Vivo ने काही दिवसांपूर्वीच भारतात आपली ‘एक्स60’ सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन पावरफुल स्मार्टफोन Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus लॉन्च झाले आहेत. दमदार डिवायसेज असलेली हि स्मार्टफोन सीरीज आता वीवो अजून वाढवण्याची योजना बनवत आहे. बातमी समोर आली आहे कि कंपनी एक्स60 सीरीजच्या एका नवीन मोबाईल फोनवर काम करत आहे जो Vivo X60t नावाने लॉन्च केला जाईल. ताज्या अपडेटनुसार कंपनी लवकरच वीवो एक्स60टी स्मार्टफोनची घोषणा करू शकते. (Vivo X60t Launch soon Price Specs Leaked)
Vivo X60t चीनी टेलीकॉम लाइब्रेरीवर स्पॉट केला गेला आहे जिथे फोन V2085A मॉडेल नंबरसह सर्टिफाइड झाला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या फोटो सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. फोटोमध्ये हा फोन पंच-होल डिस्प्लेवर बनला असल्याचे दाखवण्यात आले आहे जो चौकोनी आकाराच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे आणि पंच-होल स्क्रीनवरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आली आहे. या फोटोमध्ये फोनमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण दिसत नाही.
Vivo X60t
वीवो एक्स60टी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 1080 x 2376 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो पंच-होल स्टाईलसह एमोलेड पॅनलवर बनला असेल. लिस्टिंगमध्ये फोनचे डायमेंशन 159.63 x 75.01 x 7.4एमएम आणि वजन 175.5ग्राम असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत
लीकनुसार Vivo X60t अँड्रॉइड ओएससह मीडियाटेक डायमनसिटी 1100 चिपसेटसह येईल जो 8 जीबी रॅमसह मार्केटमध्ये एंट्री घेईल. लिस्टिंगमध्ये फोनमध्ये 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे पण आशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त रॅम व स्टोरेज वेरिएंट्समध्ये लॉन्च केला जाईल.
फोटाग्राफीसाठी Vivo X60t मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह 13 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि 13 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचा खुलासा या लीकमध्ये झाला आहे.
हे देखील वाचा : दोन डिस्प्ले असलेला ‘SUPERPHONE’ Mi 11 Ultra भारतात यादिवशी होईल लॉन्च, यात आहे 50MP चा कॅमेरा
लीकनुसार Vivo X60t स्मार्टफोन 4,220एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये लॉन्च केला जाईल जो 33वॉट रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. तसेच या फोनची किंमत 3698 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 40,000 रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे. चर्चा आहे कि एप्रिलच्या सुरवातील वीवो हा फोन सादर करू शकते आणि वीवो एक्स60टी येत्या काही दिवसांत चीनमध्ये लॉन्च होऊ शकतो.
वीवो एक्स60 प्रो व्हिडीओ















