OPPO K11 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Jul 2023 09:13:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO K11 5G ची चीनमध्ये एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launched-in-china-see-details-of-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launched-in-china-see-details-of-price-and-specifications/#respond Tue, 25 Jul 2023 09:12:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22567 गेले कित्येक दिवस चर्चेत असलेला OPPO K11 5G चीनमध्ये लाँच झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये नाव बदलून हा मोबाइल भारतासह जगभरात एंट्री करू शकतो. डिवाइसमध्ये युजर्सना OLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच अन्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO K11 5G […]

The post OPPO K11 5G ची चीनमध्ये एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मोबाइलच्या स्क्रीनला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे.
  • ह्यात ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा देखील आहे.
  • डिवाइस Snapdragon 782G प्रोसेसरसह आला आहे.

गेले कित्येक दिवस चर्चेत असलेला OPPO K11 5G चीनमध्ये लाँच झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये नाव बदलून हा मोबाइल भारतासह जगभरात एंट्री करू शकतो. डिवाइसमध्ये युजर्सना OLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच अन्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO K11 5G ची किंमत

कंपनीनं डिवाइस तीन स्टोरेज ऑप्शनसह बाजारात आणला आहे. ह्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज, 12GB रॅम +256GB स्टोरेज आणि 12GB रॅम +512GB स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. ह्यांची किंमत अनुक्रमे 1,899 युआन म्हणजे सुमारे 21 हजार रुपये, 2,099 युआन म्हणजे सुमारे 24 हजार रुपये आणि 2,499 युआन म्हणजे सुमारे 28 हजार रुपये आहे. हा फोन ग्लेशियर ब्लू आणि मून शॅडो ग्रे ह्या दोन कलर ऑप्शनमध्ये मिळेल.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED पॅनल 120Hz रिफ्रेश रेट, 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 1100 निट्स ब्राइटनेस, HDR 10 प्लस, 1.07 बिलीयन कलरला सपोर्टसह मिळतो.
  • डिस्प्ले सपोर्ट : मोबाइल स्क्रीनला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे. ह्यात 2160 हाय फ्रिक्वेन्सी PWM डिम्मिंग सपोर्ट मिळतो. तसेच ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा देखील आहे.
  • प्रोसेसर : डिवाइस Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरसह येतो. हा चिपसेट 6 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. ज्याचा क्लॉक स्पीड 2.70GHz आहे. ओप्पोचा दावा आहे की डिवाइस चा AnTuTu स्कोर 7,19,702 आहे.
  • परफॉर्मन्स : परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये कंपनी 4129mm² ची मोठी लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. दमदार गेमिंग क्वॉलिटीसाठी हायपरबूस्ट गेम फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिनचा सपोर्टही आहे.
  • स्टोरेज : स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जोडीला 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो.
  • कॅमेरा : हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची आयएमएक्स890 प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळते जी OIS ला सपोर्ट करते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : फोन 5000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात आला आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Color OS 13.1 वर चालतो.

The post OPPO K11 5G ची चीनमध्ये एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launched-in-china-see-details-of-price-and-specifications/feed/ 0
OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-specifications-confirm-ahead-of-25-july-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-specifications-confirm-ahead-of-25-july-launch/#respond Fri, 21 Jul 2023 11:21:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22516 मोबाइल निर्माता ओप्पो 25 जुलैला आपला के-सीरीज स्मार्टफोन OPPO K11 5G घेऊन येत आहे. डिवाइसची एंट्री सर्वप्रथम चीनमध्ये होणार आहे. त्यानंतर इतर बाजारांमध्ये हा फोन लाँच केला जाईल. आता कंपनीनं लाँचपूर्वीच डिवाइसचे प्रमुख स्पेसिफिकेशन टीजरच्या माध्यमातून शेयर केले आहेत. ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO K11 5G लाँच डिटेल ओप्पो ‘के’ सीरीजमध्ये येणारा हा […]

The post OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO K11 5G मध्ये OLED पॅनल मिळेल.
  • हा फोन ड्युअल टोन फिनिशसह येईल.
  • ह्यात Snapdragon 782G प्रोसेसर दिला जाईल.

