OPPO F15 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 09 Mar 2020 11:54:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 48MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या Oppo F15 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-8gb-ram-48mp-camera-128gb-rom-smartphone-price-cut-india-new-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-8gb-ram-48mp-camera-128gb-rom-smartphone-price-cut-india-new-price-specification/#respond Mon, 09 Mar 2020 11:54:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6743 ओप्पोने होळीच्या निमित्ताने ग्राहकांना भेट देत Oppo F15 ची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे.

The post 48MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या Oppo F15 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आज यावर्षी जानेवारी मध्ये आपल्या F सीरीज मध्ये Oppo F15 लॉन्च केला होता. आता कंपनीने दोन महिन्यांच्या आत डिवाइसची किंमत कमी केली आहे. ओप्पोने होळीच्या निमित्ताने ग्राहकांना भेट देत ओप्पो एफ15 ची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे. जाणून घेऊया फोनची नवीन किंमत आणि याच्या दमदार फीचर्स बाबत सर्वकाही.

नवीन किंमत

कंपनीने हा फोन फक्त एकाच वेरिएंट 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज मध्ये सादर केला होता जो 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आता 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार Oppo F15 ची किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर फोन 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पण फोन अजूनही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO F15 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनवण्यात आला आहे जो 6.4 इंचाच्या वॉटरड्रॉप एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षासाठी कंपनीने फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये मीडियाटेक P70 प्रोसेसर आहे.

फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 48MP का मेन सेंसर आहे. 4-इन-वन-पिक्सल कॉम्बिननेशन टेक्नोलॉजीच्या मदतीने 48 मेगापिक्सल रियर सेंसर इमेज शर्पनेस देतो. 48MP कॅमेरा सेंसर मध्ये F1.7 अपर्चर देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल मॅक्रो लेंस सेंसर आहे, जिचा अपर्चर F2.25 आहे.

डिवाइस मध्ये 2 मेगापिक्सल मून लेंस आहे जी F2.4 अपर्चर सह येते. तसेच यात 2 मेगापिक्सल F2.4 पोर्टेट लेंस देण्यात आली आहे. कंपनीने याबद्दल चांगल्या क्वालिटीचे फोटो कॅप्चर करण्याचा दावा केला आहे. डिवाइस मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो एफ15 बद्दल पाच मिनिटांच्या चार्ज मध्ये दोन तासांचा टॉक टाइम देण्याचा दावा करण्यात आहे. यात VOOC Flash Charge 3.0 सपोर्ट असेल. डिवाइस मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे. स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर सह येईल. याच्या मदतीने यूजर्स फोनची स्क्रीन 0.32 सेकंदात अनलॉक करू शकतील.

The post 48MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या Oppo F15 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-8gb-ram-48mp-camera-128gb-rom-smartphone-price-cut-india-new-price-specification/feed/ 0
48MP कॅमेरा आणि 8GB रॅम सह आला भारतात Oppo F15, दमदार फीचर्स सह करेल का राज्य https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-launched-with-four-camera-and-8gb-ram-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-launched-with-four-camera-and-8gb-ram-in-india/#respond Thu, 16 Jan 2020 12:14:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6303 फोन ऑफलाइन स्टोर सह फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर सेल केला जाईल.

The post 48MP कॅमेरा आणि 8GB रॅम सह आला भारतात Oppo F15, दमदार फीचर्स सह करेल का राज्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आज आपल्या F सीरीज मध्ये यावर्षी पहिला फोन सादर केला आहे जो Oppo F15 आहे. या डिवाइस बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती, तिला आज पूर्णविराम दिला आहे. या फोनच्या जीवावर कंपनी मार्केट मधील Redmi Note 8 Pro आणि Realme 5 Pro सारख्या हँडसेटना आव्हान देईल.

किंमत आणि ऑफर्स

कंपनीने हा फोन फक्त एकच वेरिएंट 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज सह सादर केला आहे, ज्याची किंमत 19,990 रुपये आहे. डिवाइसची प्री-बुकिंग 15 ते 23 जानेवारी पर्यंत करता येईल. हँडसेटचा पहिला सेल 24 जानेवारीला होईल. ऑफर्स बद्दल बोलायचे तर Oppo F15 HDFC बँक, ICICI बँक आणि Yes बँकेच्या कार्डने विकत घेतल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. नो-कॉस्ट ईएमआई आणि वनटाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि फ्री बॅग मिळत आहे. फोन Lightening Black आणि Unicorn White कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. फोन ऑफलाइन स्टोर सह फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर सेल केला जाईल.

