Poco C3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Jan 2021 14:13:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/#respond Thu, 07 Jan 2021 14:13:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9584 पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO फॅन्ससाठी साल 2021 खास असणार आहे असे वाटत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पोको इंडिया आपल्या फॅन्सना एका मागून एक आनांदाच्या बातम्या देत आहे. कालच बातमी समोर आली होती कि पोकोचा हिट स्मार्टफोन Poco F1 चा नवीन वर्जन Poco F2 आता लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. तसेच आज कंपनीने घोषणा केली आहे कि पोकोने आपल्या 7 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करत त्यांची किंमत 4,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.

पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे. सर्वप्रथम पोको सी3 पाहता 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन आतापर्यंत 10,999 रुपयांमध्ये विकला जात होता पण कंपनीने याची किंमत 2,500 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर POCO C3 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

POCO M2 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. पण आता कंपनीने या वेरिएंटची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे त्यामुळे हा 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12,999 रुपये किंमत असलेल्या पोको एम2 च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,000 रुपयांनी कमी होऊन आता 9,999 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च

POCO M2 Pro चे सर्व तिन्ही वेरिएंट्सच्या किंमतीत कंपनीने 4,000 रुपयांची कपात केली आहे. या फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आता 16,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर 17,999 रुपयांमध्ये मिळणारा फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 तर 19,999 रुपये किंमत असलेला 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी होऊन 15,999 रुपये झाली आहे.

POCO X3 स्मार्टफोन ज्याचा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट आतापर्यंत 20,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. त्यावर कंपनीने 3,000 रुपयांचा प्राइस कट केला आहे. या कपातीनंतर पावरफुल पोको एक्स3 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पोकोचे हे सर्व स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर नवीन किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/feed/ 0
POCO चा नवीन स्मार्टफोन आला समोर, 4 जीबी रॅम आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram-snapdragon-662-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/poco-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram-snapdragon-662-chipset/#respond Tue, 17 Nov 2020 15:31:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8973 पोकोचा हा आगामी स्मार्टफोन गीकबेंच वर Xiaomi M2010J19CG मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post POCO चा नवीन स्मार्टफोन आला समोर, 4 जीबी रॅम आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन POCO C3 लॉन्च केला होता. हा फोन फक्त 7,499 रुपयांमध्ये बाजारात आला होता जो ब्रँडचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. Xiaomi सह हिट झाल्यानंतर इंडिपेंडेंट ब्रँड पोकोने भारतात नवीन सुरवात केली आहे. तसेच आता बातमी येत आहे कि पोको आपल्या अजून एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येईल. पोकोचा हा आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट झाला आहे.

पोकोचा हा आगामी स्मार्टफोन गीकबेंच वर Xiaomi M2010J19CG मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोनच्या नावाची माहिती तर मिळाली नाही पण चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन पोको ब्रँड अंतगर्तच लॉन्च केला जाईल. पोको फोनची हि लिस्टिंग आज म्हणजे 17 नोव्हेंबरची आहे जिथे फोनला सिंगल-कोर मध्ये 299 स्कोर देण्यात आला आहे तसेच गीकबेंच वर मल्टी-कोर मध्ये या फोनला 1252 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच वर एकीकडे फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत तसेच फोन लवकरच बाजारात येण्याची आशा वाढली आहे.

POCO ब्रँड अंतगर्त लॉन्च होणारा हा स्मार्टफोन गीकबेंच वर अँड्रॉइड 10 ओएस सह लिस्ट केला गेला आहे. फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर असल्याचा खुलासा झाला आहे ज्याची बेस फ्रिक्वेंसी 1.80गीगाहर्ट्ज असेल. गीकबेंच वर हा पोको फोन 4 जीबी रॅम सह लिस्ट झाला आहे. आशा आहे कि बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त वेरिंएट्स मध्ये एंट्री घेईल. फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट असल्याचे गीकबेंच लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स, नाव व लॉन्च डिटेलसाठी वाट बघावी लागेल.

POCO C3

पोको सी3 पाहता हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 7,499 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत 8,999 रुपये आहे. हा फोन Arctic Blue, Lime Green आणि Matte Black कलर मध्ये विकत घेता येईल.

POCO C3 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ सिनेमॅटिक डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन पी2आई कोटेड आहे जी पाण्याच्या थेंबांपासून फोन डॅमेज होण्यापासून वाचवते. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता POCO C3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. POCO C3 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबतच 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी पोको सी3 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

शाआोमी पोको सी3 व्हिडीओ

The post POCO चा नवीन स्मार्टफोन आला समोर, 4 जीबी रॅम आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-phone-listed-on-geekbench-with-4gb-ram-snapdragon-662-chipset/feed/ 0
POCO ची नवी खेळी, फक्त 7499रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी असलेला ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन POCO C3 https://www.91mobiles.com/marathi/poco-c3-launch-in-india-5000-mah-battery-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c3-launch-in-india-5000-mah-battery-camera-specs-price-sale/#respond Tue, 06 Oct 2020 12:55:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8406 पोकोने आज भारतात आपला अजून एक नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन POCO C3 लॉन्च केला आहे.

The post POCO ची नवी खेळी, फक्त 7499रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी असलेला ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन POCO C3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सोबत राहून हिट झालेल्या टेक ब्रँड POCO ने जुळ्या मध्ये स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 Pro लॉन्च केला होता. हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च झाला होता जो सध्या 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. पोको एम2 प्रोच्या माध्यमातून बजेट सेग्मेंट मध्ये येणाऱ्या पोकोने आज भारतात आपला अजून एक नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन POCO C3 लॉन्च केला आहे. मोठी बॅटरी आणि शानदार कॅमेरा असलेल्या या फोनने पण लो बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे या फोनची बेस किंमत फक्त 7,499 रुपये आहे.

POCO C3

पोको सी3 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ सिनेमॅटिक डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध छोटीशी नॉच आहे त्यात सेल्फी कॅमेरा आहे. POCO C3 पी2आई कोटेड आहे जो पाण्याच्या छोट्या थेंबांपासून फोन डॅमेज होऊ देत नाही.

POCO C3 अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी पोको सी3 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजरात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता POCO C3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच पोको सी3 चा रियर कॅमेरा 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी पोको सी3 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

POCO C3 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबतच वॉयस ओवर वाई-फाई फीचर सह पण येतो. 3.5एमएम जॅक सोबतच हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी पोको सी3 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत व विक्री

POCO C3 चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 7,499 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. पोको सी3 येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल तसेच हा Arctic Blue, Lime Green आणि Matte Black कलर मध्ये विकत घेता येईल.

The post POCO ची नवी खेळी, फक्त 7499रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी असलेला ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन POCO C3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c3-launch-in-india-5000-mah-battery-camera-specs-price-sale/feed/ 0