Poco F2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-f2-will-not-come-with-snapdragon-732g-chipset-poco-india-anuj-sharma-confirms/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f2-will-not-come-with-snapdragon-732g-chipset-poco-india-anuj-sharma-confirms/#respond Mon, 18 Jan 2021 07:22:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9678 POCO इंडियाच्या हेडनी वापरण्यात येणार्‍या चिपसेटचा खुलासा केला नाही, आपण अंदाज लावू शकतो की हा स्नॅपड्रॅगन 865 किंवा नवा स्नॅपड्रॅगन 888 SoC असू शकतो.

The post POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षीपासून पोकोच्या नव्या आणि दमदार फोन पोको F2 च्या लॉन्चची टेक विश्व आणि भारतीय चाहते वाट बघत आहेत. पण, 2020 मध्ये फोन लॉन्च झाला नाही. तसेच आता समोर आलेल्या माहितीनुसार वाटत आहे की यावर्षी ही प्रतीक्षा संपणार आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला होता कि हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स सह न येता मिड रेंज स्पेक्स सह येईल. रिपोर्ट्स नुसार हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर सह लॉन्च होऊ शकतो. तसेच आता टिप्सटर मुकुल शर्माकडे बोलताना Poco India चे डायरेक्टर अनुज शर्मा यांनी सांगितले कि अपकमिंग POCO F-Series फोन स्नॅपड्रॅगन 732G सह येणार नाही.

अनुज शर्मा यांनी स्पष्ट केले कि स्नॅपड्रॅगन 732G एक मिड-रेंज चिपसेट आहे जो आधीच POCO X3 मध्ये वापरण्यात आला आहे. F सीरीज कंपनीच्या एक्स सीरीज पेक्षा वर आहे, त्यामुळे शर्मा यांनी सुचवले आहे की POCO F2 एक शक्तिशाली, कदाचित एका फ्लॅगशिप-स्तरीय, चिपसेट सह येईल.

POCO F1 कंपनीने साल 2018 मध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 SoC सह सादर करण्यात आला होता. POCO इंडियाच्या हेडनी वापरण्यात येणार्‍या चिपसेटचा खुलासा केला नाही, आपण अंदाज लावू शकतो की हा स्नॅपड्रॅगन 865 किंवा नवा स्नॅपड्रॅगन 888 SoC असू शकतो.

अनुज शर्मा यांनी सांगितले कि नव्या पोको स्मार्टफोनची किंमत पोको एफ1 च्या तुलनेत जास्त असेल कारण स्मार्टफोन Poco F1 च्या किंमतीत लॉन्च करने शक्य होणार नाही.

Poco F2

पोको एफ2 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत, त्यात लॉन्चच्या टाईमलाईन पासून यातील स्पेसिफिकेशन्स पर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. या लीक्सनुसार पोको एफ2 स्मार्टफोन एंडरॉयड 11 वर लॉन्च केला जाईल. तसेच या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. तसेच क्वॉड रियर कॅमेर्‍यासह फोटोग्राफीसाठी पोको एफ2 मध्ये 4,250एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f2-will-not-come-with-snapdragon-732g-chipset-poco-india-anuj-sharma-confirms/feed/ 0
Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-f2-to-launch-in-india-soon-company-video-teased/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f2-to-launch-in-india-soon-company-video-teased/#respond Mon, 04 Jan 2021 13:58:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9533 Poco ने नवीन वर्षाच्या सुरवातीला एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड केला होता ज्यात Poco F2 चा उल्लेख केला गेला आहे.

The post Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सोबत असताना POCO चे Poco F1 स्मार्टफोनमुळे खूप कौतुक झाले होते. इंडियन युजर्सना हा फोन खूप आवडला होता, त्यानंतर पोको एक स्वतंत्र ब्रँड म्हणून समोर आला होता. गेल्या वर्षी अनेक प्रकारच्या लीक्स मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी Poco F2 पण लॉन्च करेल, पण 2020 मध्ये असे झाले नाही. पण आता वाटत आहे कि पोको फॅन्सची इच्छा साल 2021 मध्ये पूर्ण होईल. कंपनीने एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात Poco F2 चा उल्लेख झाला आहे.

