Realme C21 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Apr 2021 12:44:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-realme-c21-realme-c25-launch-date-in-india-april-8-and-flipkart-availability/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-realme-c21-realme-c25-launch-date-in-india-april-8-and-flipkart-availability/#respond Thu, 01 Apr 2021 12:44:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10470 अपकमिंग Realme C-सीरीजचे फोन एकसारख्या डिजाइनसह सादर केले जातील.

The post Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल कालच बातमी समोर आली होती कि कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपल्या सी-सीरीजमध्ये तीन नवीन लो बजेट फोन्स सादर करू शकते. त्यानुसार, आज कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि 8 एप्रिलला भारतीय टेक मंचावर Realme C25, Realme C21 आणि Realme C20 स्मार्टफोन लॉन्च केले जातील. कंपनीने मीडिया इनवाइटमध्ये लॉन्च डेट सोबतच 6,000एमएएच बॅटरी हाईलाईट केली आहे. तर, दुसरीकडे Realme C-सीरीजचे हे तीन फोन्स ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर पण दिसले आहेत, त्यामुळे स्पष्ट झाले आहेत कि फोनची विक्री Flipkart च्या माध्यमातून पण केली जाईल. (realme c20 realme c21 realme c25 launch date in india april 8 and flipkart availability)

किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी

तिन्ही रियलमी सी-सीरीजचे फोन जागतिक स्थरावर लॉन्च केले गेले आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबाबत सर्वकाही आधीपासून माहित आहे. तिन्ही फोनची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. तसेच 8 एप्रिलला कंपनी या फोनचा लॉन्च इवेंट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter, Facebook आणि YouTube वर लाइव करेल.

हे देखील वाचा : दोन डिस्प्ले असलेला ‘SUPERPHONE’ Mi 11 Ultra भारतात यादिवशी होईल लॉन्च, यात आहे 50MP चा कॅमेरा

Realme C20, Realme C21, आणि Realme C25 ची डिजाइन

अपकमिंग Realme C-सीरीजचे फोन एकसारख्या डिजाइनसह सादर केले जातील. या तिन्ही फोनमध्ये वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल असतील. फक्त Realme C21 आणि Realme C25 रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह येतील.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी आणि 48MP रियर कॅमेऱ्यासह आला Vivo X60t, 8GB रॅम आणि डायमनसिटी 1100 चिपसेटवर होईल लॉन्च

Realme C20, Realme C21, आणि Realme C25 चे स्पेसिफिकेशन्स

Realme C20 मध्ये 6.5-इंचाचा HD + डिस्प्ले आणि मीडियाटेक Helio G35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच, हा एंट्री-लेवल फोन ग्लोबल मार्केटमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला होता. इतर स्पेक्स पाहता फोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्याचा समावेश आहे. फोन 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्टसह येते.

Realme C21 मध्ये पण Realme C20 सारखे स्पेसिफिकेशन आहेत. यात 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आहे. फोन 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह येतो. Realme C21 मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्यात 13MP चा प्राइमरी सेंसर, 2MP ची मॅक्रो लेंस आणि 2MP चा B & W कॅमेऱ्याचा समावेश आहे. फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.

Realme C25 बद्दल बोलायचे झाले तर यात 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलियो जी70 चिपसेट आहे. फोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. यात 48MP चा ट्रिपल कॅमेरा सिस्टम आणि 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. Realme C25 मध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे आणि हि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

The post Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-realme-c21-realme-c25-launch-date-in-india-april-8-and-flipkart-availability/feed/ 0