Oppo A97 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 14 Jul 2022 09:25:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 19GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; OPPO चा हा फोन Vivo आणि Oneplus ला टक्कर देण्यासाठी सज्ज https://www.91mobiles.com/marathi/oppo-a97-launch-with-19gb-ram-dimensity-810-processor/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a97-launch-with-19gb-ram-dimensity-810-processor/#respond Thu, 14 Jul 2022 09:25:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11397 OPPO ची फ्लॅगशिप Reno8 सीरिज लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. ही जरी प्रीमियम स्मार्टफोन सिरीज असली तरी कंपनीनं मिडरेंजकडे दुर्लक्ष केलेलं नाही. OPPO नं नवीन OPPO A97 5G स्मार्टफोन Dimensity 810 चिपसेटसह लाँच केला आहे. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. या ओप्पो फोनमध्ये 12 जीबी […]

The post 19GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; OPPO चा हा फोन Vivo आणि Oneplus ला टक्कर देण्यासाठी सज्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ची फ्लॅगशिप Reno8 सीरिज लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. ही जरी प्रीमियम स्मार्टफोन सिरीज असली तरी कंपनीनं मिडरेंजकडे दुर्लक्ष केलेलं नाही. OPPO नं नवीन OPPO A97 5G स्मार्टफोन Dimensity 810 चिपसेटसह लाँच केला आहे. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. या ओप्पो फोनमध्ये 12 जीबी रॅम देण्यात आला आहे, तसेच एक्सटेंडेड रॅम फीचरच्या मदतीनं एकूण 19GB पर्यंतच्या रॅमची ताकद मिळवता येईल.

OPPO A97 चे स्पेसिफिकेशन

OPPO A97 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन 6.6 इंचाच्या Full HD+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. तसेच फोनमध्ये तुम्हाला IPS LCD डिस्प्ले मिळेल. कंपनीनं 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटचा वापर केला आहे. किंमत पाहता हा कमी वाटतो कारण या प्राईस रेंजमध्ये 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट असलेले फोन उपलब्ध आहेत. फोनच्या स्क्रीनवर वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हे देखील वाचा: त्याच किंमतीत आता 4GB डेली डेटा; Vodafone Idea कडून ग्राहकांना मोठी भेट, न वापरलेला डेटा वाया जाणार नाही

हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 810 चिपसेटवर चालतो. 6nm फॅब्रिकेशनवर बनवण्यात आलेल्या या चिपसेटमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4GHz मॅक्सिमम क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 जीपीयू मिळतो. कंपनीनं स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट चिनी बाजारात सादर केला आहे. या हँडसेटमध्ये 12GB आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.

Oppo A97 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 48MP चा इतकं आहे, जो f/1.8 अपर्चरसह येतो. तसेच 2MP चा सेकंडरी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे जो f/2.4 अपर्चरसह सादर करण्यात आला आहे आहे. फ्रंटला तुम्हाला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल सिम 5जी फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ 3.5mm हेडफोन जॅक आणि USB-C पोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये तुम्हाला 5000 एमएएचची बॅटरी मिळते, जी 33W Super VOOC चार्जिंगला स्पोर्टक करते.

OPPO A97 ची किंमत

ओप्पो ए97 स्मार्टफोन कंपनीनं सध्या चीनमध्ये सादर केला आहे जिथे या फोनची किंमत 2099 युआन ठेवण्यात आली आहे, जी भारतीय करंसीनुसार जवळपास 23,000 रुपये आहे. फोन दिसायला खूप स्टायलिश आहे आणि कंपनीनं हा क्वॉईट नाईट आणि डार्क ब्लू अशा दोन रंगात सादर केला आहे. हे देखील वाचा: कधीच हँग होणार नाही हा फोन? 18GB रॅमसह दणकट स्मार्टफोनची एंट्री, किंमत वनप्लसपेक्षा कमी

किंमत आणि फीचर्स पाहता या फोन महाग वाटत आहे. या प्राईस रेंजमध्ये OPPO A97 ला Realme 9 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus सारख्या फोन्सकडून चांगली टक्कर मिळेल. तसेच Oneplus Nord 2 CE Lite, iQOO Z6 Pro आणि Samsung Galaxy M52 सारखे हँडसेटचा देखील ग्राहक विचार करू शकतात.

The post 19GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; OPPO चा हा फोन Vivo आणि Oneplus ला टक्कर देण्यासाठी सज्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a97-launch-with-19gb-ram-dimensity-810-processor/feed/ 0