Poco ने नवीन वर्षाच्या सुरवातीला एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड केला होता ज्यात Poco F2 चा उल्लेख केला गेला आहे. पोकोने या फोनच्या लॉन्च बाबत काही सांगितले नाही पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आशा आहे कि कंपनी लवकरच Poco F2 पण सादर करून याच्या लॉन्च डेटची माहिती देऊ शकते. साल 2021 मध्ये लॉन्च होणारा हा पहिला पोको फोन Poco F2 स्मार्टफोन असू शकतो.

Poco F2

पोको एफ2 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत, त्यात लॉन्चच्या टाईमलाईन पासून यातील स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला गेला आहे. या लीक्सनुसार पोको एफ2 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल आणि प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट दिला जाऊ शकतो. या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. तसेच क्वॉड रियर कॅमेऱ्यासह फोटोग्राफीसाठी पोको एफ2 मध्ये 4,250एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21

Poco F2 Pro

पोको एफ2 प्रो पाहता या फोन मध्ये 1080×2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो पॉप-अप डिजाईन वर बनला आहे. अँड्रॉइड 10 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 5जी प्रोसेसर वर चालतो. सोबतच फोन मध्ये 6GB रॅम आणि 8GB रॅम सह 128GB व 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4700mAh ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

POCO F2 Pro मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सल सोनी IMX686 प्राइमरी सेंसर OIS, 5 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस (3cm ~ 7cm ऑटोफोक्स मॅक्रो), 13 मेगापिक्सल 123-डिग्री अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेट मध्ये 20 मेगापिक्सल सेल्फी शूटर 120fps स्लो-मोशनल व्हिडीओ सपोर्ट देण्यात आला आहे.

व्हिडीओ

The post Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f2-to-launch-in-india-soon-company-video-teased/feed/ 0
Redmi K30 Pro येत आहे भारतात, POCO F2 म्हणून होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-to-launch-in-india-as-rebranded-poco-f2-full-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-to-launch-in-india-as-rebranded-poco-f2-full-specs-price/#respond Thu, 26 Mar 2020 13:00:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6905 Redmi K30 Pro भारतात POCO ब्रँड अंतर्गत लॉन्च केला जाईल आणि आशा कि भारतात रेडमी के30 प्रो POCO F2 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Redmi K30 Pro येत आहे भारतात, POCO F2 म्हणून होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने अलीकडेच चीन मध्ये आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत नवीन फ्लॅगशिप फोन Redmi K30 Pro लॉन्च केला आहे जो हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतो. हा फोन टेक मंचावर आल्यानंतर पासून इंडियन यूजर्सना प्रश्न पडला आहे कि रेडमी के30 प्रो भारतात कधी येईल. कंपनीने याविषयी कोणतीही माहिती दिली नाही पण मोबाईल यूजर्सच्या प्रश्नाचे उत्तर जवळपास मिळाले आहे. Redmi K30 Pro संबंधित एक अशी फाईल समोर आली आहे जी ईशारा करत आहे कि हा फोन लवकरच भारतात लॉन्च होईल. विशेष म्हणजे रेडमी के30 प्रो भारतात Xiaomi Redmi ब्रँड अंतर्गत नाही तर POCO ब्रँड अंतर्गत लॉन्च केला जाऊ शकतो.

Redmi K30 Pro च्या इंडिया लॉन्च संबंधित हि बातमी एक्सडीए वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. एक एक्सडीए मेंबरला मीयूआई 11 बीटा मध्ये कॅमेरा ऍपची कोडिंग मिळाली आहे ज्यात रेडमी के30 प्रो च्या इंडियन वर्जनचा उल्लेख केला गेला आहे. हा फोन ‘Imiin’ कोडनेम सह कोडिंग मध्ये लिहिण्यात आला आहे. तसेच मीयूआई कॅमेरा कोड मध्ये कॅमेरा वाटरमार्क पण जयवंत ‘SHOT ON POCOPHONE’ लिहिण्यात आले आहे. या कोडिंगमुळे बोलले जात आहे कि Redmi K30 Pro भारतात POCO ब्रँड अंतर्गत लॉन्च केला जाईल आणि आशा कि भारतात रेडमी के30 प्रो POCO F2 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