डिजाइन

OPPO F15 फुलव्यू वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोनच्या स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत, तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वाली नॉच देण्यात आली आहे ज्यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर ओपो एफ15 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो पॅनल वर उजवीकडे आहे.

कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे ‘Designed For F-Series’ लिहिण्यात आले आहे तसेच याच्या उजवीकडे फ्लॅश आहे. ओपो एफ15 च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला OPPO ची ब्रॅंडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सह सिम स्लॉट आहे. OPPO F15 च्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे ज्याच्या उजवीकडे 3.5एमएम जॅक तसेच उजवीकडे स्पीकर देण्यात आला आहे. एकंदरीत असे म्हणता येईल कि Oppo ने ओप्पो एफ15 मध्ये स्लीक डिजाइन दिली आहे.

दमदार कॅमेरा

फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 48MP का मेन सेंसर आहे. 4-इन-वन-पिक्सल कॉम्बिननेशन टेक्नोलॉजीच्या मदतीने 48 मेगापिक्सल रियर सेंसर इमेज शर्पनेस देतो. 48MP कॅमेरा सेंसर मध्ये F1.7 अपर्चर देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल मॅक्रो लेंस सेंसर आहे, जिचा अपर्चर F2.25 आहे. तसेच डिवाइस मध्ये 2 मेगापिक्सल मून लेंस आहे जी F2.4 अपर्चर सह येते. तसेच यात 2 मेगापिक्सल F2.4 पोर्टेट लेंस देण्यात आली आहे. कंपनीने याबद्दल चांगल्या क्वालिटीचे फोटो कॅप्चर करण्याचा दावा केला आहे. डिवाइस मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO F15 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनवण्यात आला आहे जो 6.4 इंचाच्या वॉटरड्रॉप एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षासाठी कंपनीने फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये मीडियाटेक P70 प्रोसेसर आहे.

ओप्पो एफ15 बद्दल पाच मिनिटांच्या चार्ज मध्ये दोन तासांचा टॉक टाइम देण्याचा दावा आहे. यात VOOC Flash Charge 3.0 सपोर्ट असेल. डिवाइस मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे. स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर सह येईल. याच्या मदतीने यूजर्स फोनची स्क्रीन 0.32 सेकंदात अनलॉक करू शकतील.

ओपो एफ15 वीडियो

The post 48MP कॅमेरा आणि 8GB रॅम सह आला भारतात Oppo F15, दमदार फीचर्स सह करेल का राज्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-launched-with-four-camera-and-8gb-ram-in-india/feed/ 0
8 जीबी रॅम आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 16 जानेवारीला भारतात लॉन्च होईल OPPO F15 https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-8gb-ram-48mp-quad-rear-camera-to-launch-in-india-16-january-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-8gb-ram-48mp-quad-rear-camera-to-launch-in-india-16-january-specs-price/#respond Thu, 02 Jan 2020 13:54:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6175 कंपनीने फोनच्या लॉन्च डेट टीजर ईमेज सह याचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण सांगितले आहेत.

The post 8 जीबी रॅम आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 16 जानेवारीला भारतात लॉन्च होईल OPPO F15 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने या आठवड्याच्या सुरवातीला आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि ओपो भारतात अपनी ‘एफ सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO F15 नावाने लॉन्च केला जाईल. आपल्या रिपोर्ट मध्ये आम्ही ओपो एफ15 च्या डिजाईनची माहिती पण दिली होती. आज आमच्या बातमीवर शिकामोर्तब करत ओपोने अधिकृतपणे OPPO F15 ची घोषणा केली आहे. ओपोने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन 16 जानेवारीला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तसेच कंपनीने फोनच्या लॉन्च डेट टीजर ईमेज सह याचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण सांगितले आहेत.

OPPO ने प्रसिद्धीपत्रक पाठवून सांगितले आहे कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन OPPO F15 आणणार आहे. कंपनीने सांगितले कि हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. कंपनीने खुलासा केला आहे कि OPPO F15 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर सह येईल जो फोन फक्त .32 सेकंदात अनलॉक करेल.

