Oppo A5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Dec 2019 12:40:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6GB RAM असलेला OPPO A5 2020, फोन मध्ये आहे 5000mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-6gb-ram-128gb-storage-variant-launched-at-14990-rupees-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-6gb-ram-128gb-storage-variant-launched-at-14990-rupees-in-india/#respond Fri, 27 Dec 2019 12:40:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6137 हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6GB RAM असलेला OPPO A5 2020, फोन मध्ये आहे 5000mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतात आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतर्गत सप्टेंबर मध्ये दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 चा समावेश होता. हे दोन्ही डिवाईस क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह आले होते जे आज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहेत. Oppo A9 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरज आणि 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट सह बाजारात आला होता तर Oppo A5 3जीबी रॅम + 64जीबी तसेच 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट सह लॉन्च केला गेला होता. आज ओपो ए5 2020 अजून ताकदवान बनावट OPPO ने या डिवाईसचा अजून एक नवीन वेरिएंट इंडिया मध्ये लॉन्च केला आहे. हा वेरिएंट 6 जीबी रॅम मेमरी तसेच 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये आला आहे.

Oppo A5 2020 च्या या नवीन वेरिएंटची माहिती द मोबाइल इंडियन वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या नवीन वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच हा फोन वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे. Oppo A5 2020 च्या आधीचे वेरिएंट्स पाहता फोनचा 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो आता 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A5 2020

स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A5 2020 720 x 1,600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Oppo A5 2020 दोन वेरिंएट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A5 2020 मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Oppo A5 2020 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी व ओटीजी सपोर्ट सोबत Oppo A5 2020 मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A9 2020 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम + 128जीबी वेरिएंटचा समावेश आहे. फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 15,990 रुपये तर 8जीबी रॅम वेरिएंट 18,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6GB RAM असलेला OPPO A5 2020, फोन मध्ये आहे 5000mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-6gb-ram-128gb-storage-variant-launched-at-14990-rupees-in-india/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-price-cut-in-india-smartphone-diwali-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-price-cut-in-india-smartphone-diwali-offer-sale/#respond Tue, 22 Oct 2019 12:32:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5553 Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यावर हा 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने सप्टेंबर मध्ये भारतात आपली ‘ए’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह आले होते जे आज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहेत. मागे OPPO ने आपल्या फॅन्सना दिवाळीची भेट देत A9 2020 स्मार्टफोनची किंमत कमी केली होती आणि या फोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी झाली होती. आता कंपनीने या सीरीजच्या दुसऱ्या फोन Oppo A5 2020 ची किंमत पण कमी केली आहे.

Oppo A5 2020 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी होती. Oppo ने या फोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंट मध्ये प्राइज कटची घोषणा केली आहे. Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यावर हा 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo A5 2020

स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A5 2020 720 x 1,600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Oppo A5 2020 दोन वेरिंएट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A5 2020 मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Oppo A5 2020 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी व ओटीजी सपोर्ट सोबत Oppo A5 2020 मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A9 2020 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम + 128जीबी वेरिएंटचा समावेश आहे. अलीकडेच Oppo ने फोनच्या 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी केली होती. ज्यामुळे 16,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा वेरिएंट 15,990 सेल साठी उपलब्ध आहे. तर फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-price-cut-in-india-smartphone-diwali-offer-sale/feed/ 0
4जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला ओपो ए5, किंमत फक्त 14,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 22 Aug 2018 12:03:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1800 ओपो ए5 कंपनी ने आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध केला आहे. देशातील आॅफलाईन बाजारात हा फोन 14,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो सेल साठी उपलब्ध झाला आहे.

The post 4जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला ओपो ए5, किंमत फक्त 14,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात आम्ही एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कंपनी ओपो लवकरच इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला नवीन फोन ओपो ए5 लॉन्च करणार आहे. त्यानुसार आज ओपो ने आपला हा स्मार्टफोन सेल साठी सादर केला आहे. ओपो ए5 कंपनी ने आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध केला आहे. देशातील आॅफलाईन बाजारात हा फोन 14,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो सेल साठी उपलब्ध झाला आहे.

ओपो ए5 इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन चा डिस्प्ले 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 वर सादर करण्यात आला आहे तसेच 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. ओपो ए5 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओपो ए5 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर ला सपोर्ट करतो. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन मिरर ब्लू आणि मिरर पिंक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. जो 14,990 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन स्टोर मधून विकत घेता येईल.

The post 4जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला ओपो ए5, किंमत फक्त 14,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच बॅटरी वाला ओपो ए5 पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-to-launch-in-india-next-week-at-rs15000-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-to-launch-in-india-next-week-at-rs15000-price-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 06 Aug 2018 12:04:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1589 ओपो ए5 बद्दल सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की कंपनी पुढल्या आठवड्यात आपला नवीन स्मार्टफोन ओपो ए5 इंडिया मध्ये लॉन्च करेल.

The post एक्सक्लूसिव : 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच बॅटरी वाला ओपो ए5 पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने गेल्या महिन्यात आपला नवीन नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा वाला स्मार्टफोन ओपो ए5 लॉन्च केला होता. चीन मध्ये हा फोन 1,499 युआन मध्ये लॉन्च झाला आहे जे भारतीय करंसी मध्ये 15,500 रुपये होताता. तसेच आता 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे की ओपो आपला हा स्टाईलिश स्मार्टफोन लवकरच भारतात घेऊन येणार आहे. बातमी अशी आहे की ओपो ए5 येत्या आठवड्यात भारतात लॉन्च केला जाऊ शकतो तसेच देशात या फोनची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असेल.

