Oppo R17 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 19 Nov 2018 13:31:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतात येत आहे ओपोचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8जीबी रॅम असलेला फोन, कंपनी ने केले ट्वीट https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-to-launch-in-india-soon-with-8gb-ram-company-tweet-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-to-launch-in-india-soon-with-8gb-ram-company-tweet-in-marathi/#respond Mon, 19 Nov 2018 13:31:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2904 ओपो ने ट्वीटर वर 5 सेकंदांचा एक वीडियो टीजर शेयर केला आहे ज्यात R लेटर सोबत एक स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे.

The post भारतात येत आहे ओपोचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8जीबी रॅम असलेला फोन, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने ऑगस्ट महिन्यात चीनी बाजारात आपला हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आर17 प्रो लॉन्च केला होता. हा फोन 8जीबी च्या पावरफुल रॅम सह शानदार फीचर्सला सपोर्ट करतो. तर आता ओपो आपला हा दमदार स्मार्टफोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. ओपो इंडिया ने आॅफिशियली अनाउंस केले आहे कि कंपनी लवकरच इंडियन मार्केट मध्ये आपली ‘आर स्मार्टफोन सीरीज’ आणणार आहे.

ओपो इंडिया ने अपने ट्वीटर हँडल वरून आॅफिशियल केले आहे कि कंपनी लवकरच देशात ‘आर सीरीज’ आणत आहे. ओपो ने ट्वीटर वर 5 सेकंदांचा एक वीडियो टीजर शेयर केला आहे ज्यात R लेटर सोबत एक स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे. या ट्वीट मध्ये कपंनी ने ‘समथिंग न्यू ईज कमिंग अप’ लिहून सोबत ओपो आर सीरीज ​हॅशटॅग पण ​लावला आहे. या ट्वीट वरून हे स्पष्ट झाले आहे कि ओपो आर सीरीज लवकरच भारतात येणार आहे पण कंपनी कधी आपला हा नवीन फोन लॉन्च करेल याबद्दल काहीच सांगत येत नाही.

ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या आॅपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.

OPPO R17 Pro

ओपो आर17 प्रो 4जी फोन आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये सुपर वीओओसी चार्जिंग सपोर्ट वाली 3,700एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो आर17 प्रो पर्पल आणि ब्लू ग्रेडिएंट रंगांत चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ओपो आर17 चीन मध्ये 4,299 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये होतात.

The post भारतात येत आहे ओपोचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8जीबी रॅम असलेला फोन, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-to-launch-in-india-soon-with-8gb-ram-company-tweet-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम सह लॉन्च झाला ओपोचा ‘वी’ नॉच वाला दमदार फोन आर17 https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-official-in-china-with-8gb-ram-vooc-support-under-screen-fingerprint-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-official-in-china-with-8gb-ram-vooc-support-under-screen-fingerprint-in-marathi/#respond Mon, 13 Aug 2018 08:36:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1682 विशेष म्हणजे येत्या 21 ऑगस्ट ला ओपो भारतात पण आपला असाच नॉच डिस्प्ले आणि वीओओसी सपोर्ट वाला स्मार्टफोन एफ9 प्रो लॉन्च करणारा आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला ओपोचा ‘वी’ नॉच वाला दमदार फोन आर17 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो च्या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आर17 बद्दल खुप दिवसांपासून लीक्स येत होते. त्यांना पूर्णविराम देत ओपो ने हा स्मार्टफोन अधिकृतरीत्या लॉन्च केला आहे. ओपो आर17 कंपनी च्या चीनी वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहे. ओपो आर17 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. ओपो आर17 चीनी बाजारात प्री-आॅर्डर साठी लिस्ट झाला आहे जो येत्या 18 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो आर17 मध्ये कंपनी ने 91.5 आस्पेक्ट रेशियो वाला ट्रूबेजल लेस डिस्प्ले दिला आहे ज्याच्या वरच्या बाजूला खुप छोटीशी वी शेप मधील नॉच आहे. फोन मध्ये 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर स्क्रीन खाली अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

ओपो आर17 कलर ओएस 5.2 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे ज्या सोबत हा आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह वर्टिकल शेप मध्ये एआई सपोर्ट वाला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे सेंसर आहेत. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स576 सेंसर आहे.

