इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV

Thomson 3 QLED TV Launched: सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत, त्यामुळे घरात नवीन वस्तू घेण्याची योजना देखील अनेकजण बनवत आहेत. ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी देखील या काळात सेलचं आयोजन केलं आहे तर ब्रँड्स देखील आपले नवीन प्रॉडक्ट्स बाजारात सादर करत आहेत. Festive Seasons पाहून Thomson नं देखील आपल्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियोमध्ये एकाच वेळी तीन नवीन Smart TV जोडले आहेत.

Thomson नं भारतात TV 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचाचे टीव्ही सादर केले आहेत. तसेच या सर्व टीव्हीमध्ये क्यूएलईडी पॅनल (QLED Panel) देण्यात आलं आहे आणि या टीव्हीमध्ये गुगल टीव्ही सपोर्ट (Google TV Support) देखील मिळतो. पुढे आम्ही तुम्हाला या सर्व टीव्हीची डिजाईन, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: महिनाभर नव्हे तर 45 दिवसांची वैधता असलेला Recharge Plan; रोज 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

Thomson QLED TV ची किंमत आणि सेल डिटेल

थॉमसन स्मार्ट टीव्हीची किंमत पाहता Thomson QLED TV 50 inch साइजची प्राइस 33,999 रुपये हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल. तर 55 inch मॉडेलची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या सीरिजमधील सर्वात मोठा 65 inch चा मॉडेल कंपनी 59,999 रुपयांमध्ये विकेल. विशेष म्हणजे या स्मार्ट टीव्हीचा सेल (Smart TV Sale) Flipkart वर होणाऱ्या Big Billion Days Sale च्या माध्यमातून केला जाईल.

Thomson 4K QLED Smart TV Price Chart

Thomson QLED TV चे शानदार फीचर्स

Thomson QLED TV बेजल लेस डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं यात एचडीआर10+, डॉल्बी अ‍ॅटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रशियाराउंड सारखे फीचर्स दिले आहेत, जे घरच्या घरी सिनेमा थिएटरचा अनुभव देतात. यांचा आकार वेगवेगळा असला तरी तिन्ही मॉडेल्समधील फीचर्स सारखेच आहेत. हे देखील वाचा: जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स

Thomson QLED TV चे स्पेसिफिकेशन्स

सर्व साइजच्या टीव्हीमध्ये 40वॉटचे डॉल्बी ऑडियो स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे दमदार साऊंड क्वॉलिटी मिळते. या इन टीव्हीमध्ये 2 GB RAM आणि 16 GB Storage देण्यात आली आहे, जेणेकरून स्मूद प्रोसेसिंग मिळते. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी हे टीव्ही ड्युअल बँड (2.4 + 5) गीगाहर्ट्ज वाय-फायला सपोर्ट करतात.

इतकेच नव्हे तर थॉमसनचे सर्व टीव्ही 4K रिजॉल्यूशनसह येतात, ज्यामुळे टीव्हीवर चित्रपट बघण्याची मजा आणखी वाढते. सर्व टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Hotstar, Apple TV, Voot, Sony Live सारखे 10000 पेक्षाही जास्त अ‍ॅप्स आणि गेम्स वापरता येतात कारण हे टीव्ही गुगल प्ले-स्टोरला सपोर्ट करतात. तसेच या टीव्हीच्या मदतीनं तुम्ही Smart Home Devices कंट्रोल करू शकाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here