Oppo K3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह 19 जुलैला लॉन्च होईल Oppo K3, कंपनीने दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-to-launch-in-india-19-july-specs-prics/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-to-launch-in-india-19-july-specs-prics/#respond Tue, 16 Jul 2019 14:34:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4807 19 जुलैला राजधानी दिल्ली मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. या ईवेंटच्या मंचावरून Oppo K3 इंडियन मार्केट मध्ये येईल.

The post 8जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह 19 जुलैला लॉन्च होईल Oppo K3, कंपनीने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने या महिन्याच्या सुरवातीला एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि Oppo India भारतात आपल्या के सीरीजचा विस्तार करत Oppo K3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आपल्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि हा फोन 19 जुलैला भारतात लॉन्च होईल. आज आमच्या एक्सक्लूसिव रिपोर्टिंग वर शिकामोर्तब करत ओपो ने अधिकृत घोषणा केली आहे कि कंपनी 19 जुलैला आपल्या के सीरीजचा आगामी स्मार्टफोन Oppo K3 भारतात लॉन्च करणार आहे.

Oppo ने मीडिया इन्वाईट पाठवले आहेत ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी येत्या 19 जुलैला राजधानी दिल्ली मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. या ईवेंटच्या मंचावरून Oppo K3 इंडियन मार्केट मध्ये येईल. ओपोने अजूनतरी सांगितले नाही कि Oppo K3 किती वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च होईल आणि याची किंमत किती असेल. तसेच फोनच्या सेलच्या तारखेचा खुलासा पण 19 जुलैला होईल.

डिजाइन

जर फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर हा पॉप-सेल्फी कॅमेऱ्यासह चीन मध्ये सादर केला गेला आहे, त्यामुळे हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत. तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच देण्यात आलेली नाही. कंपनीने आपल्या आधीच्या फोन प्रमाणे Oppo K3 पॉप अप कॅमेरा सपोर्ट सह सादर केला आहे. हा पॉप अप कॅमेरा फोनच्या सेंटर मध्ये आहे जो सेल्फीची कमांड देताच फोन बॉडीच्या बाहेर येतो.

स्पेसिफिकेशन्स

Oppo ने हँडसेट मध्ये 6.5-इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. सोबत हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ओपोच्या यूजर इंटरफेस कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे. कंपनीने सांगितले आहे कि Oppo K3 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट दिला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर वर आधारित आहे.

चीन मध्ये Oppo K3 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 6जीबी रॅम व 8जीबी रॅम होता. हा फोन 64जीबी, 128जीबी व 256जीबी स्टोरेज वेरिएंट वर सादर केला गेला होता. आशा आहे कि भारतात पण Oppo K3 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल. Oppo K3 मध्ये गेम बूस्ट 2.0 फीचर देण्यात आला आहे जो गेमिंग साठी लॅग फ्री व स्मूथ परफार्मेंस देईल.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Oppo K3 मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर ओपो ने K3 मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट दिला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,765एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 8जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह 19 जुलैला लॉन्च होईल Oppo K3, कंपनीने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-to-launch-in-india-19-july-specs-prics/feed/ 0
Oppo A9 येणार आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला खुलासा, किंमत असेल 15,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-to-launch-in-india-soon-price-15990/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-to-launch-in-india-soon-price-15990/#respond Tue, 16 Jul 2019 14:10:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4805 गूगल सर्च वरून स्पष्ट झाले आहे कि Oppo A9 लवकरच समोर येणार आहे.

The post Oppo A9 येणार आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला खुलासा, किंमत असेल 15,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात टेक कंपनी Oppo संबंधित बातमी पब्लिश करत सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘ए सीरीज’ वाढवण्याची तयारी करत आहे आणि लवकरच या सीरीजचा नवीन फोन Oppo A9 लॉन्च करेल. आमच्या बातमी मध्ये आम्ही या स्मार्टफोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स सोबत याच्या किंमतीची माहिती पण दिली होती. आता आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत स्वतः कंपनीने हा फोन टीज करायला सुरवात केली आहे. लवकरच Oppo A9 बाजारात सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo A9 बद्दल कंपनीने अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, पण Google वर ‘Oppo A9’ कीवर्ड सर्च केल्यावर या फोन संबंधित लिंक समोर येत आहे. हि लिंक ओपोच्या अधिकृत इंडियन वेबसाइटची आहे ज्यावर क्लिक केल्यावर ओपो इंडियाच्या वेबसाइट वर पेज रिडायरेक्ट होत आहे. वेबसाइट वर शोधल्यांनंतर Oppo A9 स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइट वर दिसला नाही, पण या गूगल सर्च वरून स्पष्ट झाले आहे कि Oppo A9 लवकरच समोर येणार आहे.

