Oppo K3 फोन येईल 23 मे ला समोर, यात असेल 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपल्या नवीन फोन Oppo K3 ची लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनी 23 मे ला चीन मध्ये होणाऱ्या एका इवेंट मध्ये Oppo K3 फोन सादर करेल. कंपनीने याची माहिती चीनी माइक्रब्लागिंग वेबसाइट वीबो वर दिली आहे.

जारी केलेल्या टीजर फोटो वरून अशी माहिती मिळत आहे कि फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा टेक्नोलॉजी सह मागे डुअल मॉड्यूल कॅमेरा असू शकतो. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असू शकतो.

स्पेसिफिकेशन्स
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार OPPO K3 मध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. एमोलेड डिस्प्ले असल्यामुळे अंदाज लावला जात आहे कि ओपोच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. लीक नुसार OPPO K3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल जो कलरओएस 6.0 यूआई सह चालेल.

OPPO K3 बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 8जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच ओपो हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये सादर केला जाईल याची शक्यता नाकारता येत नाही. प्रोसेसिंग साठी OPPO K3 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट असल्याचे या लीक मध्ये समोर आले आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीक नुसार OPPO K3 डुअल रियर कॅमेरा सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी साठी OPPO K3 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

OPPO K3 मध्ये 3,680एमएएच ची बॅटरी असल्याचे या लीक मध्ये सांगण्यात आले आहे जी 20वॉट VOOC 3.0 टेक्नॉलॉजी सह येईल. तसेच फोनच्या लॉन्च डेट बद्दल या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि OPPO K3 ऑक्टोबर पर्यंत टेक मंचावर सादर केला जाईल. पण कंपनीच्या अधिकृत घोषणे पर्यंत फोनचे स्पेसिफिकेशन्स ठोस आहेत असे म्हणता येणार नाहीत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here