OPPO F19 Pro Plus 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Mar 2021 08:53:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ओपोचा शानदार डाव, पावरफुल OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G फोन भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-phone-launched-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-phone-launched-in-india-price-specs-sale-offer/#respond Tue, 09 Mar 2021 08:53:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10297 OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus दोघांचा लुक एकसारखा आहे. हे दोन्ही मोबाईल फोन्स 20:9 आस्पेक्ट रेशियोसह सादर केले गेले आहेत जे 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या एफएचडी+ एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतात.

The post ओपोचा शानदार डाव, पावरफुल OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G फोन भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO फॅन्ससाठी तो दिवस उजाडला ज्याची ते वाट बघत होते. कंपनीने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत ‘एफ19’ सीरीज सादर केली आहे. सीरीज सोबत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत जे OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G नावाने आले आहेत. मोठी बॅटरी, 60हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि पावरफुल चिपसेट असलेली ही सीरीज स्टाईल आणि फोटोग्राफीसाठी शानदार असल्याचे बोलले जात आहे जी या महिन्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ओपोने सांगितले आहे की येत्या काही दिवसांत OPPO F19 पण भारतात लॉन्च केला जाईल.

डिजाईन
OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G चा लुक बर्‍याच अंशी एकसारखे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च झाले आहेत. ज्यांच्या वर डाव्या कोपर्‍यात सेल्फी कॅमेरा होल आहे. दोन्ही स्मार्टफोन चौकोनी क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतात ज्यात एफ19 प्रो चे चारही सेंसर वर चौकोनी आकारात आहेत. तर एफ19 प्रो प्लसचे तीन सेंसर वर्टिकल शेपमध्ये आणि एक सेंसर बाजूला आहे. F19 Pro चे डायमेंशन 160.1*73.2*7.8 आणि वजन 172 ग्राम आहे तसेच F19 Pro+ चे डायमेंशन 16.01×7.34×0.78 आणि वजन 173 ग्राम आहे. कंपनीने एफ19 प्रो Fluid Black आणि Crystal Silver तसेच एफ19 प्रो प्लस Fluid Black आणि Space Silver कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

डिस्प्ले
OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus दोघांचा लुक एकसारखा आहे. हे दोन्ही मोबाईल फोन्स 20:9 आस्पेक्ट रेशियोसह सादर केले गेले आहेत जे 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या एफएचडी+ एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतात. दोन्ही स्मार्टफोन्सची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर टेक्नॉलॉजीसह येतात जे 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतात. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8% आहे. तसेच ओपो फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. ओपो एफ19 सीरीज चे हे फोन 408पीपीआई पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतात.

प्रोसेसिंग
OPPO ने आपले नवीन स्मार्टफोन्स एंडरॉयड 11 वर लॉन्च केले आहेत जे कलरओएस 11.1 सह काम करतात. तसेच प्रोसेसिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. OPPO F19 Pro कंपनीने मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे तसेच OPPO F19 Pro+ मीडियाटेक च्या डायमनसिटी 800यू चिपसेटसह बाजारात आला आहे. विशेष म्हणजे ओपो एफ19 प्रो 4जीला सपोर्ट करतो तर ओपो एफ19 प्रो प्लस एक 5G फोन आहे.

कॅमेरा
फोटोग्राफीसाठी ओपोचे दोन्ही नवीन स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतात ज्याचे सर्व सेंसर्स सारखे आहेत. स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला
ज्या सोबत साथ एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आणि तेवढ्याच अपर्चरची एक 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतात.

पावर बॅकअप
फोन च्या पावरफुल स्पेसिफिकेशन्सचा योग्य वापर तेव्हा करता येईल जेव्हा फोनची बॅटरी चांगली असेल. OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G स्मार्टफोन 4,310एमएएच च्या मोठ्या बॅटरीसह लॉन्च केले गेले आहेत. बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी एफ19 प्रो मध्ये 30W VOOC Flash Charge 4.0 टेक्नोलॉजी देण्यात आली आहे तसेच एफ19 प्रो प्लस स्मार्टफोन 50W Flash Charge टेक्नोलॉजी सह आला आहे.

वेरिएंट्स व किंमत
OPPO F19 Pro दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वेरिएंट्सची प्राइस क्रमश: 21,490 रुपये आणि 23,490 रुपये आहे. छोट्या वेरिएंटची विक्री 17 मार्च तर मोठ्या वेरिएंटचा सेल 25 मार्चपासून होईल.

