PAN Aadhaar Link - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 Mar 2023 12:45:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली https://www.91mobiles.com/marathi/pan-aadhaar-linking-date-extend-to-june-30-know-all-details/ https://www.91mobiles.com/marathi/pan-aadhaar-linking-date-extend-to-june-30-know-all-details/#respond Tue, 28 Mar 2023 12:45:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19843 पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मर्यादा 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. परंतु, आता अर्थ मंत्रालयाने मंगळवारी एक नवीन माहिती जारी करून सांगितलं आहे की पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे. या तारखेनंतर अनलिंक असलेले पॅन कार्ड निष्क्रिय मानले जातील. […]

The post सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • पॅन-आधार लिंक करण्याची मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली.
  • 1000 रुपये शुल्क देऊन आधार-पॅन लिंक करता येईल.
  • इनकम टॅक्स अ‍ॅक्टच्या कलम 139AA अंतगर्त हे आवश्यक आहे.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मर्यादा 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. परंतु, आता अर्थ मंत्रालयाने मंगळवारी एक नवीन माहिती जारी करून सांगितलं आहे की पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे. या तारखेनंतर अनलिंक असलेले पॅन कार्ड निष्क्रिय मानले जातील. निष्क्रिय होण्याव्यतिरिक्त, ज्यांचं आधार आणि पॅन जोडलेलं नसेल त्यांना इनकम टॅक्स रिफंड मिळणार नाही. तसेच जेवढ्या कालावधीसाठी पॅन निष्क्रिय राहील त्या कालावधीसाठी रिफंडवर व्याज मिळणार नाही.

PIB नं सोशल मीडियावर दिली माहिती

पीआयबीनं ट्विट करून सांगितलं आहे की करदात्यांना आणखी थोडा वेळ देण्यासाठी पॅन-आधार जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलून 30 जून 2023 करण्यात आली आहे. Aadhaar आणि PAN Card लिंक करण्याची तारीख पुढे ढकलल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा: 10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (सेबी) नं गुंतवणूकदारांना या कालावधीत आपलं पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी सांगितलं आहे. जर हे काम वेळेवर केलं नाही तर गुंतवणूकदार एनएसई आणि बीएसई सारख्या शेअर मार्केट्सवर व्यवहार करू शकणार नाहीत. अनिवासी भारतीय, भारताचे नागरिक नसलेली व्यक्ती आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पॅन-आधार लिंकिंग आवश्यक नाही. तसेच, आसाम, मेघालय आणि जम्मू कश्मीरच्या रहिवाश्याना देखील आपलं पॅन आधारशी लिंक करण्याची गरज नाही. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन

पॅनशी आधार लिंक करणं का आवश्यक आहे

इनकम टॅक्स अ‍ॅक्टच्या कलम 139AA अंतगर्त पॅनशी आधार लिंक करण आवश्यक आहे. तसेच 1 जुलै 2017 पूर्वी जारी करण्यात आलेल्या पॅनसह आधार नंबर जोडणं आवश्यक आहे आणि हे काम पॅन-आधार लिंक करून करता येतं. सरकारनं गेल्यावर्षी जुलैमध्ये संसदेत सांगितलं होतं की आतापर्यंत एकूण 61,73,16,313 लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आलं आहे. यातील 46,70,66,691 लोकांनी आपलं पॅन, आधारशी लिंक केलं आहे.

The post सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pan-aadhaar-linking-date-extend-to-june-30-know-all-details/feed/ 0