48MP कॅमेरा आणि शानदार प्रोसेसर सह Realme Q2 आणि Q2 Pro झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत

Realme ने Q-सीरीज मध्ये तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेले हे फोन्स सध्या कंपनीने आपल्या घरच्या मार्केट चीन मधेच सादर केले आहेत. Q सीरीज मध्ये Realme Q2, Realme Q2 Pro आणि Realme Q2i स्मार्टोफोन्स आले आहेत. Realme Q2 Pro leather फिनिश सह सादर केला गेला आहे. सीरीज मध्ये आलेले Realme Q2 आणि Realme Q2 Pro लुक आणि डिजाइनच्या बाबतीत अगदी एकसारखे आहेत. फीचर्स मध्ये थोडा फरक आहे.

डिजाइन

Realme Q2 आणि Realme Q2 Pro ची डिजाइन तर एकसारखी आहे. दोन्ही फोन्स मध्ये होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंटला हा होल-पंच उजवीकडे टॉपला दिसेल. फोन्सच्या तिन्ही बाजूंना खूप कमी बेजल्स आहेत. तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिसत आहे. या नवीन सीरीजच्या उजवीकडे पावर ऑन-ऑफ बटन व उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन व सिम ट्रेचा ऑप्शन आहे. डिवाइसच्या बॉटमला स्पीकर ग्रिल, माइक आणि टाइप-सी पोर्ट आहे. तसेच Realme Q2 फोनच्या मागे ट्रिपल आणि Realme Q2 Pro कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे.

डिस्प्ले

डिस्प्लेच्या बाबतीत दोन्ही फोन खूप वेगळे आहेत. Realme Q2 मध्ये 6.5-इंच FHD+ LCD डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतात. Realme Q2 Pro मध्ये 6.43-इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, सोबत 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस आहे.

हार्डवेयर

Realme Q2 आणि Realme Q2 Pro मध्ये MediaTek Dimensity 800U चिपसेट देण्यात आला आहे. रियलमी क्यू2 मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दुसरीकडे एकाच चिपसेट वर येणाऱ्या रियलमी क्यू2 प्रो मध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा

Realme Q2 मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये f/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सल प्राइमरी लेंस, 8-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस 119-डिग्री FoV आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे Realme Q2 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48MP ची प्राइमरी लेंस, 8MP वाइड-अँगल लेंस 119-डिग्री FoV, 2MP B&W पोर्टेट लेंस आणि 2MP 4cm मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात पण 16MP ची लेंस देण्यात आली आहे.

बॅटरी

Realme Q2 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर Realme Q2 मध्ये 5,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. दोन्ही फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतात.

किंमत

Realme Q2 च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 1,299 (जवळपास 14,000 रुपये) आणि 6GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,399 (जवळपास 15,200 रुपये) आहे. तर Realme Q2 Pro के 8GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,799 (जवळपास 19,500 रुपये) आणि 8GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 1,999 (जवळपास 21,700 रुपये) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here