तसेच OPPO F19 Pro Plus 5G ने 8 जीबी रॅम मेमरी + 128 जीबी इंटरनल स्टोरेज वर बाजारात आला आहे. या सर्व वेरिएंट्सची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. किंमत पाहता ओपो एफ19 प्रो प्लस 25,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. ज्याचा सेल 17 मार्च पासून सुरू होईल.

The post ओपोचा शानदार डाव, पावरफुल OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G फोन भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-phone-launched-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
OPPO F19 सीरीज 8 मार्चला होईल भारतात लॉन्च, प्री-ऑर्डर झाली सुरु https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-india-launch-on-8-march-know-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-india-launch-on-8-march-know-specs-price-sale/#respond Wed, 03 Mar 2021 12:28:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10250 OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G चा लॉन्च ईवेंट 8 मार्च संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. हा एक म्यूजिक ईवेंट असेल ज्यात सिंगर व म्यूजिक ग्रुप लाईव परफॉर्म करतील.

The post OPPO F19 सीरीज 8 मार्चला होईल भारतात लॉन्च, प्री-ऑर्डर झाली सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO फॅन्ससाठी कंपनीने आज मोठी घोषणा केली आहे. ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ओपो इंडियाने फोनच्या लॉन्चची माहिती शेयर करून सांगितले आहे कि कंपनी येत्या 8 मार्चला भारतात आपली ‘एफ19 सीरीज’ सादर करणार आहे. या सीरीज अंतगर्त OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus स्मार्टफोन लॉन्च केले जातील. ओपो एफ19 प्रो 4जी कनेक्टिविटीसह येईल तर ओपो एफ19 प्रो प्लस 5जी सपोर्टसह भारतात लॉन्च केला जाईल. (OPPO F19 Pro Plus 5G india launch on 8 march know specs price sale)

लॉन्च डिटेल

OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G चा लॉन्च ईवेंट 8 मार्च संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. हा एक म्यूजिक ईवेंट असेल ज्यात सिंगर व म्यूजिक ग्रुप लाईव परफॉर्म करतील. हा ईवेंट कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडियावर पण लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल. या ईवेंटच्या मंचावर ओपो ए19 प्रो सीरीजची किंमत अनाउंस होईल आणि भारतात सीरीज विक्रीची घोषणा होईल. या सीरीजसाठी ओपोने बॉलीवुड अभिनेता वरूण धवनला ब्रँड अँबॅसिडर निवडले आहे.

हे देखील वाचा : 12GB रॅम आणि 4,300mAh बॅटरीसह लॉन्च झाला ताकदवान फोन Oppo Reno 5K

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO F19 Pro सीरीज पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केली जाईल ज्यात स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा होल देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी फ्रेम मध्ये आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही त्यामुळे तो पावर बटनवर किंवा अंडर-डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

कंपनीने सांगितले आहे कि ओपो आपली हि नवीन सीरीज OPPO 50W Flash Charge टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल. चर्चा आहे कि ओपो हि सीरीज 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर करू शकते. राहिला प्रश्न स्पेसिफिकेशनचा तर एफ19 प्रो प्लस मीडियाटेकच्या डायमेनसिटी चिपसेटवर सादर केला जाऊ शकतो. हा चिपसेट 5जी सपोर्टड आहे. तसेच फोनमध्ये तुम्हाला 10 एक्स झूमला सपोर्ट पण मिळू शकतो आणि कंपनी यासाठी टेलीफोटो लेंस सादर करू शकते. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 आउट ऑफ द बॉक्स असेल आणि कलरओएसवर काम करेल.

The post OPPO F19 सीरीज 8 मार्चला होईल भारतात लॉन्च, प्री-ऑर्डर झाली सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-india-launch-on-8-march-know-specs-price-sale/feed/ 0
हीरो बनून येत आहेत OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G फोन, वरूण धवनने शेयर केला फोटो https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-amazon-tease-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-amazon-tease-india-launch-soon/#respond Mon, 01 Mar 2021 11:45:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10214 OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G कंपनीद्वारे टीज करण्यात आला आहे. शॉपिंग साईट अमेझॉन इंडियावर कंपनीच्या या आगामी सीरीजचा फोटो शेयर करण्यात आली आहे. या फोटो मध्ये बॉलीवुड अभिनेता वरूण धवन मोबाईल हातात घेऊन दाखवण्यात आला आहे.

