OPPO A53 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Apr 2021 11:33:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo ने दिला Xiaomi, Realme आणि Samsung ला जबरदस्त धक्का, कमी केली दमदार स्मार्टफोनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-gets-new-price-in-india-check-new-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-gets-new-price-in-india-check-new-price-specifications/#respond Fri, 30 Apr 2021 11:33:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10769 Oppo A53 स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात दोन वेरिएंटमध्ये सादर केला आहे. OPPO A53 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेटसह 4GB आणि 6GB रॅम ऑप्शनसह सादर केला गेला आहे.

The post Oppo ने दिला Xiaomi, Realme आणि Samsung ला जबरदस्त धक्का, कमी केली दमदार स्मार्टफोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतीय बाजारात Xiaomi, Realme आणि Samsung सारख्या ब्रँड्सना झटका देत आपल्या दमदार स्मार्टफोन Oppo A53 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 2500 रुपयांची कपात केली आहे. ओप्पोच्या स्मार्टफोन Oppo A53 च्या नवीन किंमती आज 30 एप्रिलपासून लागू होती. Oppo A53 स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केला होता. कंपनीने अलीकडेच या स्मार्टफोनचा 5G वेरिएंट पण लॉन्च केला आहे. पण कंपनीने 4G वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. (Oppo A53 gets new price in India check new price specifications)

Oppo A53 ची नवीन किंमत

Oppo A53 स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात दोन वेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन आता 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यापूर्वी ओप्पोचा हा फोन 12,990 रुपयांमध्ये विकला जात होता. तसेच या स्मार्टफोनचा टॉप वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह आता 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. किंमतीत कपात होण्यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत 15,490 रुपये होती. म्हणजे या वेरिएंटची किंमतीत 2500 रुपयांनी कमी झाली आहे.

हे देखील वाचा : फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन OPPO A53s, Xiaomi आणि Realme ला आव्हान मिळणे निश्चित

Oppp A53 स्पेसिफिकेशन्स

OPPO A53 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेटसह 4GB आणि 6GB रॅम ऑप्शनसह सादर केला गेला आहे. OPPO A53 स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी रियर पॅनलमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : OPPO A95 5G स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 4,310mAh बॅटरी आणि फास्ट चार्जसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO A53 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटी पाहता या फोनमध्ये डुअल सिम 4G VoLTE सपोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

ओपो ए53 2020 व्हिडीओ

The post Oppo ने दिला Xiaomi, Realme आणि Samsung ला जबरदस्त धक्का, कमी केली दमदार स्मार्टफोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-gets-new-price-in-india-check-new-price-specifications/feed/ 0
OPPO A53 5G बनू शकतो ब्रँडचा सर्वात स्वस्त 5जी फोन, डिसेंबर मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-with-dimensity-720-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-with-dimensity-720-specs-price-sale/#respond Thu, 26 Nov 2020 13:41:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9083 OPPO A53 5G अँड्रॉइड 10 ओएस वर आधारित फोन आहे जो कलरओएस सह चालतो.

The post OPPO A53 5G बनू शकतो ब्रँडचा सर्वात स्वस्त 5जी फोन, डिसेंबर मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत लोवर मिडबजेट मध्ये OPPO A53 स्मार्टफोन लॉन्च केला होता. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा डिवायस खूप लोकांना आवडला आहे. तसेच आता बातमी येत आहे कि कंपनी या फोनचा 5जी मॉडेल पण घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार OPPO A53 5G चीन मध्ये सादर करण्यात आला आहे जिथे येत्या 1 डिसेंबर पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी पण उपलब्ध होईल.

OPPO A53 5G प्रोडक्ट लाइब्रेरी ऑफ चायना टेलिकॉम वर लिस्ट केला गेला आहे, जिथे सांगण्यात आले आहे कि हा फोन 1 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. लिस्टिंग मध्ये ओपो ए53 5जी दोन वेरिएंट्स मध्ये दाखवण्यात आला आहे. एक वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह येतो ज्याची किंमत 1599 युआन (जवळपास 17,900 रुपये) आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत 1799 युआन (जवळपास 20,000 रुपये) आहे.

OPPO A53 5G

ओपो ए53 5जी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइट लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला जाईल जो 6.53 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. समोर आलेल्या फोटोज मध्ये फोनची स्क्रीन बेजल लेस दाखवण्यात आली आहे ज्याच्या खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे.

OPPO A53 5G अँड्रॉइड 10 ओएस वर आधारित फोन आहे जो कलरओएस सह चालतो. या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा डायमनसिटी 720 चिपसेट देण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये ओपो ए53 5जी फोनचे दोन रॅम वेरिएंट समोर आले आहेत. छोट्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

हे देखील वाचा : आता पासून फक्त 8,490 रुपयांमध्ये मिळेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला OPPO A15

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए53 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूस डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबतच दोन 2 मेगापिक्सलचे सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO A53 5G मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

OPPO A53 5G मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए53 5जी स्मार्टफोन मध्ये 3,945एमएएचची बॅटरी असल्याचे वेबसाइटच्या माध्यमातून समोर आले आहे. बातमी अशी आहे कि ओपो ए53 5जी स्मार्टफोन Streamer Purple, Lake Green आणि Secret Night Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post OPPO A53 5G बनू शकतो ब्रँडचा सर्वात स्वस्त 5जी फोन, डिसेंबर मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-5g-with-dimensity-720-specs-price-sale/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह OPPO A53 भारतात झाला लॉन्च, बेस किंमत 12,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-launched-in-india-with-5000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-launched-in-india-with-5000mah-battery-specs-price-sale/#respond Wed, 26 Aug 2020 09:34:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7857 OPPO A53 भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह OPPO A53 भारतात झाला लॉन्च, बेस किंमत 12,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि याअंतर्गत OPPO F17 आणि OPPO F17 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. ओपो एफ17 सीरीजची लॉन्च डेट अजूनतरी समोर आली नाही पण त्याआधी कंपनीने काल आपल्या ‘ए सीरीज’ चा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO A53 भारतात लॉन्च केला आहे. हा फोन 12,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होतील.

लुक व डिजाईन

OPPO A53 कंपनीने बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो स्क्रीनच्या वर डावीकडे आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे चौकोनी आकारात आहे. यात कॅमेरा सेंसर्स वर्टिकल आहेत तर बाजूला फ्लॅश लाईट आणि लेंसची माहिती लिहिलेली आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे. लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पीकर आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO A53 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. ओपो ए53 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर OPPO A53 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर फोन मध्ये आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए53 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A53 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए53 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट व किंमत

OPPO A53 भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 12,990 रुपये आहे. तसेच फोनचा मोठा वेरिएंट 15,490 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो ए53 Electric Black, Fairy White आणि Fancy Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह OPPO A53 भारतात झाला लॉन्च, बेस किंमत 12,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-launched-in-india-with-5000mah-battery-specs-price-sale/feed/ 0