अशी असेल किंमत

Oppo A9 बाजारात 4जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. या फोनची किंमत 15,990 रुपये असेल आणि हा ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. Oppo ने अजूनतरी या स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती दिली नाही. पण Oppo A9 कधी सेल साठी उपलब्ध होईल याचे डिटेल पण लवकरच तुम्हाला दिले जातील.

हे देखील वाचा: Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

OPPO A9 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.70 टक्के आहे. OPPO A9 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. चीनी बाजारात हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला आहे जो कलर ओएस 6.0 वर आधारित आहे. प्रोसेसिंग साठी OPPO A9 मध्ये 2.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO A9 चीन मध्ये 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी OPPO A9 मध्ये माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A9 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी OPPO A9 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: लहान मुलगी वापरत होती iPhone 6, अचानक लागली आग

OPPO A9 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट करतो. चांगल्या गेमिंग एक्सपीरियंस साठी कंपनी ने हा फोन गेमबूस्ट 2.0 मोड सह आणला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह येतो. तसेच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात Oppo A9 स्मार्टफोन मार्बल ग्रीन आणि फ्लोराइट पर्पल कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post Oppo A9 येणार आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला खुलासा, किंमत असेल 15,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-to-launch-in-india-soon-price-15990/feed/ 0
8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह आला OPPO K3, जाणून घ्या याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-with-pop-up-selfie-camera-and-snapdragon-710-soc-launched/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-with-pop-up-selfie-camera-and-snapdragon-710-soc-launched/#respond Thu, 23 May 2019 10:20:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4383 हँडसेट चीन मध्ये आज पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह आला OPPO K3, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO K3 स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर आली होती. आज डिवाइस चीनी मार्केट मध्ये ऑफिशियली लॉन्च केला गेला आहे. चीनी बाजारा व्यतिरिक्त डिवाइस भारत किंवा दुसऱ्या मार्केट मध्ये कधी लॉन्च केला याची कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही.

डिजाइन
जर फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर हा पॉप-सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे, त्यामुळे हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत. तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच देण्यात आलेली नाही. कंपनीने आपल्या आधीच्या फोन प्रमाणे Oppo K3 पॉप अप कॅमेरा सपोर्ट सह सादर केला आहे. हा पॉप अप कॅमेरा फोनच्या सेंटर मध्ये आहे जो सेल्फीची कमांड देताच फोन बॉडीच्या बाहेर येतो.

हे देखील वाचा: Sony आता भारतात लॉन्च करणार नाही स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

किंमत
OPPO K3 ची किंमत पाहता कंपनीने हा तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. डिवाइसच्या 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेजची किंमत RMB 1,599 (जवळपास रुपये), 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेजची किंमत RMB 1899 (जवळपास 19,127 रुपये) आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 2299 (जवळपास 23,149 रुपये) आहे. डिवाइस तीन कलर-Nebula Purple, Morning White आणि Secret Black ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेट चीन मध्ये आज पासून सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo K3 चे स्पेसिफिकेशन्स
Oppo ने हँडसेट मध्ये 6.5-इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. सोबत हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ओपोच्या यूजर इंटरफेस कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे. कंपनीने सांगितले आहे कि Oppo K3 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट दिला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर वर आधारित आहे. Oppo K3 मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम सह 64जीबी, 128जीबी व 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. Oppo K3 मध्ये गेम बूस्ट 2.0 फीचर देण्यात आला आहे जो गेमिंग साठी लॅग फ्री व स्मूथ परफार्मेंस देईल.

हे देखील वाचा: पंच होल डिजाइन सह Vivo Z5X स्मार्टफोन 24 मे ला होईल लॉन्च, समोर आला ऑफिशियल टीजर

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Oppo K3 मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर ओपो ने K3 मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट दिला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,765एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह आला OPPO K3, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-with-pop-up-selfie-camera-and-snapdragon-710-soc-launched/feed/ 0