OppoOppo K3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Jul 2019 07:49:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo K3 भारतात झाला लॉन्च, 8जीबी रॅम, पॉप-अप कॅमेरा आणि किंमत फक्त 16,990 पासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-launch-in-india-feature-specifications-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-launch-in-india-feature-specifications-price-sale-offer/#respond Mon, 22 Jul 2019 07:49:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4850 Oppo K3 भारतात 16,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो 23 जुलै पासून शॉपिंग साइट अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post Oppo K3 भारतात झाला लॉन्च, 8जीबी रॅम, पॉप-अप कॅमेरा आणि किंमत फक्त 16,990 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने या महिन्याच्या सुरवातीलाच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि Oppo India भारतात आपल्या के सीरीजचा विस्तार करत Oppo K3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही फोनची लॉन्च डेट 19 जुलै असल्याचे सांगितले होते. ओपो ने आपला हा स्मार्टफोन भारतात ऑफिशियल करत Oppo K3 सादर केला आहे. Oppo K3 भारतात 16,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो 23 जुलै पासून शॉपिंग साइट अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo K3 डिजाइन

जर फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर हा पॉप-सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे, त्यामुळे हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत. तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच देण्यात आलेली नाही. कंपनीने आपल्या आधीच्या फोन प्रमाणे Oppo K3 पॉप अप कॅमेरा सपोर्ट सह सादर केला आहे. हा पॉप अप कॅमेरा फोनच्या सेंटर मध्ये आहे जो सेल्फीची कमांड देताच फोन बॉडीच्या बाहेर येतो.

Oppo K3 स्पेसिफिकेशन्स

Oppo ने हँडसेट मध्ये 6.5-इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. सोबत हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ओपोच्या यूजर इंटरफेस कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे. कंपनीने सांगितले आहे कि Oppo K3 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट दिला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर वर आधारित आहे.

चीन मध्ये Oppo K3 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 6जीबी रॅम व 8जीबी रॅम होता. हा फोन 64जीबी, 128जीबी व 256जीबी स्टोरेज वेरिएंट वर सादर केला गेला होता. आशा आहे कि भारतात पण Oppo K3 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल. Oppo K3 मध्ये गेम बूस्ट 2.0 फीचर देण्यात आला आहे जो गेमिंग साठी लॅग फ्री व स्मूथ परफार्मेंस देईल.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Oppo K3 मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर ओपो ने K3 मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट दिला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,765एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता कंपनीने Oppo K3 चा 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपये आणि 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. Oppo K3 नेबुल पर्पल, मोर्निंग व्हाइट आणि सिक्रेट ब्लॅक कलर मध्ये 23 जुलै पासून विकत घेता येईल.

The post Oppo K3 भारतात झाला लॉन्च, 8जीबी रॅम, पॉप-अप कॅमेरा आणि किंमत फक्त 16,990 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k3-launch-in-india-feature-specifications-price-sale-offer/feed/ 0
Oppo K3 फोन येईल 23 मे ला समोर, यात असेल 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3-arriving-on-may-23-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3-arriving-on-may-23-in-china/#respond Fri, 17 May 2019 13:29:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4332 फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असू शकतो.

The post Oppo K3 फोन येईल 23 मे ला समोर, यात असेल 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपल्या नवीन फोन Oppo K3 ची लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनी 23 मे ला चीन मध्ये होणाऱ्या एका इवेंट मध्ये Oppo K3 फोन सादर करेल. कंपनीने याची माहिती चीनी माइक्रब्लागिंग वेबसाइट वीबो वर दिली आहे.

जारी केलेल्या टीजर फोटो वरून अशी माहिती मिळत आहे कि फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा टेक्नोलॉजी सह मागे डुअल मॉड्यूल कॅमेरा असू शकतो. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असू शकतो.

स्पेसिफिकेशन्स
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार OPPO K3 मध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. एमोलेड डिस्प्ले असल्यामुळे अंदाज लावला जात आहे कि ओपोच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. लीक नुसार OPPO K3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल जो कलरओएस 6.0 यूआई सह चालेल.

OPPO K3 बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 8जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच ओपो हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये सादर केला जाईल याची शक्यता नाकारता येत नाही. प्रोसेसिंग साठी OPPO K3 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट असल्याचे या लीक मध्ये समोर आले आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीक नुसार OPPO K3 डुअल रियर कॅमेरा सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी साठी OPPO K3 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

OPPO K3 मध्ये 3,680एमएएच ची बॅटरी असल्याचे या लीक मध्ये सांगण्यात आले आहे जी 20वॉट VOOC 3.0 टेक्नॉलॉजी सह येईल. तसेच फोनच्या लॉन्च डेट बद्दल या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि OPPO K3 ऑक्टोबर पर्यंत टेक मंचावर सादर केला जाईल. पण कंपनीच्या अधिकृत घोषणे पर्यंत फोनचे स्पेसिफिकेशन्स ठोस आहेत असे म्हणता येणार नाहीत.

The post Oppo K3 फोन येईल 23 मे ला समोर, यात असेल 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3-arriving-on-may-23-in-china/feed/ 0