Xiaomi सोबत राहून हिट झालेल्या टेक ब्रँड POCO ने जुळ्या मध्ये स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 Pro लॉन्च केला होता. हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च झाला होता जो सध्या 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. पोको एम2 प्रोच्या माध्यमातून बजेट सेग्मेंट मध्ये येणाऱ्या पोकोने आज भारतात आपला अजून एक नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन POCO C3 लॉन्च केला आहे. मोठी बॅटरी आणि शानदार कॅमेरा असलेल्या या फोनने पण लो बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे या फोनची बेस किंमत फक्त 7,499 रुपये आहे.
POCO C3
पोको सी3 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ सिनेमॅटिक डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध छोटीशी नॉच आहे त्यात सेल्फी कॅमेरा आहे. POCO C3 पी2आई कोटेड आहे जो पाण्याच्या छोट्या थेंबांपासून फोन डॅमेज होऊ देत नाही.

POCO C3 अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी पोको सी3 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजरात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता POCO C3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच पोको सी3 चा रियर कॅमेरा 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी पोको सी3 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
POCO C3 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबतच वॉयस ओवर वाई-फाई फीचर सह पण येतो. 3.5एमएम जॅक सोबतच हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी पोको सी3 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत व विक्री
POCO C3 चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 7,499 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. पोको सी3 येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल तसेच हा Arctic Blue, Lime Green आणि Matte Black कलर मध्ये विकत घेता येईल.















