OPPO F19 सीरीज 8 मार्चला होईल भारतात लॉन्च, प्री-ऑर्डर झाली सुरु

OPPO फॅन्ससाठी कंपनीने आज मोठी घोषणा केली आहे. ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ओपो इंडियाने फोनच्या लॉन्चची माहिती शेयर करून सांगितले आहे कि कंपनी येत्या 8 मार्चला भारतात आपली ‘एफ19 सीरीज’ सादर करणार आहे. या सीरीज अंतगर्त OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus स्मार्टफोन लॉन्च केले जातील. ओपो एफ19 प्रो 4जी कनेक्टिविटीसह येईल तर ओपो एफ19 प्रो प्लस 5जी सपोर्टसह भारतात लॉन्च केला जाईल. (OPPO F19 Pro Plus 5G india launch on 8 march know specs price sale)

लॉन्च डिटेल

OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G चा लॉन्च ईवेंट 8 मार्च संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. हा एक म्यूजिक ईवेंट असेल ज्यात सिंगर व म्यूजिक ग्रुप लाईव परफॉर्म करतील. हा ईवेंट कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडियावर पण लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल. या ईवेंटच्या मंचावर ओपो ए19 प्रो सीरीजची किंमत अनाउंस होईल आणि भारतात सीरीज विक्रीची घोषणा होईल. या सीरीजसाठी ओपोने बॉलीवुड अभिनेता वरूण धवनला ब्रँड अँबॅसिडर निवडले आहे.

हे देखील वाचा : 12GB रॅम आणि 4,300mAh बॅटरीसह लॉन्च झाला ताकदवान फोन Oppo Reno 5K

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO F19 Pro सीरीज पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केली जाईल ज्यात स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा होल देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी फ्रेम मध्ये आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही त्यामुळे तो पावर बटनवर किंवा अंडर-डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

कंपनीने सांगितले आहे कि ओपो आपली हि नवीन सीरीज OPPO 50W Flash Charge टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल. चर्चा आहे कि ओपो हि सीरीज 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर करू शकते. राहिला प्रश्न स्पेसिफिकेशनचा तर एफ19 प्रो प्लस मीडियाटेकच्या डायमेनसिटी चिपसेटवर सादर केला जाऊ शकतो. हा चिपसेट 5जी सपोर्टड आहे. तसेच फोनमध्ये तुम्हाला 10 एक्स झूमला सपोर्ट पण मिळू शकतो आणि कंपनी यासाठी टेलीफोटो लेंस सादर करू शकते. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 आउट ऑफ द बॉक्स असेल आणि कलरओएसवर काम करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here