POCO M2 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Jan 2021 14:13:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/#respond Thu, 07 Jan 2021 14:13:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9584 पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO फॅन्ससाठी साल 2021 खास असणार आहे असे वाटत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पोको इंडिया आपल्या फॅन्सना एका मागून एक आनांदाच्या बातम्या देत आहे. कालच बातमी समोर आली होती कि पोकोचा हिट स्मार्टफोन Poco F1 चा नवीन वर्जन Poco F2 आता लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. तसेच आज कंपनीने घोषणा केली आहे कि पोकोने आपल्या 7 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करत त्यांची किंमत 4,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.

पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे. सर्वप्रथम पोको सी3 पाहता 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन आतापर्यंत 10,999 रुपयांमध्ये विकला जात होता पण कंपनीने याची किंमत 2,500 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर POCO C3 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

POCO M2 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. पण आता कंपनीने या वेरिएंटची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे त्यामुळे हा 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12,999 रुपये किंमत असलेल्या पोको एम2 च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,000 रुपयांनी कमी होऊन आता 9,999 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च

POCO M2 Pro चे सर्व तिन्ही वेरिएंट्सच्या किंमतीत कंपनीने 4,000 रुपयांची कपात केली आहे. या फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आता 16,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर 17,999 रुपयांमध्ये मिळणारा फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 तर 19,999 रुपये किंमत असलेला 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी होऊन 15,999 रुपये झाली आहे.

POCO X3 स्मार्टफोन ज्याचा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट आतापर्यंत 20,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. त्यावर कंपनीने 3,000 रुपयांचा प्राइस कट केला आहे. या कपातीनंतर पावरफुल पोको एक्स3 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पोकोचे हे सर्व स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर नवीन किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेऱ्यासह POCO M2 Pro फोन, 13999 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-launched-in-india-camera-battery-processor-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-launched-in-india-camera-battery-processor-specs-price-sale-offer/#respond Tue, 07 Jul 2020 10:36:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7606 POCO M2 Pro ची जाडी 8.8एमएम आहे हा फोन Blue, Green आणि Black कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेऱ्यासह POCO M2 Pro फोन, 13999 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi अंतर्गत हिट झालेल्या POCO ची फॅन फॉलोइंग हा स्वतंत्र ब्रँड बनल्यानंतर अजून वेगाने वाढली आहे. जेव्हापासून पोको ने घोषणा केली आहे कि हा ब्रँड कमी किंमतीत पण आपले स्मार्टफोन घेऊन येईल, तेव्हापासून भारतीय फॅन आगामी पोको फोनची वाट बघत आहेत. आज हि प्रतीक्षा संपवत पोकोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन POCO M2 Pro सादर केला आहे. कंपनीने आज भारतात आपला नवीन डिवायस लॉन्च केला आहे, जो येत्या 14 जुलै पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

POCO M2 Pro कंपनीने बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. डिस्प्ले दोन्ही बाजूंनी पॅनल्सला स्पर्श करतो तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. तसेच स्क्रीनच्या वर मधोमध पंच-होल आहे. पोको एम2 प्रो च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. हा सेटअप पॅनल पेक्षा वर आला आहे तसेच याच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह पावर बटण देण्यात आला आहे जो फिंगर प्रिंट सेंसर एम्बेडेड आहे. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट व लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे. POCO M2 Pro ची जाडी 8.8एमएम आहे हा फोन Blue, Green आणि Black कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

POCO M2 Pro कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो x पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने फोनची स्क्रीन को 60हर्ट्ज रिफ्रेश रेट सह सादर केली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो मीयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी पोको एम2 प्रो मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 618 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता POCO M2 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 119 डिग्री क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी पोको एम2 प्रो 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.

POCO M2 Pro एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी POCO M2 Pro मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व किंमत

POCO M2 Pro भारतात 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 13,999 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे तसेच फोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे जी 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेऱ्यासह POCO M2 Pro फोन, 13999 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-launched-in-india-camera-battery-processor-specs-price-sale-offer/feed/ 0
7 जुलैला भारतात लॉन्च होईल POCO M2 Pro, फ्लिपकार्ट वर होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-launch-date-in-india-7-july-sale-on-flipkart-know-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-launch-date-in-india-7-july-sale-on-flipkart-know-specs-price/#respond Wed, 01 Jul 2020 11:26:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7582 POCO M2 Pro चा खुलासा करत कंपनीने सांगितले दिया आहे कि हा शानदार स्मार्टफोन येत्या 7 जुलैला भारतात लॉन्च केला जाईल.

The post 7 जुलैला भारतात लॉन्च होईल POCO M2 Pro, फ्लिपकार्ट वर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सोबत हिट झाल्यांनंतर POCO ची फॅन फॉलोइंग भारतात पण वेगाने वाढली आहे. POCO F1 भारतात सुपरहिट झाला होता, त्यानंतर भारतीय स्माटफोन यूजर्स या ब्रँडच्या इतर फोन्सची पण वाट बघितली जात आहे. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि पोको भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन POCO M2 Pro पण लॉन्च करेल. आज कंपनीने अधिकृतपणे पोको एम2 प्रो च्या इंडिया लॉन्चची तारीख सांगितली आहे.

POCO M2 Pro चा खुलासा करत कंपनीने सांगितले दिया आहे कि हा शानदार स्मार्टफोन येत्या 7 जुलैला भारतात लॉन्च केला जाईल. कंपनीने एकीकडे या लॉन्चसाठी मीडिया इन्वाईट शेयर केले आहे तर दुसरीकडे ब्रँडच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पण फोन लॉन्चची माहिती दिली आहे. पोको एम2 प्रो येत्या 7 जुलैला भारतीय बाजारात येईल.

पोकोचा हा आगामी स्मार्टफोन 7 जुलैला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल. कंपनी फोनचा लॉन्च ईवेंट ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रसारित करेल. लॉन्च डेट व्यतिरिक्त कंपनीने असा खुलासा केला आहे कि POCO M2 Pro ची विक्री भारतात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर होईल.

POCO M2 Pro च्या फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्स बाबत कंपनीने आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही पण लॉन्च इन्वाईट मध्ये फोनचा फोटो समोर आला आहे. इथे फोनच्या बॅक पॅनल वर दाखवण्यात आला आहे ज्यावरून समजते कि पोको एम2 प्रो क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या मध्ये चौकोनी आकारात असेल ज्याच्या खाली फ्लॅश असेल. फोनच्या स्पेसिफिकेशन्ससाठी 7 जुलैची वाट बघावी लागेल.

POCO X2

POCO X2 बद्दल बोलायचे तर हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. पोको ने आपला हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन वर सादर केला आहे जी शानदार विजुअल एक्सपीरियंस देते. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. POCO X2 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे.

POCO X2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला आहे, सोबतच हा डिवाईस डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 4 रियर कॅमेरा तसेच 2 सेल्फी कॅमेरे आहेत. सर्वात आधी फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर हा डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल मध्ये आहे. POCO X2 चा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे तसेच सेकेंडरी सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पोको एक्स2 चा रियर कॅमेरा सेटअप पाहता इथे फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX686 सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

पोको एक्स2 एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो मीयूआई 11 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO X2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 27वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

The post 7 जुलैला भारतात लॉन्च होईल POCO M2 Pro, फ्लिपकार्ट वर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-launch-date-in-india-7-july-sale-on-flipkart-know-specs-price/feed/ 0