मोबाइल निर्माता ओप्पो 25 जुलैला आपला के-सीरीज स्मार्टफोन OPPO K11 5G घेऊन येत आहे. डिवाइसची एंट्री सर्वप्रथम चीनमध्ये होणार आहे. त्यानंतर इतर बाजारांमध्ये हा फोन लाँच केला जाईल. आता कंपनीनं लाँचपूर्वीच डिवाइसचे प्रमुख स्पेसिफिकेशन टीजरच्या माध्यमातून शेयर केले आहेत. ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO K11 5G लाँच डिटेल

ओप्पो ‘के’ सीरीजमध्ये येणारा हा स्मार्टफोन 25 जुलैला चीनमध्ये लाँच होईल. फोनचा लाँच इव्हेंट चीनमध्ये दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा इव्हेंट होईल. इंडियन मोबाइल युजर देखील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ओप्पो के11 5जी लाँच लाइव्ह पाहू शकतील.

OPPO K11 5G डिजाइन

फोनची डिजाइन पाहता डिवाइस फ्लॅट पॅनलसह येईल. डिस्प्लेवर पंच होल कट आउट डिजाइन देण्यात आली आहे. स्क्रीनच्या बाजूला पातळ बेजल्स दिसत आहेत. बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. ज्यात कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. तसेच फोन ड्युअल टोन कलर फिनिशसह दिसत आहे. त्याचबरोबर ओप्पोची ब्रँडिंग पण देण्यात आली आहे.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स (कंफर्म)

  • डिस्प्ले: डिवाइसचा डिस्प्ले पाहता कंपनीनं कंफर्म केलं आहे की ह्यात OLED पॅनल मिळेल. तसेच कंफर्म झाला आहे की डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 1100 निट्स ब्राइटनेस, HDR 10 प्लस आणि 1.07 बिलीयन कलर सपोर्ट दिला जाईल. परंतु स्क्रीन साइज मात्र अद्याप समोर आली नाही.
  • डिस्प्ले सपोर्ट: कंपनीनं टीजर मध्ये सांगितलं आहे की डिस्प्लेला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे. ह्यात 2160 हाय फ्रिकवेंसी PWM डिम्मिंगचा सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर डिस्प्लेवर ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा आहे.
  • परफॉरमेंस: परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये कंपनी 4129mm² ची मोठी लिक्विड कूलिंग सिस्टम मिळेल. चांगल्या गेमिंग क्वॉलिटीसाठी हायपरबूस्ट गेम फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिनचा सपोर्ट देखील मिळेल ज्यामुळे गेमिंग चांगली होईल.
  • प्रोसेसर: डिवाइस Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरसह येईल. हा चिपसेट 6 नॅनोमीटर प्रोसेसवर बनला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 2.70GHz आहे. ओप्पोनं दावा केला आहे की डिवाइसचा AnTuTu स्कोर 7,19,702 आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत स्मार्टफोन 12GB रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येईल. डिवाइसमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील मिळेल.
  • कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50 मेगापिक्सलची आयएमएक्स890 प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळेल.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • स्क्रीन साइज: लीकनुसार ओप्पो के11 5जी मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.
  • बॅटरी: सध्या फोनच्या बॅटरी बाबत जास्त माहिती मिळाली नाही परंतु लीकनुसार ह्यात 5000mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Color OS 13.1 वर चालू शकतो.
  • अन्य फीचर्स: ओप्पो के11 5जी फोनमध्ये ड्युअल सिम, एनएफसी, यूएसबी टाइप सी पोर्ट, ब्लूटूथ, वायफाय सारखे फीचर मिळतील. आशा आहे की कंपनी हा आयपी रेटिंगसह बाजारात येईल.

The post OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-specifications-confirm-ahead-of-25-july-launch/feed/ 0