91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि टेक कंपनी ओपो भारतात आपले तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि हे डिवायसेज Oppo A11K, Oppo A12 आणि Oppo A52 नावाने लॉन्च केले जातील. आज आमच्या बातमी वर शिक्कामोर्तब करत ओपोने इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन फोन OPPO A12 लॉन्च केला आहे. ओपो ए12 फक्त 9,990 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 10 जून पासून देशातील ऑनलाईन व ऑफलाईन बाजारातून विकत घेता येईल.
लुक व डिजाईन
OPPO A12 कंपनीने 3डी डायमंड ब्लेज डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे, जो वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे, यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे.
कॅमेरा सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. OPPO A12 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पीकर आहे. या फोनचे डायमेंशन 15.59 x 7.55 x 0.83 आहे तसेच वजन 165 ग्राम आहे.
स्पेसिफिकेशन्स
OPPO A12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे. हा फोन 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. ओपो ए12 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 6.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज + 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन आईएमजी जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.
OPPO A12 भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए12 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OPPO A12 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए12 मध्ये 4,230एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला आहे. किंमत पाहता OPPO A12 चा 3 जीबी + 32 जीबी वेरिएंट 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 11,490 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.