1-5g-launched-in-china-check-price-and-specifications/feed/ 0
12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-5g-launched-in-china-feature-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-5g-launched-in-china-feature-specifications-price/#respond Tue, 04 Apr 2023 10:23:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20007 ओप्पोनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये OPPO A1 5G लाँच केला आहे. हा एक मिडबजेट 5जी फोन आहे जो 50MP Camera, 12GB RAM आणि Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. चीनमध्ये याची किंमत 2099 युआन म्हणजे सुमारे 25000 रुपये ठेवण्यात आली आहे. पुढे आम्ही OPPO A1 5G च्या फुल स्पेसिफिकेशन्स, प्राइससह भारतीय लाँचची स्थिती देखील […]

The post 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO A1 5G चायना मध्ये लाँच झाला आहे.
  • हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 वर चालतो.
  • या 5जी ओप्पो मोबाइलमध्ये 50MP Camera मिळतो.

ओप्पोनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये OPPO A1 5G लाँच केला आहे. हा एक मिडबजेट 5जी फोन आहे जो 50MP Camera, 12GB RAM आणि Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. चीनमध्ये याची किंमत 2099 युआन म्हणजे सुमारे 25000 रुपये ठेवण्यात आली आहे. पुढे आम्ही OPPO A1 5G च्या फुल स्पेसिफिकेशन्स, प्राइससह भारतीय लाँचची स्थिती देखील सांगितली आहे.

ओप्पो ए1 5जीची किंमत

OPPO A1 5G चीनमध्ये दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. हा ओप्पो मोबाइल 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता 8जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 2099 युआन आहे तसेच 12जीबी रॅम मॉडेलची प्राइस 2299 युआन आहे.

इंडियन करंसीनुसार 8जीबी रॅम असलेल्या ओप्पो ए1 5जी फोनची किंमत जवळपास 25,000 रुपये आहे तर 12जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटची किंमत 27,400 रुपयांच्या आसपास आहे.चीनमध्ये OPPO A1 5G फोन Cabernet Orange, Ocean Blue आणि Sandstone Black कलरमध्ये आला आहे.

ओप्पो ए1 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 90Hz Display
  • 12GB RAM + 256GB ROM
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP Dual Rear Camera
  • 5,000mAh Battery

OPPO A1 5G फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

प्रोसेसिंगसाठी ओप्पो ए1 5जी फोन 8नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13 सह मिलकर चालतो. ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 619एल जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी OPPO A1 5G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इस 5जी ओप्पो मोबाइलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

OPPO A1 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. यात 3.5एमएम जॅक व आयआर ब्लास्टर देखील मिळतो. हे देखील वाचा: Vivo T2 5G सीरीज येतेय भारतात; फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन

ओप्पो ए1 5जी इंडिया लाँचची स्थिती

ओप्पोनं यावर्षीच्या सुरुवातीला OPPO A78 5G फोन भारतात लाँच केला होता जो 18,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर कंपनीनं आपल्या ‘ए’ सीरीजमध्ये कोणताही नवीन फोन जोडला नाही. OPPO A1 5G सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे आणि याच्या इंडिया लाँचची स्थिती अद्याप स्पष्ट झाली नाही, कदाचित हा फोन भारतात येणार देखील नाही. सध्या भारतात या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन OPPO A12 आहे जो 7,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-5g-launched-in-china-feature-specifications-price/feed/ 0