Xiaomi Redmi K30 Pro

शाओमी ने रेडमी के30 प्रो आणि के30 प्रो झूम एडिशन नावाने दोन नवीन फोन चीन मध्ये लॉन्च केले आहेत. Redmi K30 Pro आणि Redmi K30 Pro Zoom Edition चे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. दोन्ही फोन्सच्या कॅमेरा आणि रॅम व स्टोरेज मध्ये थोडा फरक आहे. दोन्ही फोन्स मध्ये HDR10+ सुपर ऐमोलेड पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 1200nits आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. फोन्स मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

या डिवाइस मध्ये कंपनीने लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला आहे. वेगवान फाइल ट्रांसफरसाठी यात UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. Redmi K30 Pro मध्ये 6GB रॅम व 128GB स्टोरेज, 8GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच Redmi K30 Pro च्या झूम एडिशन मध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.

दोन्ही फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि मागे गोल क्वॉड कॅमेरा मॉड्यूल आहे. Redmi K30 Pro च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 64MP Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा मध्ये 3x ऑप्टिकल झूम आणि ड्यूल ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन आहे. तसेच फोन 13-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस 123-डिग्री फिल्ड ऑफ व्यू, 8MP टेलीफोटो 30एक्स झूम सपोर्ट आणि ओआईएस आणि 2MP सेंसर आहे. फोनच्या कॅमेऱ्यात EIS आणि 8K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे रेडमी के30 प्रो झूम एडिशन मध्ये 64MP (IMX686) + 13MP वाइड + 5MP + 2MP (मॅक्रो) लेंस आहे. दोन्ही फोन्स मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20-मेगापिकसलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi K30 Pro Zoom Edition आणि Redmi K30 Pro मध्ये सुपर ब्लूटूथ आणि लिक्विड कूलिंग फीचर देण्यात आला आहे. कंपनीने फोन मूनलाइट वाइट, स्काई ब्लू, पर्पल आणि स्पेस ग्रे कलर ऑप्शंस मध्ये सादर केला आहे. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4700एमएएच ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

SOURCE

The post Redmi K30 Pro येत आहे भारतात, POCO F2 म्हणून होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-to-launch-in-india-as-rebranded-poco-f2-full-specs-price/feed/ 0
POCO X2 आला समोर, 8जीबी रॅम सह बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-listed-on-geekbench-with-8gb-ram-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-listed-on-geekbench-with-8gb-ram-specs-leaked/#respond Thu, 16 Jan 2020 13:23:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6310 हा चिपसेट कोणत्या मॉडेल नंबर सह येईल हे अजून समोर आले नाही.

The post POCO X2 आला समोर, 8जीबी रॅम सह बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून एकाच फोनमुळे हिट झालेल्या Xiaomi च्या सब-ब्रँड Pocophone बद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत. चर्चा अशी आहे कि 2018 मध्ये लॉन्च झालेल्या Poco F1 नंतर आता कंपनी सीरीजच्या दुसऱ्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो Poco F2 नावाने लॉन्च केला जाईल. गेल्या आठवड्यात Poco F2 चा एक ट्रेडमार्क ऍप्लिकेशन डाक्यूमेंट इंटरनेट वर शेयर झाला होता, ज्यामुळे या तर्काना बळकटी दिली होती कि Poco F2 बद्दल कंपनी लवकरच एखादी घोषणा करू शकते. पण आता Xiaomi फॅन्स आणि Pocophone लवर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात ब्रँडच्या एका नवीन फोन POCO X2 चा खुलासा झाला आहे.

POCO X2 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 14 जानेवारीची आहे जिथे फोनचे नाव Xiaomi POCO X2 लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंगने पोकोफोन लीक्सला एक नवीन दिशा दिली आहे ज्यामुळे बोलले जात आहे कि कंपनी POCO F2 स्मार्टफोन सह POCO X2 स्मार्टफोन पण आणू शकते. पण अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये अशी पण चर्चा आहे कि POCO X2 POCO F2 चे दुसरे नाव असू शकते.

