चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस ने जेव्हा आपला फोन लॉन्च केला होता तेव्हा त्याला फ्लॅगशिप कीलर नाव देनाय्त आले होते. कारण कंपनीने कमी किंमतीत सर्वात बेस्ट स्पेसिफिकेशन वाले फोन लॉन्च केले. वनप्लसचे प्रत्येक फोन कमालीचे होते. पण शाओमी ब्रँड पोको ने हा समज मोडीत काढला आणि हा वनप्लस कीलर म्हणून समोर आला. कंपनीने 21,000 रुपयांच्या बजेट मध्ये सर्वात बेस्ट स्पेसिफिकेशन वॉल फोन पोको एफ1 लॉन्च करून मोबाईल यूजर्सना आकर्षित करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. तसेच आता पोको एफ1 च्या प्राइस कट आणि पोको एफ2 ची माहिती देत कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे.
या कीलर फोनच्या किंमतीत कंपनीने आहे. तसेच माहिती तुम्ही नवीन पोको फोनघेतलात तर तुम्हाला 14,700 रुपयांपर्यंतचा बायबॅक मिळेल. हि माहिती स्वतः शाओमी चे इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली. त्यांनी लिहिले आहे कि पोको एफ1 वर 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.तसेच मिनिमम एक्सचेंज वॅल्यु 500 रुपये आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन पोको फोन घेतलात तर 14,700 रुपयांचा बायबॅक देण्यात येईल जो 6—8 महिन्यात फ्लिपकार्ट वरून घेता येईल.
WHOA! ?
Mi Fans! You can buy #POCOF1 with #Snapdragon 845 (6+64GB) at just ₹ 5,799 during @Flipkart's #BigBillionDay sale starting midnight tonight ?
Check out details on how you can buy the new #MasterOfSpeed at this crazy price ?
Grabs yours here: https://t.co/dz4OltfzU7 pic.twitter.com/6X7VqD7woM
— Manu Kumar Jain (@manukumarjain) October 10, 2018
या ट्विट मधून त्यांनी डिस्कॉउंटची माहिती दिली. तसेच कंपनी ने हे स्पष्ट केले आहे कि पोको एफ2 चा प्लान आहे जो पुढील काही महिन्यात येईल आणि फोन पण आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.
एक गोष्ट स्पष्ट केलेली बरी कि बायबॅकचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 149 रुपयांची बायबॅक गारंटी पॉलिसी वेगळी विकत घ्यावी लागेल. तसेच हि आॅफर फक्त फ्लिपकार्ट च्या बिग बिलियन सेल मधेच उपलब्द असेल आणि 14 ऑक्टोबरला संपेल.
पोको एफ1 बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो.
पोको एफ1 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. तसेच 8जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनी ने यात 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच 6जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांचा आहे. 8जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.















