Realme GT 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रियलमीनेचा मोठा चला डाव , 5G आणि पावरफुल फीचर्ससह आणला ताकदवान फोन Realme GT, Xiaomi ला घेरण्याची तयारी https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-launch-with-64mp-camera-4500mah-battery-know-price-full-specification/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-launch-with-64mp-camera-4500mah-battery-know-price-full-specification/#respond Thu, 04 Mar 2021 12:54:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10267 कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे ज्यात 64MP प्राइमरी सेंसर, 8MP वाइड-अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो लेंसचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 16MP चा स्नॅपर आहे

The post रियलमीनेचा मोठा चला डाव , 5G आणि पावरफुल फीचर्ससह आणला ताकदवान फोन Realme GT, Xiaomi ला घेरण्याची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीने आज आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 5G लॉन्च केला आहे. फोनच्या लॉन्चच्या आधी डिवाइसबद्दल अनेक लीक्स व माहिती समोर येत होती, ज्यावर आज पूर्णपणे विराम लागला आहे. तसेच, ऑफिशियल होण्याआधी या फोनने युजर्सना आपले फॅन बनवले होते. विशेष म्हणजे फोनच्या लॉन्चच्याआधीच रियलमी GT 5G चे 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स रिजर्व केले गेले होते, ज्याची माहिती कंपनीने दिली होती. (realme gt 5g launch with 64mp camera 4500mah battery know price full specification)

डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीने हा फ्लॅगशिप फोन पंच-होल डिस्प्लेवर सादर केला आहे जो फोनच्या फ्रंट पॅनलवर टॉप-लेफ्ट कॉर्नरवर आहे. तसेच हँडसेटच्या खालच्या भागात लाउडस्पीकर, एक यूएसबी-C पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. पावर बटन फोनच्या डावीकडे दिसत आहे. तर ऑडियो बटन फोनच्या डावीकडे दिसत आहेत. Realme GT च्या मागे आयताकृती कॅमेरा सेटअप एक मोठ्या एलईडी मॉड्यूलसह येतो. तसेच कंपनीने फोनचा Vegan Lether edition पण सादर केला आहे जो लुक आणि डिजाइनच्या बाबतीत जवळपास नॉर्मल रियलमी जीटी 5जी प्रमाणेच आहे. पण या स्पेशल एडिशन मध्ये तुम्हाला लेदर फिनिश बॅक पॅनल मिळेल. फोनच्या मागे पिवळ्या रंगाच्या लेदर पॅनलवर काळ्या रंगाची काचेची एक पट्टी आहे जी खूप क्लासी लुक देतो. फोन दिसायला खूप स्मार्ट वाटत आहे.

120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले

फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल तसेच Realme GT 5G मध्ये 6.43-inch FHD+ Super AMOLED डिस्प्ले पंच-होल कटआउट, 1000nits पीक ब्राइटनेस आणि कोर्निंग गोरिल्ला 5 प्रोटेक्शन ग्लास सपोर्टसह येतो.

गेमिंगसाठी आहे लिक्विड कूलिंग सिस्टम

फोन मध्ये लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हि सिस्टम फोनचा हार्डवेयर थंड ठेवते. VC कूलिंग सिस्टमने गेमिंग करताना फक्त फोन हँग होत नाही तर फोनचा बॅटरी बॅकअप पण सुधरतो. गेमिंगसाठी हा फोन खूप शानदार असल्याचे बोलले जात आहे.

प्रोसेसिंग पावर

फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगॉन 888 5G एसओसी Adreno 660 GPU सह देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये 25 टक्के वेगवान CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के वेगवान ग्राफिक्ससह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो. फोनमध्ये 12GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा

कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे ज्यात 64MP प्राइमरी सेंसर, 8MP वाइड-अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो लेंसचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 16MP चा स्नॅपर आहे. कॅमेरा PureRaw मोड, AI सेल्फी, 4K 60fps रेकॉर्डिंग, आणि इतर अनेक फीचर्सला सपोर्ट करतो. फोनची जाडी 8.4 मिमी आहे आणि याचे वजन 186 ग्राम आहे. Realme GT 5G एका GT मोडसह येतो जो डिवाइसची कामगिरी सुधारतो.

