10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera

Highlights

  • Redmi 12C प्रोडक्ट पेज शाॅपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह झालं आहे.
  • अ‍ॅमेझॉनवर खुलासा झाला आहे की रेडमी 12सी ची प्राइस 10 हजारांपेक्षा कमी असेल.
  • हा लो बजेट रेडमी मोबाइल 30 मार्चला भारतात लाॅन्च होईल.

Xiaomi कंपनीनं सांगितलं आहे की ते येत्या 30 मार्चला भारतात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi 12C लाॅन्च करणार आहेत. या फोनचं प्रोडक्ट पेज शाॅपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमधून रेडमी 12सीची प्राइस देखील समोर आली आहे. इथे सांगण्यात आलं आहे की Redmi 12C 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाॅन्च होईल.

रेडमी 12सी ची किंमत

अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह झालेलं प्रोडक्ट पेज पाहता, रेडमी 12सीची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल. कंपनीचा दावा आहे की Redmi 12C साल 2023 मध्ये लाॅन्च झालेल्या 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या सर्व स्मार्टफोन्समध्ये सर्वात फास्ट असेल. हा रेडमी मोबाइल मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटसह मार्केटमध्ये एंट्री करेल. आशा आहे की रेडमी 12सीची विक्री देशात 8,999 रुपयांपासून सुरु होऊ शकते. हे देखील वाचा: Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा

रेडमी 12सी स्पेसिफिकेशन्स

  • 6.71″ HD+ Display
  • 5GB Virtual RAM
  • MediaTek Helio G85
  • 50MP Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

Redmi 12C चायना मॉडेल पाहता हा 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणारा मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 एमपी2 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच

Redmi 12C फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here