शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग

Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतात ‘वी25 सीरीज’ अंतगर्त Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच केला होता जो Dimencity 1300 SoC, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera सारख्या स्पेसिफिकेशन्ससह 35,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन विवोनं मलेशियन मार्केटमध्ये सादर केला आहे. MediaTek Helio G99 SoC, 8GB RAM आणि 44W fast charging सह नवीन मोबाइल फोन Vivo V25e लाँच झाला आहे. पुढे आम्ही जागतिक बाजारात आलेल्या विवो वी25ई स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Vivo V25e चे स्पेसिफिकेशन्स

विवो वी25ई स्मार्टफोन 2404 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. कंपनीनं आपला फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे जो 1300निट्स ब्राइटनेस व 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री

Vivo V25e अँड्रॉइड 12 वर आधारित कंपनीच्याच फनटच ओएस12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आहे. तर ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. मलेशियामध्ये हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी विवो वी25ई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2एमपी बोका लेन्स व एफ/2.4 अपर्चर असलेली 2एमपी मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा

Vivo V25e 4जी एलटीईवर चालतो तसेच यात ड्युअल सिम, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ 5.2 व अन्य कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालते.

Vivo V25e ची किंमत आणि उपलब्धता

Vivo V25e स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट मलेशियन बाजारात दाखल झाला आहे, ज्यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. विवो वी25ई च्या या मॉडेलची किंमत मलेशियामध्ये RM 1,399 म्हणजे सुमारे 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Diamond Black आणि Sunrise Gold या दोन कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं विवो वी25ई च्या भारतीय लाँचची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हा हँडसेट भारतीय ग्राहकांच्या सेवेत देखील दाखल होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here