POCO X2

पोको एक्स2 बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर या फोनच्या नावासह इतर काही स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला आहे. लिस्टिंग मध्ये हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याची बाब गीकबेंच वर समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट वर POCO X2 मध्ये चिपसेटच्या जागी ‘phoenixin’ लिहिण्यात आले आहे. हा चिपसेट कोणत्या मॉडेल नंबर सह येईल हे अजून समोर आले नाही.

POCO X2 गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता पोको एक्स2 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 547 प्वाइंट्स मिळाले आहेत तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 1767 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच व्यतिरिक्त POCO X2 च्या इतर कोणतीही माहिती अजूनपर्यंत समोर आली नाही. त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि याच्या लॉन्च बद्दल अजूनही काही म्हणणे कठीण आहे.

POCO F2

पोको एफ2 बद्दल बोलायचे तर एका टिपस्टरने आपल्या ट्वीट मध्ये Poco F2 चे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन डाक्यूमेंट शेयर केला आहे. हे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन Xiaomi ने भरले आहे ज्यात स्पष्टपणे Poco F2 लिहिण्यात आले आहे. शेयर केल्या गेलेल्या डाक्यूमेंट्स मध्ये एक फाइल इग्रंजी मध्ये आहे तर दुसरी फाइल चीनी भाषेत आहे. ट्रेडमार्क मध्ये पोको एफ2 च्या लॉन्च डेट किंवा स्पेसिफिकेशन्सची खास माहिती मिळाली नाही पण हे डाक्यूमेंट समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Xiaomi Pocophone द्वारे Poco F2 अवश्य लॉन्च केला जाईल आणि येत्या काही आठवड्यांत या स्मार्टफोनची अधिकृत माहिती पण कंपनी टीज करू शकते.

पोकोफोन ग्लोबल हेड Alvin Tse च्या एका ट्वीट बद्दल बोलायचे तर एलविन यांनी एका व्यक्तीच्या ट्वीटला रिप्लाई करत Poco F2 बद्दल पोस्ट केली होती. ट्वीटर यूजरने पोको ब्रँड कडून Poco F1 चा सक्सेसर म्हणजे आगामी वर्जन बद्दल विचारले होते, ज्याचे उत्तर देताना एलविन यांनी लिहिले कि, “You will hear more from POCO in 2020.” म्हणजे तुम्ही साल 2020 मध्ये POCO बद्दल खूप काही ऐकणार आहात. एलविन यांनी काही वेळात आपले ट्वीट डिलीट केले. पण या ट्वीट नंतर असे बोलले जात होते कि Poco F2 नावाने नवीन फोन शाओमी द्वारे लॉन्च केला जाऊ शकतो. POCO च्या कोणत्याही आगामी फोन बद्दल अजूनतरी ठोस काही बोलता येणार नाही.

The post POCO X2 आला समोर, 8जीबी रॅम सह बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x2-listed-on-geekbench-with-8gb-ram-specs-leaked/feed/ 0
Poco F2 बद्दल कंपनीच्या अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा, नवीन वर्षात येईल, असेल Poco F1 पेक्षा ताकदवान https://www.91mobiles.com/marathi/pocophone-global-head-alvin-tse-tweet-poco-f2-in-2020-might-launch/ https://www.91mobiles.com/marathi/pocophone-global-head-alvin-tse-tweet-poco-f2-in-2020-might-launch/#respond Mon, 23 Dec 2019 12:56:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6115 हे ट्वीट समोर आल्यानंतर निश्चित झाले आहे कि कंपनी Poco F2 किंवा इतर कोणत्यातरी नावाने एखादा पोको फोन लॉन्च करेल.

The post Poco F2 बद्दल कंपनीच्या अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा, नवीन वर्षात येईल, असेल Poco F1 पेक्षा ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्यावर्षी म्हणजे 2018 मध्ये आपला सबब्रँड Pocophone अंतर्गत Poco F1 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन तेव्हाच्या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स पैकी एक होता जो मोबाईल यूजर्सना आवडला होता. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर लॉन्च झालेल्या Poco F1 नंतर स्मार्टफोन यूजर या डिवाईसच्या अपग्रेडेड वर्जनची वाट बघत आहेत आहेत आणि अधूनमधून Poco F2 संबंधित लीक्स पण समोर येत आहेत. पण आता स्वतः Pocophone Global head ने एक असा ट्वीट केला आहे ज्यामुळे आशा अजून वाढली आहे कि Poco F2 लवकरच टेक मंचावर येऊ शकतो.