कनेक्टिविटी आणि बॅटरी

कनेक्टिविटी फीचर्ससाठी फोनमध्ये 5G डुअल-मोड, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, GPS, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि USB टाइप- C पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, स्टीरियो स्पीकर, डॉल्बी एटमॉस आणि हाय-रेस ऑडियो पण आहे. तसेच फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme GT 5G ची किंमत आणि सेल

चीनमध्ये Realme GT 5G च्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत CNY 2,799 (जवळपास 31,400 रुपये) आणि 12GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 3,299 (जवळपास 37,000 रुपये) आहे. स्मार्टफोन ब्लू आणि सिल्वर रंगात येतो आणि स्मार्टफोन 10 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post रियलमीनेचा मोठा चला डाव , 5G आणि पावरफुल फीचर्ससह आणला ताकदवान फोन Realme GT, Xiaomi ला घेरण्याची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-launch-with-64mp-camera-4500mah-battery-know-price-full-specification/feed/ 0
प्रीमियम डिजाइन असलेल्या Realme GT 5G चा फर्स्ट लुक आला समोर, 64MP कॅमेऱ्यासह करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-confirmed-to-feature-64-megapixel-triple-rear-camera-and-design-launch-on-4-march/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-confirmed-to-feature-64-megapixel-triple-rear-camera-and-design-launch-on-4-march/#respond Mon, 22 Feb 2021 11:18:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10111 अधिकृत Realme GT पोस्टर पाहता यात दाखवण्यात आले आहे कि हँडसेटच्या खालच्या भागावर लाउडस्पीकर, एक यूएसबी-C पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post प्रीमियम डिजाइन असलेल्या Realme GT 5G चा फर्स्ट लुक आला समोर, 64MP कॅमेऱ्यासह करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी रियलमी आपला अपकमिंग फोन Realme GT (जो आधी Realme Race नावाने ओळखला जात होता) 4 मार्चला लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. बाजारात येण्याआधी फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 5G चे दोन पोस्टर कंपनीने रिलीज केले आहेत. पोस्टर मध्ये फोनची मागील डिजाइन दाखवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर लुकसह पोस्टर मध्ये खुलासा झाला आहे कि फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच एका रियलमी जीटी बॅनरवर MWC शंघाई पण दिसत आहे. विशेष म्हणजे चीनच्या शंघाई मध्ये 23 फेब्रुवारीपासून मोबाईल वर्ल्ड कांग्रेसची सुरुवात होणार आहे. (Realme gt 5g confirmed to feature 64 megapixel triple rear camera and design launch on 4 march)

डिजाइन

अधिकृत Realme GT पोस्टर पाहता यात दाखवण्यात आले आहे कि हँडसेटच्या खालच्या भागावर लाउडस्पीकर, एक यूएसबी-C पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. त्याचबरोबर पावर बटन फोनच्या डावीकडे दिसत आहे. तुम्हाला ऑडियो बटन खूप प्रयत्न केल्यावर दिसतो कारण तो फोनच्या डावीकडे देण्यात आला आहे. Realme GT च्या मागे आयताकृती कॅमेरा सेटअप एका लांब एलईडी मॉड्यूलसह दिसतो. पण रेंडर मध्ये कॅमेरा बम्प दिसत नाही.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 सीरीज भारतात होईल 4 मार्चला लॉन्च, दमदार फीचर्ससह Realme ला देईल आव्हान

स्पेसिफिकेशन्स

Realme GT 5G मध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट दिला जाईल. याआधी आलेल्या लीकमधून समजले होते कि सेल्फी कॅमेऱ्यासाठी फोन एक पंच-होल डिजाइनसह AMOLED डिस्प्ले पण असेल. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे तर फोन मध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते. तसेच, अपकमिंग Realme फोन पण 12GB रॅमसह सादर केला जाऊ शकतो.

