OPPO A53 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 18 Dec 2020 07:12:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6GB रॅम असलेला सर्वात स्वस्त 5G फोन Oppo A53 स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-launched-with-6g-ram-dimensity-720-90hz-refresh-rate/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-launched-with-6g-ram-dimensity-720-90hz-refresh-rate/#respond Fri, 18 Dec 2020 07:12:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9356 OPPO A53 5G कंपनीने सध्या चीन मध्ये सादर केला आहे. ओपोच्या लोकप्रिय A सीरीज अंतगर्त लॉन्च झालेल्या हा डिवाइस सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स पैकी एक असल्याचे बोलले जात रहा आहे.

The post 6GB रॅम असलेला सर्वात स्वस्त 5G फोन Oppo A53 स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात मिड-रेंज कॅटेगरी मध्ये OPPO A53 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता या शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेल्या डिवाइस नंतर कंपनीने हँडसेट याचा 5जी मॉडेल सादर केला आहे. OPPO A53 5G कंपनीने सध्या चीन मध्ये सादर केला आहे. ओपोच्या लोकप्रिय A सीरीज अंतगर्त लॉन्च झालेल्या हा डिवाइस सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स पैकी एक असल्याचे बोलले जात रहा आहे. आशा आहे कि येत्या काही आठवड्यांमध्ये हा दुसऱ्या देशांमध्ये पण लॉन्च केला जाईल.

लुक व डिजाइन

सध्या ओपोच्या ऑफिशियल वेबसाइट वर हा फोन रिजर्वेशनसाठी उपलब्ध आहे. डिजाइन बद्दल बोलायचे तर 5G वेरिएंटचा फ्रंट लुक 4G वेरिएंट प्रमाणेच आहे. पण मागच्या लुक मध्ये कंपनीने बदल केला आहे. OPPO A53 5G मध्ये फ्रंटला वरच्या बाजूला डावीकडे पंच होल देण्यात आला आहे. तसेच मागे चौकोनी क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह फक्त 10,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला Xiaomi Redmi 9 Power

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन सह 6.5 इंचाचा LCD पॅनल देण्यात आला आहे. सोबतच फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. प्रोसेसर पाहता या फोन मध्ये तुम्हाला मीडियाटेक Dimensity 720 चिपसेट मिळेल. फोन मध्ये 4GB रॅम व 6GB रॅम सह 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी हँडसेटच्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा मेन कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेंस आहे. सोबतच फोनला पावर देण्यासाठी यात 4040mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पण यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही. तसेच साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असलेल्या या फोन मध्ये 3.5mm हेडफोन जॅक पण आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी सह समोर आला नवीन Motorola फोन, 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह लवकरच होऊ शकतो लाॅन्च

किंमत

फोन 4जीबी/6जीबी रॅम ऑप्शन आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला गेला आहे. किंमत पाहता डिवाइसचा 4जीबी रॅम वेरियंटची किंमत 1299 युआन (जवळपास 14,600 रुपये) आहे. तर दुसऱ्या रॅम वेरिएंटची किंमत मात्र समजली नाही. फोन कंपनीने पर्पल, लेक ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे.

The post 6GB रॅम असलेला सर्वात स्वस्त 5G फोन Oppo A53 स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-launched-with-6g-ram-dimensity-720-90hz-refresh-rate/feed/ 0
OPPO A53 5G बनू शकतो ब्रँडचा सर्वात स्वस्त 5जी फोन, डिसेंबर मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-with-dimensity-720-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-with-dimensity-720-specs-price-sale/#respond Thu, 26 Nov 2020 13:41:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9083 OPPO A53 5G अँड्रॉइड 10 ओएस वर आधारित फोन आहे जो कलरओएस सह चालतो.

The post OPPO A53 5G बनू शकतो ब्रँडचा सर्वात स्वस्त 5जी फोन, डिसेंबर मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत लोवर मिडबजेट मध्ये OPPO A53 स्मार्टफोन लॉन्च केला होता. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा डिवायस खूप लोकांना आवडला आहे. तसेच आता बातमी येत आहे कि कंपनी या फोनचा 5जी मॉडेल पण घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार OPPO A53 5G चीन मध्ये सादर करण्यात आला आहे जिथे येत्या 1 डिसेंबर पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी पण उपलब्ध होईल.

OPPO A53 5G प्रोडक्ट लाइब्रेरी ऑफ चायना टेलिकॉम वर लिस्ट केला गेला आहे, जिथे सांगण्यात आले आहे कि हा फोन 1 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. लिस्टिंग मध्ये ओपो ए53 5जी दोन वेरिएंट्स मध्ये दाखवण्यात आला आहे. एक वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह येतो ज्याची किंमत 1599 युआन (जवळपास 17,900 रुपये) आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत 1799 युआन (जवळपास 20,000 रुपये) आहे.

OPPO A53 5G

ओपो ए53 5जी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइट लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला जाईल जो 6.53 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. समोर आलेल्या फोटोज मध्ये फोनची स्क्रीन बेजल लेस दाखवण्यात आली आहे ज्याच्या खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे.

OPPO A53 5G अँड्रॉइड 10 ओएस वर आधारित फोन आहे जो कलरओएस सह चालतो. या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा डायमनसिटी 720 चिपसेट देण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये ओपो ए53 5जी फोनचे दोन रॅम वेरिएंट समोर आले आहेत. छोट्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

हे देखील वाचा : आता पासून फक्त 8,490 रुपयांमध्ये मिळेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला OPPO A15

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए53 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूस डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबतच दोन 2 मेगापिक्सलचे सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO A53 5G मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

OPPO A53 5G मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए53 5जी स्मार्टफोन मध्ये 3,945एमएएचची बॅटरी असल्याचे वेबसाइटच्या माध्यमातून समोर आले आहे. बातमी अशी आहे कि ओपो ए53 5जी स्मार्टफोन Streamer Purple, Lake Green आणि Secret Night Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post OPPO A53 5G बनू शकतो ब्रँडचा सर्वात स्वस्त 5जी फोन, डिसेंबर मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-with-dimensity-720-specs-price-sale/feed/ 0