पोकोफोन ग्लोबल हेड Alvin Tse च्या एका ट्वीटने Poco F2 च्या लॉन्चचा उल्लेख पुन्हा समोर आला आहे. एलविन यांनी एका व्यक्तीच्या ट्वीटर वर रिप्लाई करत Poco F2 बद्दल पोस्ट केली आहे. ट्वीटर यूजरने पोको ब्रँडला Poco F1 च्या सक्सेसर बद्दल विचारले होते, त्याचे उत्तर देताना एलविन यांनी लिहिले कि, “You will hear more from POCO in 2020.” म्हणजे तुम्ही साल 2020 मध्ये POCO बद्दल खूप काही ऐकाल. हे ट्वीट समोर आल्यानंतर निश्चित झाले आहे कि कंपनी Poco F2 किंवा इतर कोणत्यातरी नावाने एखादा पोको फोन लॉन्च करेल.

एलविन यांच्या ट्वीट नंतर जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा त्यांनी आपले ट्वीट डिलीट केले. पण या ट्वीट नंतर टेक विश्वात चर्चाना उधाण आले आहे कि कंपनी साल 2020 मध्ये नक्कीच आपली Poco F सीरीज वाढवेल आणि या सीरीजचा आगामी स्मार्टफोन Poco F2 नावासह लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एक शाओमी फोन Xiaomi M1912G7BE / M1912G7BC मॉडल नंबर सह 3C सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला होता, हा फोन Poco F2 असल्याचे बोलले जात आहे. लिस्टिंग मध्ये हा फोन 27W रॅपिड चार्ज टेक्नॉलॉजी सह दाखवण्यात आला होता.

Poco F1

Poco F1 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 416पीपीआई सपोर्ट व 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर बनलेला आहे तसेच 10एनएम 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल. कपंनी ने Poco F1 लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो हाई ग्राफिक्स गेम व हेवी प्रोसेसिंगच्या वेळी फोन गरम होऊ देत नाही. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Poco F1 मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Poco F1 कंपनीने 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी मेमरीच्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो आता 18,999 रुपयांमध्ये मिळत आहे. त्याचप्रमाणे Poco F1 चा 8 जीबी रॅम + 256 जीबी मेमरी वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो आता 22,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच Poco F1 चा सर्वात छोटा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Poco F2 बद्दल कंपनीच्या अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा, नवीन वर्षात येईल, असेल Poco F1 पेक्षा ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pocophone-global-head-alvin-tse-tweet-poco-f2-in-2020-might-launch/feed/ 0
6जीबी रॅम वाला पोको एफ1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, कुठे आणि कसा घ्यावा विकत वाचा सविस्तर https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-price-cut-by-rs-2000-in-india-feature-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-price-cut-by-rs-2000-in-india-feature-specifications/#respond Wed, 20 Mar 2019 13:13:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3902 लक्षात असू दे कंपनीने केलेला हा प्राइज कट कायमचा नाही आहे.

The post 6जीबी रॅम वाला पोको एफ1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, कुठे आणि कसा घ्यावा विकत वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने गेल्यावर्षी पोको फोनच्या रूपात आपला नवीन ब्रँड भारतीय बाजारात आणला होता. या ब्रँडची सुरवात पोको एफ1 स्मार्टफोनने झाली होती. ज्याने लॉन्च होताच यशाचे नवीन विक्रम केले होते. पोको एफ1 तेव्हा क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर सादर केला गेला होता. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन देशात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. आता आपल्या फॅन्सना भेट देत पोको इंडिया ने पोको एफ1 ची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे.

पोको इंडियाने पोको एफ1 च्या 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे. हा वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. कंपनीने आधी या वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली होती त्यानंतर हा 22,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. आता 2,000 रुपयांच्या कपातीनंतर हा स्मार्टफोन 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लक्षात असू दे कंपनीने केलेला हा प्राइज कट कायमचा नाही आहे. पोको एफ1 चा 6जीबी रॅम वेरिएंट 25 मार्च पासून 28 मार्च पर्यंत या नवीन किंमतीत विकत घेता येईल.