प्रो वर्जन पण होऊ शकतो लॉन्च

अफवा अशी आहे कि रियलमी या फोनचा एक प्रो वर्जन पण लॉन्च करू शकते. प्रो वेरिएंट मध्ये 160Hz रिफ्रेश रेटसह स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 125 वॉट अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही

टेना लिस्टिंग

अलीकडेच या फोनचा मॉडेल नंबर RMX2202 सह TENAA आणि 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. वेबसाइटनुसार हा मॉडेल नंबर असलेला डिवाइस कंपनी चीनमध्ये रियलमी GT 5G नावाने लॉन्च करेल. TENAA लिस्टिंगमध्ये हा फोन पंच-होल डिजाइन डिस्प्ले, आयताकृती कॅमेरा मॉड्यूलसह दिसला होता.

The post प्रीमियम डिजाइन असलेल्या Realme GT 5G चा फर्स्ट लुक आला समोर, 64MP कॅमेऱ्यासह करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-confirmed-to-feature-64-megapixel-triple-rear-camera-and-design-launch-on-4-march/feed/ 0
रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-launch-date-march-4-know-specification/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-launch-date-march-4-know-specification/#respond Thu, 18 Feb 2021 13:53:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10092 Realme VP नुसार, Realme GT 5G मध्ये फक्त स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटची माहिती देण्यात आली नाही. स्पीड आणि डिजाइनची माहिती पण देण्यात आली आहे.

The post रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी आपली नवीन Narzo 30 सीरीज भारतात 24 फेब्रुवारीला लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. दुसरीकडे कंपनी फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 5G आपल्या घरच्या मार्केट चीनमध्ये 4 मार्चला लॉन्च करेल. रियलमीच्या वाइस प्रेसिडेंटनी वीबोवर लॉन्च डेटची माहिती देत एक इन्वाइट पोस्टर शेयर केला आहे. हा फोन कंपनी सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च करेल. आशा आहे कि नंतर हा फोन भारतात पण येईल. पण, सध्यातरी याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

वीबोवर लॉन्च डेटची माहिती देत कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनी सांगितले फोन स्नॅपड्रॅगॉन 888 च्या पावरसह सादर केला जाईल. या स्मार्टफोन मध्ये GT इंस्पायर्ड डिजाइनसह रेक्टँगुलर कॅमेरा यूनिट असेल, ज्यात तीन कॅमेरा असतील. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी हा फोन TENAA लिस्टिंगमध्ये पण दिसला होता.

हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड

Realme VP नुसार, Realme GT 5G मध्ये फक्त स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटची माहिती देण्यात आली नाही. स्पीड आणि डिजाइनची माहिती पण देण्यात आली आहे. आम्हाला आधीच याची झलक मिळाली आहे कि स्मार्टफोन टीजर इमेजच्या माध्यमातून कसा दिसतो. गेल्या काही दिवसांपासून रियलमीच्या Race कोडनेम असलेल्या स्मार्टफोनबद्दल माहिती समोर येत होती. बोलले जात आहे कि रेसच रियलमी जीटी 5जी फोन असेल.

TENAA लिस्टिंगनुसार फोन मध्ये पंच-होल डिस्प्ले दिली जाईल. फोनमध्ये 6.81 इंचाचा OLED पॅनल दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच बोलले जात आहे कि कंपनी यात 3K रेजॉलूशन आणि 160Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल. तसेच हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल जो 125 वॉट अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह येईल.

हे देखील वाचा : बदलेल भारतातील ‘गेमिंग स्मार्टफोन’ ची दुनिया, 16GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येत आहे Asus ROG Phone 5

फोटोग्राफीसाठी रियलमी GT मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळेल. फोनच्या बॅक पॅनल मध्ये खाली तुम्हाला GT चा लोगो पण दिसेल. एक रिपोर्ट समोर आला होता कि डिवाइसमध्ये 12जीबी रॅमसह 256जीबी बिल्ट-इन स्टोरेज असेल. फोन अँड्रॉइड 11 ओएसवर बेस्ड Realme UI वर चालेल. इतकेच नव्हे तर फोन भारतातील BIS वर सर्टिफिकेशनवर दिसला होता.

The post रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-5g-launch-date-march-4-know-specification/feed/ 0