OTT Platform - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 04 Nov 2022 11:48:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 49 रुपयांमध्ये 5 OTT अ‍ॅप्सचं सब्सस्क्रिप्शन; Dish TV नं आणले चार नवीन प्लॅन, सर्वांना येणार वापरता https://www.91mobiles.com/marathi/dish-tv-launches-watcho-ott-plans-zee5-disney-plus-hotstar-price-start-rs-49/ https://www.91mobiles.com/marathi/dish-tv-launches-watcho-ott-plans-zee5-disney-plus-hotstar-price-start-rs-49/#respond Sun, 06 Nov 2022 03:45:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14628 Dish TV OTT Plan: OTT कडे दर्शकांचा वाढत कल पाहून देशातील सर्वात मोठ्या डीटीएच (डायरेक्ट-टू-होम) कंपन्यांपैकी एक Dish TV नं चार नवीन OTT Plan सादर करून दर्शकांना भेट दिला आहे. या प्लॅन्समध्ये ZEE5, Disney+ Hotstar सारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्लॅन लाँच करताना कंपनीनं सांगितलं आहे की हा फक्त नॉर्मल OTT […]

The post 49 रुपयांमध्ये 5 OTT अ‍ॅप्सचं सब्सस्क्रिप्शन; Dish TV नं आणले चार नवीन प्लॅन, सर्वांना येणार वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Dish TV OTT Plan: OTT कडे दर्शकांचा वाढत कल पाहून देशातील सर्वात मोठ्या डीटीएच (डायरेक्ट-टू-होम) कंपन्यांपैकी एक Dish TV नं चार नवीन OTT Plan सादर करून दर्शकांना भेट दिला आहे. या प्लॅन्समध्ये ZEE5, Disney+ Hotstar सारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्लॅन लाँच करताना कंपनीनं सांगितलं आहे की हा फक्त नॉर्मल OTT प्लॅन नाही तर यात Watcho OTT प्लॅन मुळात डिश टीव्हीची एक ओटीटी एग्रीगेशन सर्व्हिस आहे. याच अर्थ असा की डिश टीव्हीच्या वॉचोच्या सिंगल सब्सक्रिप्शनसह तुम्ही अनेक प्लॅटफॉर्म आणि त्यावरील कंटेंटचा आनंद घेऊ शकता. चला जाणून घेऊया लाँच करण्यात आलेल्या नवीन डिश टीव्ही ओटीटी प्लॅनबाबत संपूर्ण माहिती.

डिश टीव्ही Watcho OTT Plans

डिश टीव्हीनं सादर केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म वाचोच्या चार नवीन प्लॅनची किंमत 49 रुपये, 99 रुपये, 199 रुपये आणि 299 रुपये प्रति माह आहे. पुढे आम्ही या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सब्सक्रिप्शनची माहिती दिली आहे. त्यातून तुम्ही तुमच्या सोयीनुसार एकाची निवड करू शकता. हे देखील वाचा: iPhone 14 वर बंपर ऑफर देत आहे जियो, इथे मिळेल सर्वात स्वस्तात हा फोन

49 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये युजर्सना Watcho, Hungama Play, EPIC ON, Oho Gujrati आणि Kikk ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मिळेल.

99 रुपयांचा प्लॅन: तसेच, या प्लॅनमध्ये Zee5, Watcho, Hoichoi, Hungama Play, EPIC ON, Chaupal, Oho Gujrati आणि Kikk वरील कंटेन्टचा आनंद दर्शकांना घेता येईल.

199 रुपयांचा प्लॅन: तसेच 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar, Zee5, Watcho, Lionsgate Play, Hoichoi, Hungama Play, EPIC ON, Chaupal, Oho Gujrati आणि Kikk ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेंटचा अ‍ॅक्सेस दिला जाईल.

299 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये एकूण 11 ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ मिळेल, ज्यात Sony LIV, Disney+ Hotstar, Zee5, Watcho, Lionsgate Play, Hoichoi, Hungama Play, EPIC ON, Chaupal, Oho Gujrati आणि Kikk चा समावेश करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

new Watcho plans कंपनीनं Dish TV आणि non-Dish TV कस्टमर्ससाठी सादर केले आहेत. म्हणजे तुम्ही डिश टीव्ही ग्राहक नसलात तरी देखील या प्लॅन अंतर्गत तुमच्या फोन, टीव्ही किंवा लॅपटॉपवरून ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅक्सेस करू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 49 रुपयांमध्ये 5 OTT अ‍ॅप्सचं सब्सस्क्रिप्शन; Dish TV नं आणले चार नवीन प्लॅन, सर्वांना येणार वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/dish-tv-launches-watcho-ott-plans-zee5-disney-plus-hotstar-price-start-rs-49/feed/ 0