48MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या Oppo F15 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आज यावर्षी जानेवारी मध्ये आपल्या F सीरीज मध्ये Oppo F15 लॉन्च केला होता. आता कंपनीने दोन महिन्यांच्या आत डिवाइसची किंमत कमी केली आहे. ओप्पोने होळीच्या निमित्ताने ग्राहकांना भेट देत ओप्पो एफ15 ची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे. जाणून घेऊया फोनची नवीन किंमत आणि याच्या दमदार फीचर्स बाबत सर्वकाही.

नवीन किंमत

कंपनीने हा फोन फक्त एकाच वेरिएंट 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज मध्ये सादर केला होता जो 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आता 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार Oppo F15 ची किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर फोन 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पण फोन अजूनही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO F15 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनवण्यात आला आहे जो 6.4 इंचाच्या वॉटरड्रॉप एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षासाठी कंपनीने फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये मीडियाटेक P70 प्रोसेसर आहे.

फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 48MP का मेन सेंसर आहे. 4-इन-वन-पिक्सल कॉम्बिननेशन टेक्नोलॉजीच्या मदतीने 48 मेगापिक्सल रियर सेंसर इमेज शर्पनेस देतो. 48MP कॅमेरा सेंसर मध्ये F1.7 अपर्चर देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल मॅक्रो लेंस सेंसर आहे, जिचा अपर्चर F2.25 आहे.

डिवाइस मध्ये 2 मेगापिक्सल मून लेंस आहे जी F2.4 अपर्चर सह येते. तसेच यात 2 मेगापिक्सल F2.4 पोर्टेट लेंस देण्यात आली आहे. कंपनीने याबद्दल चांगल्या क्वालिटीचे फोटो कॅप्चर करण्याचा दावा केला आहे. डिवाइस मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो एफ15 बद्दल पाच मिनिटांच्या चार्ज मध्ये दोन तासांचा टॉक टाइम देण्याचा दावा करण्यात आहे. यात VOOC Flash Charge 3.0 सपोर्ट असेल. डिवाइस मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे. स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर सह येईल. याच्या मदतीने यूजर्स फोनची स्क्रीन 0.32 सेकंदात अनलॉक करू शकतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here