Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

Foldable Smartphone चा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम Samsung चं समोर येतं. सॅमसंग कंपनीनं फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपल्या Galaxy Fold आणि Galaxy Z Flip स्मार्टफोन्सच्या माध्यमातून धुमाकूळ घालत आहे. हे फोन चांगले वाटत परंतु जेव्हा विकत घेण्याची वेळ येते तेव्हा महागडी किंमत पाहून काढता पाय घ्यावा लागतो. परंतु आज घडी होणारा मोबाइल फोन म्हणजे फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या बाजारात सॅमसंगला आव्हान देत हुवावेना आपला नवीन मोबाइल फोन Huawei Pocket S लाँच केला आहे. याला cheapest foldable Smartphone असं म्हटलं जातंय ज्याची किंमत जवळपास 60,000 रुपयांच्या बजेटमध्ये आहे.

Huawei Pocket S Display

हुवावे पॉकेट एस मध्ये 2790 x 1188 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.9 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर 1.04 इंचाचा सेकंडरी डिस्प्ले आहे. हे देखील वाचा: स्मार्टफोन्सचा स्टॉक संपवण्यासाठी Redmi चा क्लीयरेंस सेल, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळवा रेडमी फोन

foldable smartphone huawei pocket s launched price features specifications

Huawei Pocket S Design

हुवावेनं लुक आणि डिजाईनच्या बाबतीत सॅमसंगला चांगलीच टक्कर दिली आहे. Huawei Pocket S Foldable Smartphone पाच रंगात लाँच करण्यात आला आहे ज्यात Mint Green, Gold Yellow, Rose Pink, Ice Crystal Blue आणि Black कलरचा समावेश आहे.

Huawei Pocket S Processor

हुवावे पॉकेट एसमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे जो हॉरमनी ओएस 3 वर चालतो. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Huawei Pocket S Camera

फोटोग्राफीसाठी हा फोल्डेबल स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर 40 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Huawei Pocket S 10.7 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Huawei Pocket S Battery

पावर बॅकअपसाठी या छोट्याश्या स्मार्टफोनमध्ये 4,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 40वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते जी कमी वेळात फुल चार्ज होते. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त 5G फोन 7 नोव्हेंबरला होईल लाँच; 50MP कॅमेऱ्यासह मिळणार 7GB रॅम, जाणून घ्या किंमत

Huawei Pocket S Price

हुवावे पॉकेट एस 8 जीबी रॅमसह तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत RMB 5,988 (जवळपास 68,000 रुपये) आहे. तर फोनचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 6,488 (जवळपास 73,700 रुपये) तर सर्वात मोठा 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 7,488 म्हणजे जवळपास 85,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here