OPPO F15 बद्दल कंपनीने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी सह बाजारात येईल. फोनच्या बॅटरी पावर किती असेल हे अजून समोर आले नाही, पण ओपो म्हणत आहे कि फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मधेच हा फोन 2 तासांचा टॉक टाईम देईल. ओपो एफ15 चे वजन 172ग्राम असेल तसेच हा फोन 7.9एमएम जाडा असेल. विशेष म्हणजे OPPO F15 8 जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल.

OPPO F15

विशेष म्हणजे ओपो एफ15 नुकत्याच चीन मध्ये लॉन्च झालेल्या ओपो ए91 चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. OPPO A91 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला होता जो 2400 x 1800 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन पण इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. OPPO A91 एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6.1 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी70 चिपसेट वर चालतो.

चीनी बाजारात OPPO A91 8 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A91 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर, 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसर आणि एका मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो.

मीडिया रिपोर्ट मधून समजले आहे कि OPPO A91 च्या फ्रंट पॅनल वरील वॉटरड्रॉप नॉच मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. ओपो ए91 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच OPPO A91 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह VOOC 3.0 रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,025एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात OPPO A91 1999 युआन (जवळपास 20,300 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे जो ब्लॅक, रेड आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

The post 8 जीबी रॅम आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 16 जानेवारीला भारतात लॉन्च होईल OPPO F15 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f15-8gb-ram-48mp-quad-rear-camera-to-launch-in-india-16-january-specs-price/feed/ 0
Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-f15-coming-to-india-in-january-look-design-like-reno-series/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-f15-coming-to-india-in-january-look-design-like-reno-series/#respond Mon, 30 Dec 2019 12:16:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6146 विशेष म्हणजे आम्हाला मिळालेल्या फोटो मध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे कि, The Next OPPO F Series Is Coming.

The post Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ च्या जीवावर चांगली फॅन फॉलोइंग बनवली आहे. मीड रेंजच्या या सीरीजचे स्मार्टफोन फक्त लुक आणि डिजाईनच्या बाबतीती शानदार नव्हते तर स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत पण हे स्मार्टफोन्स खूप ताकदवान होते. ओपोच्या या सीरीज मध्ये येणारा शेवटचे स्मार्टफोन्स OPPO F11 आणि OPPO F11 Pro होते. हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात झाले होते. पण त्यानंतर बातम्या येऊ लागल्या होत्या कि ओपो आपली एफ सीरीज बंद करत आहे. आज 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि OPPO आपल्या एफ सीरीजच्या नवीन डिवाईस वर काम करत आहे आणि या सीरीज मध्ये लवकरच नवीन स्मार्टफोन OPPO F15 नावाने लॉन्च होणार आहे.

91मोबाईल्सला ओपोची एक टीजर ईमेज मिळाली आहे ज्यात कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचा खुलासा झाला आहे. तसेच सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि ओपो कंपनीच्या एफ सीरीजच्या आगामी स्मार्टफोन वर काम करत आहे आणि या आगामी डिवाईसचे नाव OPPO F15 असेल. प्राप्त माहितीनुसार OPPO F15 कंपनी द्वारा जानेवारी मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे आम्हाला मिळालेल्या फोटो मध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे कि, The Next OPPO F Series Is Coming.

OPPO F15

ओपो एफ15 च्या फोटोवरून फोनच्या डिजाईनची माहिती पण मिळाली आहे. हा फोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. OPPO F15 मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच असेल. आशा आहे कि OPPO F15 Pro मध्ये पॉप अप कॅमेरा मिळेल. ओपो एफ सीरीजच्या शेवटच्या स्मार्टफोन मध्ये पण पॉप अप कॅमेरा देण्यात आला होता. फोटो मध्ये OPPO F15 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर सिम स्लॉट सह पावर बटण आहे. आशा आहे कि हा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असू शकतो. महत्वाचे म्हणजे OPPO F15 कंपनी Reno सीरीज सारख्या डिजाईनसह अनु शकते. म्हणजे फोनचा रियर पॅनल OPPO Reno फोन सारखा असेल. OPPO F15 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला असेल.

Oppo F11

Oppo F11 कंपनी ने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे.

फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. Oppo F11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Oppo F11 इंडिया मध्ये 4जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतो. Oppo F11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,020एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-f15-coming-to-india-in-january-look-design-like-reno-series/feed/ 0