7 जुलैला भारतात लॉन्च होईल POCO M2 Pro, फ्लिपकार्ट वर होईल विक्री

Xiaomi सोबत हिट झाल्यांनंतर POCO ची फॅन फॉलोइंग भारतात पण वेगाने वाढली आहे. POCO F1 भारतात सुपरहिट झाला होता, त्यानंतर भारतीय स्माटफोन यूजर्स या ब्रँडच्या इतर फोन्सची पण वाट बघितली जात आहे. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि पोको भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन POCO M2 Pro पण लॉन्च करेल. आज कंपनीने अधिकृतपणे पोको एम2 प्रो च्या इंडिया लॉन्चची तारीख सांगितली आहे.

POCO M2 Pro चा खुलासा करत कंपनीने सांगितले दिया आहे कि हा शानदार स्मार्टफोन येत्या 7 जुलैला भारतात लॉन्च केला जाईल. कंपनीने एकीकडे या लॉन्चसाठी मीडिया इन्वाईट शेयर केले आहे तर दुसरीकडे ब्रँडच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पण फोन लॉन्चची माहिती दिली आहे. पोको एम2 प्रो येत्या 7 जुलैला भारतीय बाजारात येईल.

पोकोचा हा आगामी स्मार्टफोन 7 जुलैला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल. कंपनी फोनचा लॉन्च ईवेंट ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रसारित करेल. लॉन्च डेट व्यतिरिक्त कंपनीने असा खुलासा केला आहे कि POCO M2 Pro ची विक्री भारतात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर होईल.

POCO M2 Pro च्या फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्स बाबत कंपनीने आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही पण लॉन्च इन्वाईट मध्ये फोनचा फोटो समोर आला आहे. इथे फोनच्या बॅक पॅनल वर दाखवण्यात आला आहे ज्यावरून समजते कि पोको एम2 प्रो क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या मध्ये चौकोनी आकारात असेल ज्याच्या खाली फ्लॅश असेल. फोनच्या स्पेसिफिकेशन्ससाठी 7 जुलैची वाट बघावी लागेल.

POCO X2

POCO X2 बद्दल बोलायचे तर हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. पोको ने आपला हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन वर सादर केला आहे जी शानदार विजुअल एक्सपीरियंस देते. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. POCO X2 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे.

POCO X2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला आहे, सोबतच हा डिवाईस डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 4 रियर कॅमेरा तसेच 2 सेल्फी कॅमेरे आहेत. सर्वात आधी फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर हा डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल मध्ये आहे. POCO X2 चा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे तसेच सेकेंडरी सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पोको एक्स2 चा रियर कॅमेरा सेटअप पाहता इथे फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX686 सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

पोको एक्स2 एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो मीयूआई 11 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO X2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 27वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here