OPPO K11 5G ची चीनमध्ये एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • मोबाइलच्या स्क्रीनला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे.
  • ह्यात ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा देखील आहे.
  • डिवाइस Snapdragon 782G प्रोसेसरसह आला आहे.

गेले कित्येक दिवस चर्चेत असलेला OPPO K11 5G चीनमध्ये लाँच झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये नाव बदलून हा मोबाइल भारतासह जगभरात एंट्री करू शकतो. डिवाइसमध्ये युजर्सना OLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच अन्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO K11 5G ची किंमत

कंपनीनं डिवाइस तीन स्टोरेज ऑप्शनसह बाजारात आणला आहे. ह्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज, 12GB रॅम +256GB स्टोरेज आणि 12GB रॅम +512GB स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. ह्यांची किंमत अनुक्रमे 1,899 युआन म्हणजे सुमारे 21 हजार रुपये, 2,099 युआन म्हणजे सुमारे 24 हजार रुपये आणि 2,499 युआन म्हणजे सुमारे 28 हजार रुपये आहे. हा फोन ग्लेशियर ब्लू आणि मून शॅडो ग्रे ह्या दोन कलर ऑप्शनमध्ये मिळेल.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED पॅनल 120Hz रिफ्रेश रेट, 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 1100 निट्स ब्राइटनेस, HDR 10 प्लस, 1.07 बिलीयन कलरला सपोर्टसह मिळतो.
  • डिस्प्ले सपोर्ट : मोबाइल स्क्रीनला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे. ह्यात 2160 हाय फ्रिक्वेन्सी PWM डिम्मिंग सपोर्ट मिळतो. तसेच ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा देखील आहे.
  • प्रोसेसर : डिवाइस Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरसह येतो. हा चिपसेट 6 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. ज्याचा क्लॉक स्पीड 2.70GHz आहे. ओप्पोचा दावा आहे की डिवाइस चा AnTuTu स्कोर 7,19,702 आहे.
  • परफॉर्मन्स : परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये कंपनी 4129mm² ची मोठी लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. दमदार गेमिंग क्वॉलिटीसाठी हायपरबूस्ट गेम फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिनचा सपोर्टही आहे.
  • स्टोरेज : स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जोडीला 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो.
  • कॅमेरा : हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची आयएमएक्स890 प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळते जी OIS ला सपोर्ट करते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : फोन 5000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात आला आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Color OS 13.1 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here