ओपो ए5 बद्दल सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की कंपनी पुढल्या आठवड्यात आपला नवीन स्मार्टफोन ओपो ए5 इंडिया मध्ये लॉन्च करेल. विशेष म्हणजे ओपो चा हा फोन आॅनलाईन शॉपिंग साइट सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. देशात हा फोन 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला जाईल तसेच याची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असेल.

ओपो ए5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन नॉच डिस्प्ले सेग्मेंट मध्ये सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन चा डिस्प्ले 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 वर सादर करण्यात आला आहे तसेच 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

ओपो ए5 ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओपो ए5 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर ला सपोर्ट करतो. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन मिरर ब्लू आणि मिरर पिंक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. आशा आहे की भारतात पण हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह येईल. फोन ची लॉन्च डेट लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल.

The post एक्सक्लूसिव : 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच बॅटरी वाला ओपो ए5 पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-to-launch-in-india-next-week-at-rs15000-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0
ओपो घेऊन येत आहे नॉच डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन ए3एस, 10,990 रुपयांमध्ये होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-to-launch-in-india-with-notch-display-4230-mah-battery-specification-price-rs-10990-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-to-launch-in-india-with-notch-display-4230-mah-battery-specification-price-rs-10990-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 10:03:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1191 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ओपो ए5 चे स्पेसिफिकेशन्स गॅजेट360 द्वारा सांगण्यात आलेल्या ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स शी मिळते जुळते आहेत.

The post ओपो घेऊन येत आहे नॉच डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन ए3एस, 10,990 रुपयांमध्ये होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या आठवड्यात टेक कंपनी ओपो ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला नवीन नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 सादर केला आहे. हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनी बाजारात सादर करण्यात आला आहे. पण आता बातमी समोर येत आहे की कंपनी हा स्मार्टफोन या महिन्यात भारतीय बाजारात पण लॉन्च करू शकते आणि देशात हा स्मार्टफोन ए3एस नावाने सादर होईल.

गॅजेट360 ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की ओपो लवकरच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन ए3एस लॉन्च करणार आहे. रिपोर्ट नुसार देशात हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की फोन 2जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ओपो ए5 चे स्पेसिफिकेशन्स गॅजेट360 द्वारा सांगण्यात आलेल्या ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स शी मिळते जुळते आहेत. त्यामुळे असे म्हणू शकतो की कदाचित ओपो कंपनी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ए5 ला भारतात ए3एस नावाने सादर करेल. रिपोर्ट मध्ये या फोन मध्ये 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी मेमरी असल्याचे सांगितले आहे तर चीन मध्ये ओपो ए5 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला आहे.

ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर केला जाऊ शकतो ज्या सोबत 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

रिपोर्ट नुसार या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तसेच डुअल सिम व 4जी वोएलटीई सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते. पण तरीही ए3एस साठी ओपो अधिकृत घोषणा व मीडिया इन्वाईट ची वाट बघितली जात आहे.

The post ओपो घेऊन येत आहे नॉच डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन ए3एस, 10,990 रुपयांमध्ये होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-to-launch-in-india-with-notch-display-4230-mah-battery-specification-price-rs-10990-in-marathi/feed/ 0
4,230 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लीक झाला ओपो चा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-leak-on-weibo-with-specifications-notch-display-dual-rear-camera-4230mah-battery-4gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-leak-on-weibo-with-specifications-notch-display-dual-rear-camera-4230mah-battery-4gb-ram-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 06:46:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1100 फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात.

The post 4,230 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लीक झाला ओपो चा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने एप्रिल मध्ये आपल्या ‘ए सीरीज’ मध्ये नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए3 लॉन्च केला होता. हा फोन सध्या चीन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. पण आता ओपो च्या अजून एका स्मार्टफोन ची माहिती समोर आली आहे. ओपो च्या ए सीरीज चा आगामी स्मार्टफोन ए5 चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला आहे. तिथून फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे. आशा आहे की येत्या महिन्यात ओपो ए5 टेक बाजारात लॉन्च केला जाईल.

वेईबो वर ओपो ए5 च्या स्पेसिफिकेशन्स सोबत याचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर नॉच डिस्प्ले आणि बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखविण्यात आला आहे. पण फोन मध्ये फिंगर​प्रिंट सेंसर दिसत नाही, त्यामुळे हा फोन फेस अनलॉक टेक्निकला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या आईपीएस डिस्प्ले सह सादर केला जाईल जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

ओपो ए5 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये याच्या बॅक पॅनल वर डायमंड फिनिश दाखविण्यात आली आहे. लीक नुसार हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर केला जाईल आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल. कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम देऊ शकते. तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज पण असू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. तर सेल्फी साठी या फोन च्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा कॅमेरा सपोर्ट दिला जाऊ शकतो. ओपो ए5 मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची बॅटरी असण्याची शक्यता या लीक मध्ये वर्तवण्यात आली आहे. पण ओपो ए5 बद्दल अजूनतरी कंपनी कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

The post 4,230 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लीक झाला ओपो चा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-leak-on-weibo-with-specifications-notch-display-dual-rear-camera-4230mah-battery-4gb-ram-in-marathi/feed/ 0