Realme 9 Pro+ 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:17:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना मिळतोय Realme 9 Pro 5G वर डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-64mp-camera-realme-5g-smartphone-on-big-discount/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-64mp-camera-realme-5g-smartphone-on-big-discount/#respond Fri, 09 Sep 2022 13:15:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12999 पॉपुलर स्मार्टफोन ब्रँड Realme च्या वेबसाइटवर सध्या रियलमी फेस्टिवल डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन, टीव्ही, इअरबड्स आणि अन्य डिवाइसेसवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. सेलमध्ये Realme 9 Pro 5G स्मार्टफोनवर देखील कंपनीकडून धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्ड धारकांना 2000 रुपयांची तात्कळ सूट मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला Realme […]

The post आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना मिळतोय Realme 9 Pro 5G वर डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॉपुलर स्मार्टफोन ब्रँड Realme च्या वेबसाइटवर सध्या रियलमी फेस्टिवल डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन, टीव्ही, इअरबड्स आणि अन्य डिवाइसेसवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. सेलमध्ये Realme 9 Pro 5G स्मार्टफोनवर देखील कंपनीकडून धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्ड धारकांना 2000 रुपयांची तात्कळ सूट मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला Realme 9 Pro 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट, स्पेसिफिकेशन्स आणि अन्य डिटेल्सची माहिती दिली आहे.

Realme 9 Pro 5G वरील ऑफर्स

Realme 9 Pro 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये येतो. फोनचा बेस व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर ICICI बाइकच्या क्रेडिट कार्डनं EMI पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सूट मिळेल. या डिस्काउंटसह रियलमीच्या हा फोन 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जेस्टमनीद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. जेस्टमनीच्या माध्यमातून हा फोन तीन महिन्याच्या बिनव्याजी हप्त्यावर देखील विकत घेता येईल. ही ऑफर रियलमीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा: अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

5000mAh battery, 64MP camera Realme 5G smartphone on Big discount

Realme 9 Pro 5G

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर मिळणारी ऑफर पाहता ICICI आणि Axis बँकेच्या डेबिट कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच ICICI बँक, Axis बँक, Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1500 रुपयांची सूट मिळेल. तसेच जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर अतिरिक्त सूट मिळून फोनची किंमत खूप कमी होईल.

5000mAh battery, 64MP camera Realme 5G smartphone on Big discount

Realme 9 Pro 5G स्पेसिफिकेशन्स

Realme 9 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या ऑक्टा कोर प्रोसेसर Snapdragon 695 5G सह सादर करण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप पाहता या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV

Realme 9 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट मिळतो. सॉफ्टवेयर बद्दल बोलायचं तर Realme चा हा 5G स्मार्टफोन Android 12 आधारित कस्टम स्किन Realme UI 3.0 वर चालतो.

The post आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना मिळतोय Realme 9 Pro 5G वर डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-64mp-camera-realme-5g-smartphone-on-big-discount/feed/ 0
3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme 9 Pro+ 5G उपलब्ध; जुना फोन दिल्यास मिळेल 17 हजारांची सूट https://www.91mobiles.com/marathi/realme-9-pro-plus-5g-is-available-with-3000-rupees-discount/ https://www.91mobiles.com/marathi/realme-9-pro-plus-5g-is-available-with-3000-rupees-discount/#respond Wed, 24 Aug 2022 13:11:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12448 Realme च्या एका दमदार 5G डिवाइसवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि realme.com वर ग्राहक नवीन किंमतीत हा स्मार्टफोन विकत घेता येईल. कंपनीनं Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनवर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर आणि आणखी आकर्षक ऑफर्स देखील सादर केल्या आहेत. Realme चा हा हँडसेट काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर झाला होता. ग्राहकांकडून […]

The post 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme 9 Pro+ 5G उपलब्ध; जुना फोन दिल्यास मिळेल 17 हजारांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme च्या एका दमदार 5G डिवाइसवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि realme.com वर ग्राहक नवीन किंमतीत हा स्मार्टफोन विकत घेता येईल. कंपनीनं Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनवर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर आणि आणखी आकर्षक ऑफर्स देखील सादर केल्या आहेत. Realme चा हा हँडसेट काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर झाला होता. ग्राहकांकडून देखील या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फ्लिपकार्टवर या फोनला चांगलं रेटिंग मिळालं आहे. जर तुम्ही दमदार 5G डिवाइस विकत घेण्याची योजना बनवत असाल तर Realme 9 Pro+ 5G तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.

Realme 9 Pro+ 5G वरील ऑफर्स

लाँचच्या वेळी या Realme डिवाइसची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली होती. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. परंतु सध्या ऑफर अंतर्गत हा हँडसेट 3,000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा फोन आता 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी

बँक ऑफर अंतगर्त एसबीआय क्रेडिट कार्डच्या मदतीने फोन घेतल्यास तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळेल. तर एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रँजॅक्शनवर देखील 10 टक्क्यांची सूट मिळत आहे. टक्के का डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्ही Realme 9 Pro+ 5G च्या खरेदीवर 17,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.

Realme 9 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेश्योला सपोर्ट करतो. फोनमध्ये Mediatek Dimensity 920 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी ARM Mali-G68 MC4 GPU मिळतो. डिवाइसमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआयवर चालतो.

The post 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme 9 Pro+ 5G उपलब्ध; जुना फोन दिल्यास मिळेल 17 हजारांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-9-pro-plus-5g-is-available-with-3000-rupees-discount/feed/ 0