The post हीरो बनून येत आहेत OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G फोन, वरूण धवनने शेयर केला फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO भारतीय बाजारात आपल्या नव्या डावाची सुरुवात करत आहे. हि नवीन सुरवात फक्त कंपनीसाठी नव्हे तर भारतीय स्मार्टफोन बाजारसाठी पण असेल आणि याचे कारण कंपनी घेऊन येत असलेला स्वस्त 5G मोबाईल फोन ओपो एफ19 प्रो. आतापर्यंत फक्त लीक्स समोर येत होते पण आता कंपनीने स्वतःहून अधिकृतपणे घोषणा केली आहे कि OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहेत. (oppo f19 pro plus 5g amazon tease india launch soon)

OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G कंपनीद्वारे टीज करण्यात आला आहे. शॉपिंग साईट अमेझॉन इंडियावर कंपनीच्या या आगामी सीरीजचा फोटो शेयर करण्यात आली आहे. या फोटो मध्ये बॉलीवुड अभिनेता वरूण धवन मोबाईल हातात घेऊन दाखवण्यात आला आहे. सोबत ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो प्लस फोन्सची नावे पण लिहिण्यात आली आहेत. समोर आलेल्या या फोटोवरून समजते कि OPPO F19 Pro 5G कनेक्टिविटीसह लॉन्च होईल तसेच OPPO F19 Pro+ 5G पण सपोर्टसह येईल.

अशी असेल सीरीज

काही दिवसांपूर्वी लीक झालेल्या फोनच्या पोस्टर मध्ये दोन डिवायस दाखवण्यात आले होते ज्यात फोनची कॅमेरा प्लेसमेंट दिसत होती ज्यावर क्वॉड सेटअप देण्यात आला होता. OPPO F19 Pro मध्ये कॅमेऱ्याची स्टाइल F17 Pro सारखी आहे जिथे चौकोनी फ्रेम मध्ये दोन दोन करून क्वाड कॅमेरा उपलब्ध आहे. परंतु यावेळी फरक असा आहे कि कॅमेऱ्याचा ब्रॅकेट थोडा मोट आहे आणि खाली AI कॅमेऱ्याबाबत कंपनीने काही माहिती दिली आहे. आधीच्या मॉडेल प्रमाणे यात पण LED फ्लॅश साइड मध्ये बॉडीवर आहे.

OPPO F19 Pro Plus 5G बद्दल बोलायचे तर याची कॅमेरा स्टाइल थोडी वेगळी आहे. आयताकृती कॅमेरा ब्रॅकेट आहे पण एका लाइनमध्ये तीन कॅमेरे आहेत तर दुसरीकडे एक सेंसर LED Flash आणि 5G ची माहिती आहे. यात पण खालच्या बाजूला एआय कॅमेराबाबत थोड़ी माहिती देण्यात आली आहे. प्रो मॉडेलपेक्षा वेगळ्या 5G मॉडेलमध्ये फ्लॅश पण कॅमेऱ्यासह येतो. दोन्ही फोन्समध्ये डावीकडे पॉवर बटन मिळत आहे. कोणाच्याही बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. आशा आहे कि कंपनी यावेळी फक्त इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असलेला फोन घेऊन येत आहे.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी Redmi Note 10 ची लाइव ईमेज आली समोर, स्पेसिफिकेशन्सचा पण झाला खुलासा

ओपो एफ19 सीरीजबद्दल आतापर्यंत खूप जास्त माहिती आली नाही पण बातमीनुसार हा फोन मार्च मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि कंपनी हा 30 हजार रुपयांच्या बजेट मध्ये सादर करू शकते. राहिला प्रश्न स्पेसिफिकेशनचा तर हा फोन मीडियाटेक के डायमेनसिटी चिपसेटवर सादर केला जाऊ शकतो. हा चिपसेट 5जी सपोर्टड आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला 10 एक्स झूम सपोर्ट पण मिळू शकतो आणि कंपनी यासाठी टेलीफोटो लेंस सादर करू शकते. याव्यतिरिक्त फास्ट चार्जिंग फीचर पण असेल. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 आउट ऑफ द बॉक्स असेल.

The post हीरो बनून येत आहेत OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G फोन, वरूण धवनने शेयर केला फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-plus-5g-amazon-tease-india-launch-soon/feed/ 0