त्याच किंमतीत आता 4GB डेली डेटा; Vodafone Idea कडून ग्राहकांना मोठी भेट, न वापरलेला डेटा वाया जाणार नाही

विआय (वोडाफोन आयडिया) नं जास्त युजर्सना आकर्षित करण्यासाठी आपल्या 409 आणि 475 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये मोठे बदल केले आहेत. टेलीकॉम कंपनी आता या दोन्ही प्लॅनमध्ये प्रतिदिन 1GB जास्त इंटरनेट डेटा देत आहे. तसेच voice calls, SMS, आणि OTT subscription सह रिचार्ज पॅकच्या वैधतेते कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढे आम्ही 409 आणि 475 रुपयांच्या विआय प्रीपेड प्लॅनमधील नवीन बेनिफिट्सची माहिती दिली आहे.

409 रुपयांचा Vi प्लॅन

409 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह 84 जीबी ऐवजी एकूण 98GB डेटा (3.5GB/ दिन) मिळतो. तसेच प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड आउटगोइंग कॉल्स मिळतात. हा प्लॅन 100 एसएमएस डेली कोट्यासह येतो. 409 रुपयांचा प्लॅनमध्ये ‘बिंज ऑल नाईट’ बेनिफिटसह येतो, त्यामुळे तुम्ही रोजच्या डेटा लिमिट खर्च न करता रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट मोफत अ‍ॅक्सेस करू शकता.

  • 28 दिवसांची वैधता
  • 3.5GB हाय स्पीड 4G डेटा प्रतिदिन
  • 100 एसएमएस प्रतिदिन
  • कॉम्प्लिमेंट्री Vi मुव्ही आणि TV अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस
  • 12 AM मिडनाईट ते 6 AM पर्यंत फ्री हाय-स्पीड डेटा
  • वीकएन्ड डेटा रोलओव्हर

या प्लॅनमध्ये तुम्हाला ‘वीकेंड डेटा रोलओव्हर’ फीचर देखील मिळतं. त्यामुळे तुम्ही सोमवार ते शुक्रवार दरम्यान न वापरलेला इंटरनेट डेटा शनिवार आणि रविवारी वापरू शकता. हा डेटा संपवण्यासाठी तुम्ही विकेंडला विआय मुव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपचा वापर करू शकता, ज्याचं मोफत सब्सस्क्रिप्शन देखील प्लॅनमध्ये दिलं जात आहे. याव्यतिरिक्त, ‘डेटा डिलाईट्स’ चा वापर करून तुम्ही दरमहा तुमच्या 2GB महत्वपूर्ण डेटाचा बॅकअप मोफत घेऊ शकता.

475 रुपयांचा Vi प्लॅन

विआयचा 475 रुपयांचा प्लॅन 4 जीबी डेली हाय-स्पीड 4 जी इंटरनेट देतो. हा फोन 28 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत 100 एसएमएस प्रतिदिन दिले जातात. फ्री एसएमएस सम्पल्यावर लोकल एसएमएससाठी 1 रुपया तर एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपया चार्ज केला जाईल. जास्त डेटा सोडला तर अन्य फायदे 409 रुपयांच्या प्लॅन सारखेच आहेत.

  • 28 दिवसाची वैधता
  • 4GB हाय-स्पीड 4G डेटा प्रतिदिन
  • प्रति दिन 100 एसएमएस
  • फ्री विआय मुव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस
  • रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान फ्री हाय-स्पीड डेटा
  • वीकएन्ड डेटा रोलओव्हर

तुम्हाला या प्लॅनमध्ये पण Binge All Night चा फायदा देखील घेता येतो. त्यामुळे तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान वापरलेला डेटा तुमच्या डेली डेटामधून कट केला जाणार नाही. तुम्हाला विआय मुव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपसाठी कॉम्प्लिमेंट्री अ‍ॅक्सेस, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्सचा फायदा देखील मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here