OPPO A12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Nov 2020 12:29:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo च्या या फोन्सच्या किंमतीत झाली मोठी कपात, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-oppo-a15-oppo-f17-oppo-reno3-pro-price-cut-in-india-offline-store/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-oppo-a15-oppo-f17-oppo-reno3-pro-price-cut-in-india-offline-store/#respond Mon, 23 Nov 2020 12:29:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9036 MySmartPrice वेबसाइटने ओपोचा एक अधिकृत दिसणारा प्रोमोशनल पोस्टर शेयर केला आहे. पोस्टर मध्ये Oppo A12, Oppo A15, Oppo F17 आणि Oppo Reno3 Pro च्या किंमतीत कपात केल्याची माहिती समोर आली आहे.

The post Oppo च्या या फोन्सच्या किंमतीत झाली मोठी कपात, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अलीकडेच आपल्या फॅन्ससाठी OPPO A33 स्मार्टफोनची किंमत कमी केली होती. तर आता बातमी समोर आली आहे कि कंपनीने एक साथ आपल्या चार फोन्सच्या किंमती कायमस्वरूपी कमी करत आहे. एका रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि कपात कायमस्वरूपी असल्यासोबतच ऑफलाइन स्टोर्ससाठी पण करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार फोन्स कमी किंमतीत ऑफलाइन स्टोर्स वर विकत घेता येतील. तसेच ओपो द्वारे या स्मार्टफोन्स मध्ये कमीत कमी 500 रुपये आणि अधिकतम 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

या फोन्सच्या किंमतीत झाली कपात

MySmartPrice वेबसाइटने ओपोचा एक अधिकृत दिसणारा प्रोमोशनल पोस्टर शेयर केला आहे. पोस्टर मध्ये Oppo A12, Oppo A15, Oppo F17 आणि Oppo Reno3 Pro च्या किंमतीत कपात केल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे कि हि कपात कायमस्वरूपी आहे आणि सध्या फक्त ऑफलाइन मार्केटसाठी आहे.

हे देखील वाचा : Oppo ने आणला जगातील सर्वात अनोखा फोन, स्क्रीनचा करता येईल कमी जास्त

नवीन किंमत

रिपोर्टनुसार, Oppo A12 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात झाली आहे, त्यामुळे याची किंमत 9,450 वरून कमी होऊन 8,990 रुपये झाली आहे. तसेच Oppo A15 के 2 जीबी + 32 जीबी आणि 3 जीबी + 32 जीबी वेरिएंट्सची नवीन किंमत क्रमश: 8,990 रुपये आणि 9,990 रुपये झाली आहे.

Oppo F17 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट वर 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर फोन 18,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच Oppo Reno3 Pro च्या 8 जीबी + 128 जीबी आणि 8 जीबी + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची नवीन किंमत क्रमश: 24,990 रुपये आणि 27,990 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅम सह आला Oppo K7x 5G, जाणून घ्या याची किंमत

विशेष म्हणजे OPPO ने ऑक्टोबर मध्ये भारतीय बाजारात आपल्या ‘ए सीरीज’ अंतगर्त नवीन स्मार्टफोन OPPO A33 लॉन्च केला होता. ओपो ए33 11,990 रुपयांमध्ये बाजारात आला होता. आता आपल्या फॅन्ससाठी ओपोने या फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर आता OPPO A33 स्मार्टफोन 10,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकत घेता येईल.

The post Oppo च्या या फोन्सच्या किंमतीत झाली मोठी कपात, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-oppo-a15-oppo-f17-oppo-reno3-pro-price-cut-in-india-offline-store/feed/ 0
फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला OPPO A12, यात आहे 4230एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-launched-in-india-4gb-ram-64gb-storage-4230-mah-battery-dual-camera-specs-price-sale-offer-cashback/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-launched-in-india-4gb-ram-64gb-storage-4230-mah-battery-dual-camera-specs-price-sale-offer-cashback/#respond Mon, 08 Jun 2020 09:50:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7345 OPPO A12 कंपनीने 3डी डायमंड ब्लेज डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे, जो वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो.

The post फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला OPPO A12, यात आहे 4230एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि टेक कंपनी ओपो भारतात आपले तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि हे डिवायसेज Oppo A11K, Oppo A12 आणि Oppo A52 नावाने लॉन्च केले जातील. आज आमच्या बातमी वर शिक्कामोर्तब करत ओपोने इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन फोन OPPO A12 लॉन्च केला आहे. ओपो ए12 फक्त 9,990 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 10 जून पासून देशातील ऑनलाईन व ऑफलाईन बाजारातून विकत घेता येईल.

लुक व डिजाईन

OPPO A12 कंपनीने 3डी डायमंड ब्लेज डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे, जो वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे, यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे.

कॅमेरा सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. OPPO A12 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पीकर आहे. या फोनचे डायमेंशन 15.59 x 7.55 x 0.83 आहे तसेच वजन 165 ग्राम आहे.

स्पेसिफिकेशन्स

OPPO A12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे. हा फोन 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. ओपो ए12 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 6.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज + 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन आईएमजी जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

OPPO A12 भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए12 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A12 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए12 मध्ये 4,230एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला आहे. किंमत पाहता OPPO A12 चा 3 जीबी + 32 जीबी वेरिएंट 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 11,490 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

The post फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला OPPO A12, यात आहे 4230एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-launched-in-india-4gb-ram-64gb-storage-4230-mah-battery-dual-camera-specs-price-sale-offer-cashback/feed/ 0
4 जीबी रॅम आणि 4230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ओपोचा लो बजेट फोन OPPO A12 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-officially-launched-4gb-ram-4230-mah-battery-price-sale-specs/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-officially-launched-4gb-ram-4230-mah-battery-price-sale-specs/#respond Fri, 17 Apr 2020 11:15:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7533 OPPO A12, OPPO A92 आणि OPPO Reno 3 Pro इंडोनेशियन बाजारात लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा ओपोने आपल्या ट्वीटर वर केली आहे.