ओपो आर17 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह पावर बॅकअप साठी वीओओसी फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मध्ये 2 तासांचा टॉकटाईम देऊ शकते.

ओपो आर17 चीन मध्ये प्री-आॅर्डर साठी उपलब्ध झाला आहे जो नियॉन पर्पल आणि स्ट्रीमर ब्लू कलर मध्ये 18 ऑगस्ट पासून तिथे सेल साठी उपलब्ध होईल. फोनच्या किंमतीची घोषणा ओपो चीन मध्ये सेल च्या दिवशीच करेल. विशेष म्हणजे येत्या 21 ऑगस्ट ला ओपो भारतात पण आपला असाच नॉच डिस्प्ले आणि वीओओसी सपोर्ट वाला स्मार्टफोन एफ9 प्रो लॉन्च करणारा आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला ओपोचा ‘वी’ नॉच वाला दमदार फोन आर17 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-official-in-china-with-8gb-ram-vooc-support-under-screen-fingerprint-in-marathi/feed/ 0
अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/#respond Tue, 07 Aug 2018 11:06:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1611 विषेश म्हणजे ओपो आगामी काळात भारतात एफ9 प्रो नावाचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे ज्याची घोषणा कंपनी ने आधीच केली आहे. लुक आणि डिजाईन मध्ये ओपो आर17 व आर17 प्रो एफ9 प्रो सारखे वाटतात.

The post अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो च्या आगामी स्मार्टफोन आर17 आणि आर17 प्रो बद्दल खुप दिवस झाले लीक्स येत आहेत. पण आता चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर पण ओपो चा हा आगामी स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये ओपो आर17 सोबत ओपो आर17 प्रो पण आहे. टेना लिस्टिंग वरून दोन्ही फोन च्या डिजाईन आणि लुक सह फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे.

टेना वर ओपो आर17 सोबत ओपो आर17 प्रो पण लिस्ट करण्यात आला आहे. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मध्ये सारखेच स्पेसिफिकेशन्स असतील. ओपो आर17 प्रो मध्ये फ्रंट पॅनल वर अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर मिळू शकतो तर ओपो आर17 मध्ये कंपनी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. लीक नुसार फिंगर​प्रिंट सेंसर च्या प्लेसमेंट व्यतिरिक्त दोन्ही मॉडेल्स चे स्पेसिफिकेशन्स सारखे असतील.

ओपो आर17 व आर17 प्रो ला कंपनी मोठया ऐज टू ऐज बेजल लेस डिसप्ले सह सादर करू शकते. या फोन च्या फ्रंट पॅनल वर चारही बाजूंना बारीक बेजल्स असतील वरच्या बाजूला वी शेप मधील छोटीशी नॉच असेल. दोन्ही फोन मॉडल्स मध्ये 6.3-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळेल. टेना नुसार हा फोन वाटरप्रूफ पण असू शकतो.

ओपो आपला हा आगामी फोन ग्लास डिजाईन वर सादर करू शकते. याच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, जो एलईडी फ्लॅश सह येईल दोन्ही मॉडेल्स च्या रॅम व प्रोसेसर ची माहिती या लिस्टिंग मधून मिळाली नाही पण असे सांगण्यात आले आहे की पावर बॅकअप साठी यात वीओओसी फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 3,415एमएच ची बॅटरी मिळू शकते.

विषेश म्हणजे ओपो आगामी काळात भारतात एफ9 प्रो नावाचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे ज्याची घोषणा कंपनी ने आधीच केली आहे. लुक आणि डिजाईन मध्ये ओपो आर17 व आर17 प्रो एफ9 प्रो सारखे वाटतात. त्यामुळे लवकरच भारतात येणारा एफ9 प्रो अं​डर डिस्प्ले फिं​गरप्रिंट सेंसर सह येतो की नाही हे बघावे लागेल.

The post अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/feed/ 0