4,230 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लीक झाला ओपो चा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5

टेक कंपनी ओपो ने एप्रिल मध्ये आपल्या ‘ए सीरीज’ मध्ये नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए3 लॉन्च केला होता. हा फोन सध्या चीन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. पण आता ओपो च्या अजून एका स्मार्टफोन ची माहिती समोर आली आहे. ओपो च्या ए सीरीज चा आगामी स्मार्टफोन ए5 चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला आहे. तिथून फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे. आशा आहे की येत्या महिन्यात ओपो ए5 टेक बाजारात लॉन्च केला जाईल.

वेईबो वर ओपो ए5 च्या स्पेसिफिकेशन्स सोबत याचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर नॉच डिस्प्ले आणि बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखविण्यात आला आहे. पण फोन मध्ये फिंगर​प्रिंट सेंसर दिसत नाही, त्यामुळे हा फोन फेस अनलॉक टेक्निकला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या आईपीएस डिस्प्ले सह सादर केला जाईल जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

ओपो ए5 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये याच्या बॅक पॅनल वर डायमंड फिनिश दाखविण्यात आली आहे. लीक नुसार हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर केला जाईल आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल. कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम देऊ शकते. तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज पण असू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. तर सेल्फी साठी या फोन च्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा कॅमेरा सपोर्ट दिला जाऊ शकतो. ओपो ए5 मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची बॅटरी असण्याची शक्यता या लीक मध्ये वर्तवण्यात आली आहे. पण ओपो ए5 बद्दल अजूनतरी कंपनी कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here