OPPO A1 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:38:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लाँच पूर्वीच A1 Pro चे फोटोज आणि स्पेक्स लीक; टिपस्टरनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-pro-5g-image-specifications-leaked-could-be-rebranded-oppo-a98-mobile/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-pro-5g-image-specifications-leaked-could-be-rebranded-oppo-a98-mobile/#respond Thu, 10 Nov 2022 11:28:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14825 ओप्पो कंपनी टेक मंचावर आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच ओप्पो ए1 प्रो 5जी फोन लाँच करणार आहे, अशी बातमी आली आहे. प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लासनं OPPO A1 Pro 5G संबंधित लीक शेयर केलं आहे ज्यात फोनच्या फोटो आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओप्पो ए1 प्रो […]

The post लाँच पूर्वीच A1 Pro चे फोटोज आणि स्पेक्स लीक; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओप्पो कंपनी टेक मंचावर आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच ओप्पो ए1 प्रो 5जी फोन लाँच करणार आहे, अशी बातमी आली आहे. प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लासनं OPPO A1 Pro 5G संबंधित लीक शेयर केलं आहे ज्यात फोनच्या फोटो आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओप्पो ए1 प्रो 5जी फोन येत्या काही महिन्यांमध्ये बाजारात सादर केला जाऊ शकतो.

OPPO A1 Pro 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए1 प्रो 5जी फोन बाबत इवान ब्लासनं सांगितलं आहे की हा स्मार्टफोन कंपनीच्या OPPO A98 स्मार्टफोनचं रिब्रँडेड व्हर्जन असू शकतं. OPPO A1 Pro 5G चा मॉडेल नंबर PHQ110 आहे तर हाच मॉडेल नंबर ओप्पो ए98 स्मार्टफोनचा देखील आहे. शेयर केलेल्या फोटोमध्ये ओप्पो ए1 प्रोचा रियर पॅनल दाखवण्यात आला आहे त्यावरून फोनच्या लुक व डिजाईन सोबतच याच्या कॅमेरा सेग्मेंटची देखील खूप माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: गुपचूप लाँच झाला Airtel चा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; स्वस्तात डेटा, एसएमएस आणि कॉलिंगही

OPPO A1 Pro 5G मध्ये पिलशेप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात दोन मोठ्या रिंग वर्टिकली देण्यात आल्या आहेत. वरच्या रिंगमध्ये सिंगल कॅमेरा लेन्स आहे तर खालच्या रिंगमध्ये कॅमेरा सेन्सर्ससह फ्लॅश लाईट देखील आहे. या रियर कॅमेराच्या खाली चमकदार पॅटर्न देखील आहे. फोनच्या बॅक पॅनलला ग्रेडिएंट लुक देण्यात आला आहे तसेच यावर अन्य कोणतेही सेन्सर नाहीत. खाली उजवीकडे OPPO ची ब्रँडिंग आहे.

OPPO A1 Pro 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन OPPO A98 चा रीब्रँडेड व्हर्जन असल्याचं सांगितलं जात आहे. जो काही दिवसांपूर्वी चीनी सर्टिफिकेशन साइट टेनावर PHQ110 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला होता. टेनावर खुलासा झाला होता की हा ओप्पो मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो तसेच ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसरवर चालू शकतो. टेनानुसार OPPO A98 चे तीन व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतो ज्यात 6GB RAM, 8GB RAM आणि 12GB RAM मिळू शकतो. तसेच फोनचे 128GB, 256GB तथा 512GB storage ऑप्शन टेनावर लिस्ट झाले आहेत. हे देखील वाचा: Sumi Marathi Movie: तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; थेट ओटीटीवर होणार रिलीज

ओप्पो ए98 मध्ये 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा असल्याचं सांगण्यात आलं आहे जो ओप्पो ए1 प्रो 5जी फोनमध्ये देखील मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळेल, असा खुलासा देखील टेनावर झाला आहे. या ओप्पो मोबाइलमध्ये 6.7 इंचाची फुलएचडी+ कर्व्ड अ‍ॅमोलेड स्क्रीन मिळू शकते जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येईल. या ओप्पो मोबाइलचे डायमेंशन 162.3×74.3×7.7एमएम आणि वजन फक्त 171 ग्राम आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post लाँच पूर्वीच A1 Pro चे फोटोज आणि स्पेक्स लीक; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a1-pro-5g-image-specifications-leaked-could-be-rebranded-oppo-a98-mobile/feed/ 0