Vivo T2 5G सीरीज येतेय भारतात; फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन

Highlights

  • Vivo T2 5G सीरीजमध्ये Vivo T2 आणि Vivo T2x सादर केला जाऊ शकतो.
  • आशा आहे की फोन मिड-एप्रिलमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • हा iQOO Z7 सीरीज स्मार्टफोनचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

विवोच्या टी2 सीरीज बद्दल गेले कित्येक दिवस लीक व माहिती समोर येत आहे. आता फ्लिपकार्टवर Vivo T2 सीरीजची मायक्रो-साइट लाइव्ह करण्यात आली आहे. लिस्टिंगवरून निश्चित झालं आहे की हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल. परंतु अजूनही अधिकृत लाँच डेट समोर आली नाही. लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की येत्या काही दिवसांत डिवाइसच्या फीचर्सचा खुलासा केला जाईल. पुढे आम्ही तुम्हाला या सीरीजची आतापर्यंत समोर आलेली माहिती सांगणार आहोत.

फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन

फ्लिपकार्टवर मायक्रो-साइटवरून समजलं आहे की विवो टी2 5जी सीरीज लवकरच भारतात लाँच होईल. तसेच लिस्टिंगमधून समजलं आहे की आगामी स्मार्टफोनमध्ये टर्बो डिस्प्ले असेल, जो हाय रिफ्रेश रेटची हिंट देतो. तसेच लिस्टिंगमध्ये आगामी डिवाइसच्या टर्बो कॅमेरा आणि टर्बो प्रोसेसरचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामुळे या फोनमध्ये हाय रिजोल्यूशन कॅमेरा आणि शक्तीशाली चिपसेट मिळेल असा अंदाज लावला जात आहे. हे देखील वाचा: Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले

फ्लिपकार्टवरील माहितीनुसार कंपनी 5 एप्रिल, 7 एप्रिल आणि 9 एप्रिलला प्रोडक्टच्या फीचर्सच्या अधिक माहितीचा खुलासा करेल. तसेच टीजर इमेजवरून समजलं आहे की या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. टर्बो डिस्प्लेच्या बॉक्समधून वॉटरड्रॉप नॉच डिजाइन आणि टर्बो प्रोसेसर बॉक्समधून क्वॉलकॉम 5G चिपसेटची माहिती मिळाली आहे. या नवीन विवो स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy A24 झाला भारतीय वेबसाइटवर लिस्ट; सपोर्ट पेजवरून लाँच कंफर्म

विवो टी 2 सीरिजचे लीक स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच माहिती समोर आली होती की Vivo T2 5G सीरीजमध्ये Vivo T2 आणि Vivo T2x स्मार्टफोन्स सादर केले जाऊ शकतात. यातील Vivo T2 स्मार्टफोनमध्ये FHD+ रेजोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले आणि 1300 निट्स पीक ब्राइटनेस दिली जाऊ शकते. डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेटसह बाजारात येईल, असा खुलासा Google Play कंसोल लिस्टिंगवरून झाला होता. तसेच डिवाइसमध्ये 6जीबी/ 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. विवो टी2 स्मार्टफोन OIS सपोर्टसह 64MP च्या प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. प्रायमरी सेन्सरसह एक सेकंडरी डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here