गुपचूप लाँच झाला Airtel चा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; स्वस्तात डेटा, एसएमएस आणि कॉलिंगही

Bharti Airtel नं आपल्या ग्राहकांना खुश करत new prepaid plan लाँच केला आहे. कंपनीनं गुपचूप 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला आहे जो 30 days validity सह येतो. याआधी देखील एयरटेलकडे युजर्सना 199 रुपयांचा प्लॅन होता परंतु त्यात फक्त 24 दिवसांची वॅलिडिटी मिळत होते. परंतु, आता 199 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वॅलिडिटी मिळत आहे. या रिचार्जमध्ये मिनार फायदे वेगळे आहेत. पुढे आम्ही तुम्हाला एयरटेलच्या या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती दिली आहे दरमहा 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा किफायतशीर प्लॅन आहे.

3GB मिळेल डेटा

199 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधता मिळते. तसेच या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 3जीबी डेटा मिळतो. हा वन टाइम डेटा आहे त्यामुळे याला डेली डेटा लिमिट नाही. पूर्ण वैधता संपेपर्यंत तुम्हाला हा डेटा कधीही वापरता येईल. तसेच, डेटा लिमिट संपल्यावर दर 1MB डेटासाठी तुम्हाला 50 पैसे खर्च करावे लागतील. हे देखील वाचा: Sumi Marathi Movie: तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; थेट ओटीटीवर होणार रिलीज

अनलिमिटेड फ्री कॉलिंग

इतकेच नव्हे तर नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा पण फायदा देखील मिळेल. तसेच कंपनी या प्लॅनमध्ये टोटल 300 फ्री एसएमएस देत आहे. अ‍ॅडिशनल बेनिफिट पाहता रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्यूजिकचं फ्री सब्सक्रिप्शन देखील. त्यामुळे ग्राहक त्यांच्या आवडीची हॅलोट्यून मोफत आपल्या कॉलर्सना ऐकवू शकतात.

block-airtel-sim-if-it-is-lost-or-stolen-know-these-easy-steps

या प्लॅनसह रिचार्ज केल्यानंतर युजर्सना उरलेले एसएमएस आणि डेटा कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. हा प्लॅन त्या लोकांसाठी चांगला म्हणता येईल जे किफायतशीर 30 दिवसांचा अनलिमिटेड कॉलिंग असलेला प्लॅन शोधत आहेत. हेव्ही डेटा युजर्सना हा प्लॅन आवडणार नाही. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात

296 रुपयांचा प्लॅन

कंपनी 296 रुपयांचा प्लॅन सादर केला होता जो 30 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. तसेच, या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 फ्री एसएमएस मिळतात. तसेच रिचार्जमध्ये एकूण 25जीबी डेटा ऑफर केला जातो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here