पोको एफ1
पोको एफ1 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 416पीपीआई सपोर्ट व 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर बनलेला आहे तसेच 10एनएम 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल. कपंनी ने पोको एफ1 लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो हाई ग्राफिक्स गेम व हेवी प्रोसेसिंगच्या वेळी फोन गरम होऊ देत नाही. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पोको एफ1 मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

भारतात पोको एफ1 तीन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. दोन वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात तर फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वेरीएंट 19,999 रुपये तसेच 8जीबी/128जीबी मेमोरी वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर 6जीबी/128जीबी स्टोरेज वेरिएंट सध्या 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम वाला पोको एफ1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, कुठे आणि कसा घ्यावा विकत वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-price-cut-by-rs-2000-in-india-feature-specifications/feed/ 0
कीलर पोको एफ1 ची की किंमत झाली कमी, पोको एफ2 च्या खरेदीवर वर मिळेल 14,700 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-offer-and-poco-f2-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-offer-and-poco-f2-launch-in-marathi/#respond Thu, 11 Oct 2018 13:11:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2454 पोको एफ1 वर 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.तसेच मिनिमम एक्सचेंज वॅल्यु 500 रुपये आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन पोको फोन घेतलात तर 14,700 रुपयांचा बायबॅक देण्यात येईल जो 6—8 महिन्यात फ्लिपकार्ट वरूनघेता येईल.

The post कीलर पोको एफ1 ची की किंमत झाली कमी, पोको एफ2 च्या खरेदीवर वर मिळेल 14,700 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस ने जेव्हा आपला फोन लॉन्च केला होता तेव्हा त्याला फ्लॅगशिप कीलर नाव देनाय्त आले होते. कारण कंपनीने कमी किंमतीत सर्वात बेस्ट स्पेसिफिकेशन वाले फोन लॉन्च केले. वनप्लसचे प्रत्येक फोन कमालीचे होते. पण शाओमी ब्रँड पोको ने हा समज मोडीत काढला आणि हा वनप्लस कीलर म्हणून समोर आला. कंपनीने 21,000 रुपयांच्या बजेट मध्ये सर्वात बेस्ट स्पेसिफिकेशन वॉल फोन पोको एफ1 लॉन्च करून मोबाईल यूजर्सना आकर्षित करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. तसेच आता पोको एफ1 च्या प्राइस कट आणि पोको एफ2 ची माहिती देत कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे.

या कीलर फोनच्या किंमतीत कंपनीने आहे. तसेच माहिती तुम्ही नवीन पोको फोनघेतलात तर तुम्हाला 14,700 रुपयांपर्यंतचा बायबॅक मिळेल. हि माहिती स्वतः शाओमी चे इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली. त्यांनी लिहिले आहे कि पोको एफ1 वर 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.तसेच मिनिमम एक्सचेंज वॅल्यु 500 रुपये आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन पोको फोन घेतलात तर 14,700 रुपयांचा बायबॅक देण्यात येईल जो 6—8 महिन्यात फ्लिपकार्ट वरून घेता येईल.

या ट्विट मधून त्यांनी डिस्कॉउंटची माहिती दिली. तसेच कंपनी ने हे स्पष्ट केले आहे कि पोको एफ2 चा प्लान आहे जो पुढील काही महिन्यात येईल आणि फोन पण आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

एक गोष्ट स्पष्ट केलेली बरी कि बायबॅकचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 149 रुपयांची बायबॅक गारंटी पॉलिसी वेगळी विकत घ्यावी लागेल. तसेच हि आॅफर फक्त फ्लिपकार्ट च्या बिग बिलियन सेल मधेच उपलब्द असेल आणि 14 ऑक्टोबरला संपेल.

पोको एफ1 बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो.

पोको एफ1 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. तसेच 8जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनी ने यात 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच 6जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांचा आहे. 8जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post कीलर पोको एफ1 ची की किंमत झाली कमी, पोको एफ2 च्या खरेदीवर वर मिळेल 14,700 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f1-offer-and-poco-f2-launch-in-marathi/feed/ 0