8जीबी रॅम सह लॉन्च झाला ओपोचा ‘वी’ नॉच वाला दमदार फोन आर17

ओपो च्या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आर17 बद्दल खुप दिवसांपासून लीक्स येत होते. त्यांना पूर्णविराम देत ओपो ने हा स्मार्टफोन अधिकृतरीत्या लॉन्च केला आहे. ओपो आर17 कंपनी च्या चीनी वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहे. ओपो आर17 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. ओपो आर17 चीनी बाजारात प्री-आॅर्डर साठी लिस्ट झाला आहे जो येत्या 18 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो आर17 मध्ये कंपनी ने 91.5 आस्पेक्ट रेशियो वाला ट्रूबेजल लेस डिस्प्ले दिला आहे ज्याच्या वरच्या बाजूला खुप छोटीशी वी शेप मधील नॉच आहे. फोन मध्ये 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर स्क्रीन खाली अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

ओपो आर17 कलर ओएस 5.2 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे ज्या सोबत हा आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह वर्टिकल शेप मध्ये एआई सपोर्ट वाला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे सेंसर आहेत. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स576 सेंसर आहे.

ओपो आर17 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह पावर बॅकअप साठी वीओओसी फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मध्ये 2 तासांचा टॉकटाईम देऊ शकते.

ओपो आर17 चीन मध्ये प्री-आॅर्डर साठी उपलब्ध झाला आहे जो नियॉन पर्पल आणि स्ट्रीमर ब्लू कलर मध्ये 18 ऑगस्ट पासून तिथे सेल साठी उपलब्ध होईल. फोनच्या किंमतीची घोषणा ओपो चीन मध्ये सेल च्या दिवशीच करेल. विशेष म्हणजे येत्या 21 ऑगस्ट ला ओपो भारतात पण आपला असाच नॉच डिस्प्ले आणि वीओओसी सपोर्ट वाला स्मार्टफोन एफ9 प्रो लॉन्च करणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here