Phone Fire - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 20 Nov 2019 07:14:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/#respond Wed, 20 Nov 2019 07:14:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5815 हि घटना जेव्हा Xiaomi ला समजली, तेव्हा ते म्हणाले कि, ‘ते बदल्यात नवीन स्मार्टफोन देऊ शकत नाहीत’.

The post Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन मध्ये आग लागणे आणि बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना समोर येत असतात. काही दुर्घटनांचे कारण यूजरची चूक असते, ज्यामुळे प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याला नवीन शिकवण मिळते. जेव्हा चूक यूजरची असते तेव्हा त्याला समजावले जाते, पण जेव्हा कोणतीही चूक नसताना तुमच्या स्मार्टफोनला आग लागली तर काय होईल? आणि त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे फोन विकत घेऊन फक्त एक महीनाच झाला असेल आणि ब्रँड न्यू स्मार्टफोन मध्ये ठेवल्या जागी आग लागली तर? अशीच एक घटना महाराष्टातून समोर आली आहे जिथे एका तरुणाच्या नव्या कोऱ्या स्मार्टफोनला आग लागली. आणि तो स्मार्टफोन होता Xiaomi चा Redmi Note 7S!

Xiaomi Redmi Note 7S ला आग लागण्याची घटना ठाणे जिल्ह्यातील आहे. Redmi Note 7S चा वापर ईश्वर चव्हाण नावाचा यूजर करत होता. चव्हाण यांच्यानुसार गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबरला त्याने स्वतःसाठी नवीन Xiaomi Redmi Note 7S आर्डर केला होता. ऑनलाईन शॉपिंग साइटवरून फोन मागवल्यानंतर Redmi Note 7S ऑक्टोबरच्या तीन तारखेला तारीख त्याला मिळाला. ईश्वर एक महिनाभर कोणत्याही अडचणीविना आपला शाओमी स्मार्टफोन वापरत होता.

पण 3 नोव्हेंबरला जेव्हा ईश्वर आपल्या ऑफिस मध्ये काम करत होता तेव्हा त्याला अचानकपणे काहीतरी जळाल्याचा वास आला. जेव्हा त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या त्याच्या Redmi Note 7S स्मार्टफोन मधून धूर येत होता. बघता बघता त्याच्या फोन मध्ये आग लागली. काही लक्षात येण्याआधी त्याच्या फोनचा प्लास्टिक कवर वितळून गेला होता आणि फोन खूप गरम असल्यामुळे उचलता पण येत नव्हता.

ईश्वरचे नशीब चांगले होते म्हणून Redmi Note 7S स्मार्टफोनला फक्त आग लागली पण त्याचा स्फोट झाला. जर फोन मध्ये स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने ईश्वर किंवा आजूबाजूच्या इतर कोणालाही कोणतीही हानी झाली नाही. ईश्वरने स्पष्ट केले कि त्याने फोन चार्जिंगला लावला नव्हता किंवा फोन कुठेही पडला नव्हता. आग लागली तेव्हा फोन बाजूला ठेवलेले होता, तो फोन कोणी वापरत पण नव्हतं.

फोन जळाल्यामुले ईश्वराला आपला सिम कार्ड पण काढता आले नाही. Redmi Note 7S ला आग लागल्याची हि घटना जेव्हा Xiaomi ला समजली, तेव्हा ते म्हणाले कि, ‘ते बदल्यात नवीन स्मार्टफोन देऊ शकत नाहीत’. Xiaomi कडून मिळालेल्या या प्रतिसादामुळे फक्त ईश्वर नाही तर इतर शाओमी व रेडमी फोन यूजर्सना पण मोठा धक्का बसला आहे.

Source : gizchina

The post Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/feed/ 0
चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 13:43:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=862 फायर विभाग ने या आगीचे कारण स्मार्टफोनच आहे असे सांगितले आहे.

The post चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती ज्यात गॅलेक्सी नोट 2 ला आग लागल्याची बाब समोर आली होती. ही घटना मुंबईत घडली होती, त्या नंतर स्मार्टफोन यूजर्स खुप घाबरले आहेत. या बातमीला अजून एक आठवडा पण झाला नाही की पुन्हा एकदा सॅमसंग स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची बातमी येत आहे. यावेळी प्रसंग इतका गंभीर होता ज्यात स्मार्टफोन च्या आगीने कार ला पण आग लागली.

सॅमसंग स्मार्टफोन मध्ये आग लागण्याची ही घटना अमेरिकेतील आहे. अमेरिकन मीडिया नुसार एक महिलेच्या सॅमसंग स्मार्टफोन मध्ये तेव्हा आग लागली जेव्हा ती कार चालवत होती. आगीच्या ज्वाला बघून महिला समझदारी दाखवत कार मधून उतरली पण फोन मध्ये लागलेली आग इतकी भयानक होती की तिने थोड्या वेळेत संपूर्ण कार ताब्यात घेतली आणि जाळून राख केली.

मीडिया रिपोर्ट नुसार महिले कडे सॅमसंग चे 2 स्मार्टफोन होते. यात गॅलेक्सी एस8 आणि गॅलेक्सी एस4 यांचा समावेश होता. जेव्हा महिला कार चालवत होती त्यावेळी हे दोन्ही स्मार्टफोन महिलेच्या कार मध्ये होते. दोन्ही फोन मध्ये अचानक आग लागली. महिले नुसार ती लवकरच कार थांबवून बाहेर पडली होती पण थोड्याच वेळात आग पूर्णपणे गाडीत पसरली होती.

महिले चे म्हणणे आहे की जर तिची कार ट्रॅफिक मध्ये अडकलेली असती तर तिला कार मधून बाहेर निघणे जमले नसते आणि तिचा जीव वाचला नसता. या घटने वर सॅमसंग ने सांगितले की त्यांचे डिवाईस संपूर्ण प्रशिक्षणानंतर विकले जात आहेत त्यामुळे अशी घटना घडणे अशक्य वाटते. तर दुसरीकडे फायर विभाग ने या आगीचे कारण स्मार्टफोनच आहे असे सांगितले आहे.

या घटनेत महिले चा जीव वाचला पण दोन्ही स्मार्टफोन आणि कार सह पीडित महिलेचे खुप नुकसान झाले आहे. याचा तपास पोलिस करत आहेत. तर दुसरीकडे रोजची गरज असणार्‍या स्मार्टफोंस मुळे अशा प्रकारचे प्रसंग घडणे आणि लोकांचा जीव धोक्यात येणे मोबाईल कंपन्यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. तसेच एका सामन्य यूजर च्या जिवाशी होणार्‍या खेळाचे गांभीर्य इथे स्पष्ट दिसते.

The post चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/feed/ 0