Sony आता भारतात लॉन्च करणार नाही स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये वाढती स्पर्धा पाहून सर्व कंपन्या आपल्या हँडसेट मध्ये एका पेक्षा एक चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करत असताना कंपन्या आपल्या यूजर्सना सर्व शानदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स कमीत कमी किंमतीत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात. या रेस मधून आता एक कंपनी बाजूला गेली आहे, जिचे फोन कदाचित तुम्ही एकेकाळी वापरले असतील आणि तिचे नाव सोनी इलेक्ट्रॉनिक आहे.

भारतासहित इतर देशांत चालू असलेल्या या स्पर्धेत जापानची प्रसिद्ध कंपनी सोनी गेल्या काही वर्षांपासून मागे राहत आहे, याच कारणांमुळे सोनी ने आता भारतीय स्मार्टफोन बाजरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनी आता भारतात आपला कोणताही नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार नाही. मोबाईल पोर्टफोलियो मध्ये होणाऱ्या सततच्या तोट्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने ऑफिशियली स्टेटमेंट देऊन सांगितले आहे कि ते आता दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका या क्षेत्रांवर फोकस करणार नाही.

हे देखील वाचा: पंच होल डिजाइन सह Vivo Z5X स्मार्टफोन 24 मे ला होईल लॉन्च, समोर आला ऑफिशियल टीजर

विशेष म्हणजे कंपनीचे ध्येय आर्थिक वर्ष 2020 मध्ये नफा मिळवण्याचे आहे आणि याचसाठी कंपनी आपला खर्च 50 टाक्यांपर्यंत कमी करेल. तसेच सोनी ग्रुप आपल्या प्रमुख टेक्नॉलजीचा वापर करून प्रॉडक्ट अपील मजबूत करण्यावर काम करेल.

कंपनी ने एका विधानात म्हटले, ‘भविष्यात 5G चे महत्व पाहता नफा कमवण्यासाठी आमचे लक्ष्य जापान, यूरोप, हाँगकाँग आणि तैवान मार्केट वर आहे. आम्हाला आर्थिक वर्ष 2018 मध्ये मध्ये आणि दक्षिण अमेरिका, मध्य पूर्व, दक्षिण आशिया सारख्या देशांत विक्री बंद केली आहे, पण आम्ही बाजाराची स्थिती आणि व्यापाराच्या शक्यतांवर नजर ठेऊ. व्यापाराची संधी मिळाल्यास आम्ही सोनी स्टोर सारख्या डायरेक्ट चॅनेल द्वारे विक्रीचा विचार करू शकतो.

हे देखील वाचा: Xiaomi घेऊन येत आहे Redmi K20 Pro, स्पेसिफिकेशन्स असे जे देतील OnePlus 7 Pro ला पण टक्कर! एवढी असेल किंमत

जापानच्या इलेक्ट्रॉनिक कंपनी सोनीने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Sony Xperia 1 चीन मध्ये लॉन्च केला होता पण भारतात हा स्मार्टफोन कदाचित कधीच लॉन्च केला जाणार नाही. सोनीने यावर्षी बर्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये आपला एक्सपीरिया 1 फ्लॅगशिप फोन लॉन्च केला होता. तसेच कंपनीने एक्सपीरिया 10 आणि एक्सपीरिया 10 प्लस मिड-रेंज फोन सादर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here