Realme C17 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Jan 2023 05:28:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला स्वस्त Realme C17 दिवाळी नंतर होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-c17-india-late-november-or-early-december-budget-price-tag/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c17-india-late-november-or-early-december-budget-price-tag/#respond Tue, 27 Oct 2020 13:59:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8689 Realme C17 बांग्लादेशात जवळपास 13,000 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. फोन मध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 6GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 460 SoC आणि 5,000mAh ची बॅटरी सारखे फीचर्स आहेत.

The post 5,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला स्वस्त Realme C17 दिवाळी नंतर होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या महिन्यात सप्टेंबर मध्ये ‘C’ सीरीज मध्ये नवीन फोन C17 बांग्लादेशात लॉन्च केला होता. हा डिवाइस बांगलादेश मध्ये आल्यानंतर अंदाज लावला जात होता कि कंपनी हा लवकरच भारतात लॉन्च करेल. आतापर्यंत कंपनी याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. पण Realme C17 कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर अनेक आईओटी प्रोडक्ट सह स्पॉट केला गेला आहे. तसेच आता ट्विटर वर टिपस्टर मुकुल शर्माने दावा केला आहे कि Realme C17 भारतात नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरवातीला एंट्री करू शकतो.

टिपस्टरने आतापर्यंत अचूक अशी लॉन्च तारीख सांगितली नाही. पण लक्षात असू द्या कि Realme C17 बांग्लादेशात जवळपास 13,000 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. फोन मध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 6GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 460 SoC आणि 5,000mAh ची बॅटरी सारखे फीचर्स आहेत.

Realme C17 चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येतो. तसेच Realme C17 मध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू इंटिग्रेटेड आहे. फोन मध्ये 6 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 48MP कॅमेरा आणि शानदार प्रोसेसर सह Realme Q2 आणि Q2 Pro झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत

फोटोग्राफीसाठी रियलमी सी17 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. मागे 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड व्हाइट सेंसर आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी फीचर्स मध्ये एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. रियलमी सी17 ची बॅटरी 5,000 एमएएच आहे. हि 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 5,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला स्वस्त Realme C17 दिवाळी नंतर होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c17-india-late-november-or-early-december-budget-price-tag/feed/ 0
या दिवशी येत आहे 6GB रॅम असलेला Realme चा स्वस्त फोन, असे असतील फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/realme-c17-is-launching-on-september-21-with-90hz-display-and-sd460/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c17-is-launching-on-september-21-with-90hz-display-and-sd460/#respond Mon, 14 Sep 2020 13:32:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8140 Realme C17 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असलेला IPS LCD पॅनल असेल

The post या दिवशी येत आहे 6GB रॅम असलेला Realme चा स्वस्त फोन, असे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme C17 स्मार्टफोन बाबत गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि रियलमी सी17 स्मार्टफोन 21 सप्टेंबरला लॉन्च केला जाईल. रियलमी बांग्लादेशच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून हि माहिती समोर आली आहे. भारतीय वेळेनुसार 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता डिवाइस सादर केला जाईल. तसेच एका टिपस्टरने रियलमी सी17 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे, ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि फोन मध्ये काय काय खास असेल.

रियलमी सतत आपल्या C सीरीज मध्ये बजेट हँडसेट लॉन्च करत आहे. रियलमीने अलीकडेच Realme C15 आणि Realme C12 हॅंडसेट्स लॉन्च केले आहेत. तर काही दिवसांपूर्वी रियलमी सी17 बेंचमार्किंग वेबसाइट वर पण समोर आला होता. लिस्टिंगवरून समजले आहे कि स्मार्टफोन एंडरयॉड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.

फोटोग्राफी पाहता रियलमी सी17 मध्ये फ्रंटला 8-मेगापिक्सल एआई कॅमेरा AI ब्यूटी सपोर्ट आणि पोर्टेट मोड सह येईल. तर मागे क्वाड कॅमेरा सपोर्ट असेल , ज्यात अपर्चर f/1.8 सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, 119-डिग्री 8-मेगापिक्सल सूपरवाइड लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो शूटर 4cm फोकस डिस्टेंस आणि 2-मेगापिक्सल B&W पोर्टेट लेंस असेल.

रियली सी17 फोन 11nm स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर सादर केला जाईल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz असेल. SoC 6 GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह सादर केली जाईल. फोनची स्टोरेज वाढवण्याचा ऑप्शन असेल. कंपनी हा डिवाइस अजून रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर करू शकते.

स्मार्टफोन 5,000mAh च्या बॅटरी सह येईल जो 34 दिवस स्टँडबाय टाइम, 18.6 तास वीडियो प्लेबॅक, 12.3 तास PUBG गेमिंग आणि 83.4 तास म्यूजिक प्लेबॅक देईल. मोठ्या बॅटरीला USB-C द्वारे 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.

Realme C17 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असलेला IPS LCD पॅनल असेल जो 6.5-इंचाच्या HD+ डिस्प्ले सह येईल. फोनचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आणि 600nits मॅक्सिमम ब्राइटनेस असेल. डिवाइसच्या डिस्प्लेचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90 टक्के असेल. तसेच Realme C17 मध्ये Realme UI बेस्ड एंडरयॉड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

The post या दिवशी येत आहे 6GB रॅम असलेला Realme चा स्वस्त फोन, असे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c17-is-launching-on-september-21-with-90hz-display-and-sd460/feed/ 0