The post 4 जीबी रॅम आणि 4230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ओपोचा लो बजेट फोन OPPO A12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO येत्या काही दिवसांत अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ओपो ए12 स्मार्टफोन बद्दल लीक्स समोर येत आहेत, तर आता ओपोने हा फोन समोर ठेवला आहे. कंपनीने OPPO A12 टेक मंचावर सादर केला आहे. ओपोने हा फोन इंडोनेशिया मध्ये अधिकृत केला आहे जो येत्या काही दिवसांत जागतिक बाजारात येईल. OPPO A12 सोबतच कंपनी OPPO A92 आणि OPPO Reno 3 Pro पण इंडोनेशियन मार्केट मध्ये घेऊन येत आहे जो येत्या 21 एप्रिल पासून तिथे लॉन्च होईल.

OPPO A12 च्या लॉन्चची माहिती कंपनीच्या ट्वीटर हँडल वरून मिळाली आहे. ओपो इंडोनेशियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर एका फोटोच्या माध्यमातून OPPO A12 ची किंमत आणि याच्या स्पेक्सची माहिती अधिकृत केली आहे. ओपो ए12 इंडोनेशियन मार्केट मध्ये आला आहे पण कंपनी येत्या 21 एप्रिलला हा अधिकृतपणे लॉन्च करेल. या दिवशी OPPO A12, OPPO A92 आणि OPPO Reno 3 Pro इंडोनेशियन बाजारात लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा ओपोने आपल्या ट्वीटर वर केली आहे.

OPPO A12

ओपो ए12 पाहता फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर ‘वी’ शेप नॉच आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या डावीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. OPPO A12 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. फोनचा बॅक पॅनल बऱ्याचअंशी Realme 3 सारखा आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पीकर आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO A12 6.22 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो कलरओएस 6 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ओपो ए12 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज + 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन आईएमजी जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

OPPO A12 इंडोनेशिया मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. तसेच हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए12 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A12 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी सह सिक्योरिटीसाठी इथे फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 4,230एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन इंडोनेशिया मध्ये ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला आहे. किंमत पाहता ओपो ए12 Rp.2,499,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसी नुसार 12,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4 जीबी रॅम आणि 4230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ओपोचा लो बजेट फोन OPPO A12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-officially-launched-4gb-ram-4230-mah-battery-price-sale-specs/feed/ 0
Exclusive: OPPO घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन OPPO A12e, फोन मध्ये असेल 4250एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-a12e-with-4230mah-battery-13mp-dual-rear-camera-launching-soon-india-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-a12e-with-4230mah-battery-13mp-dual-rear-camera-launching-soon-india-specs-price-sale/#respond Thu, 19 Mar 2020 13:22:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6839 आज 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून एका नवीन ओपो फोनची माहिती काढली आहे जो OPPO A12e नावाने लवकरच भारतात लॉन्च होईल.

The post Exclusive: OPPO घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन OPPO A12e, फोन मध्ये असेल 4250एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल कालच एक बातमी समोर आली होती ज्यात ब्रँडच्या ‘ए सीरीज’ मधील दोन नवीन स्मार्टफोन्सची माहिती मिळाली होती. हे दोन्ही फोन आईएमडीए सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाले होते आणि या फोन्सच्या नावाचा खुलासा OPPO A92 आणि OPPO A12 असा झाला होता. आईएमडीए वर कोणत्याही फोनचे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नव्हते पण स्पष्ट झाले होते कि OPPO लवकरच आपल्या ‘ए सीरीज’ मध्ये हे नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करू शकते. आज 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून एका नवीन ओपो फोनची माहिती काढली आहे जो OPPO A12e नावाने लवकरच भारतात लॉन्च होईल.

OPPO A12e

91मोबाईल्सला ओपो ए12ई संबंधित एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. OPPO A12e एक लो बजेट डिवाईस असेल, या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यासह मोठ्या बॅटरीने सुसज्ज असेल आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. OPPO ने हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल.

A11

OPPO A12e चे स्पेसिफिकेशन्स पाहता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 6.2 इंचाच्या आईपीएस एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोनचे डायमेंशन 156.2×75.6×8.2एमएम असेल आणि वजन 170ग्राम असेल. ओपो हा फोन तीन कलर वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल ज्यात ब्लॅक, पर्पल आणि रेड कलरचा समावेश असेल. इतर स्पेक्स पाहता ओपो ए12ई एंडरॉयड ओएस वर लॉन्च होईल आणि कलरओएस वर चालेल.

प्राप्त माहितीनुसार प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा एंट्री लेवल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 450 दिला जाईल. ओपो OPPO A12e भारतात 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल तसेच हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए12ई मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असेल.

A11

त्याचप्रमाणे OPPO A12e मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तर पावर बॅकअपसाठी ओपो ए12ई 4,230एमएएच बॅटरी सह बाजारात येईल. OPPO ने अजूनही ओपो ए12ई च्या लॉन्च संबंधित माहिती दिली नाही पण कंपनी लवकरच या फोनच्या इंडिया लॉन्चची घोषणा करू शकते.

The post Exclusive: OPPO घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन OPPO A12e, फोन मध्ये असेल 4250एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-a12e-with-4230mah-battery-13mp-dual-rear-camera-launching-soon-india-specs-price-sale/feed/ 0