OPPO A57s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 31 Aug 2022 05:28:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ओप्पोनं केली कमाल! स्वस्तात लाँच केला 50MP Camera आणि 5000mAh बॅटरी असलेला OPPO A57s https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a57s-launched-know-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a57s-launched-know-price-specifications-details/#respond Wed, 31 Aug 2022 05:28:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12661 ओप्पोनं टेक मंचावर आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘ए सीरीज’ अंतगर्त नवीन स्मार्टफोन OPPO A57s लाँच केला आहे. हा मोबाइल फोन सर्वप्रथम युरोपमधील क्रोशियामध्ये सेलसाठी उपलब्ध होईल त्यानंतर भारतीय बाजारात एंट्री घेईल. स्टायलिश लुक असलेल्या ओप्पो ए57एस मध्ये 50MP Camera, 33W SuperVOOC 5,000mAh Battery आणि Mediatek Helio G35 सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. पुढे आम्ही या […]

The post ओप्पोनं केली कमाल! स्वस्तात लाँच केला 50MP Camera आणि 5000mAh बॅटरी असलेला OPPO A57s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओप्पोनं टेक मंचावर आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘ए सीरीज’ अंतगर्त नवीन स्मार्टफोन OPPO A57s लाँच केला आहे. हा मोबाइल फोन सर्वप्रथम युरोपमधील क्रोशियामध्ये सेलसाठी उपलब्ध होईल त्यानंतर भारतीय बाजारात एंट्री घेईल. स्टायलिश लुक असलेल्या ओप्पो ए57एस मध्ये 50MP Camera, 33W SuperVOOC 5,000mAh Battery आणि Mediatek Helio G35 सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. पुढे आम्ही या OPPO A57s स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची सविस्तर माहिती दिली आहे.

OPPO A57s Specifications

ओप्पो ए57एस स्मार्टफोनमध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.56 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कंपनीनं 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह सादर केला आहे. फोनची स्क्रीन 269पीपीआय, 600निट्स ब्राइटनेस व 16.7एम कलर डेप्थला सपोर्ट करते. तसेच सुरक्षेसाठी याला पांडा एमएन228 ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हे देखील वाचा: 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला 6GB RAM असलेला स्वस्त OPPO फोन, 5000 mAh बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा

OPPO A57s अँड्रॉइड आधारित कलरओएसवर चालतो. या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन आयएमजी जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पो ए57एस स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच या मोबाइलच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तर एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे.

OPPO A57s 4G फोन ड्युअल सिम, 3.5एमएम जॅक सहित अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 33वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग

OPPO A57s Price in India

ओप्पो ए57एस स्मार्टफोन युरोपमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे ज्यात 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. मात्र कंपनीनं सध्यातरी फोनची किंमत गुलदस्त्यात ठेवली आहे, आशा आहे की भारतीय करंसीनुसार OPPO A57s 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हा मोबाइल फोन Starry Black आणि Sky Blue कलरमध्ये ग्राहकांना विकत घेता येईल. लवकरच OPPO A57s च्या भारतीय लाँचची घोषणा देखील केली जाऊ शकते.

The post ओप्पोनं केली कमाल! स्वस्तात लाँच केला 50MP Camera आणि 5000mAh बॅटरी असलेला OPPO A57s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a57s-launched-know-price-specifications-details/feed/ 0